


पिंपरी, ता. ११ : सिटी प्राईड स्कूल मध्ये “पुणे पुस्तक महोत्सव” अंतर्गत पुस्तक वाचन दिन साजरा करण्यात आला. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फॉउंडेशन संचलित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूल रहाटणी येथे ” पुणे पुस्तक महोत्सवा अंतर्गत आयोजित शांतता…. पुणेकर वाचत आहेत” हा उपक्रम आज शाळेत घेण्यात” आला.


या वेळी संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार शाळेचे उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी शाळेतील इयत्ता पहिली ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी एक तास पुस्तक वाचन केले.
विद्यार्थ्याच्या समवेत शिक्षकांनीही पुस्तक वाचन केले. वाचन चळवळ सक्षम करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना त्यातून आवड निर्माणसाठी विद्यार्थ्यांना विविध साहित्यकाची पुस्तके आणण्यासाठी सांगितलेली होती. विद्यार्थ्यांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला होता.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️