


पिंपरी, ता. ११ : श्री जैन विद्या प्रसारक मंडळ संचलित, श्री गुरुमैय्या प्रभाकंवरजी प्राथमिक विद्यामंदिराच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन सोहळा दि. ११/१२/२०२४ रोजी संस्थेचे कार्यकारिणी सदस्य सुमतीलाल ओस्तवाल (कार्यकारिणी सदस्य, श्री जैन विद्या प्रसारक मंडळ) ऋषिकेश पासलकर (पुणे श्री २०१७), लोकमत चे पत्रकार अमोल जायभाये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक शिरीष पडवळ यांच्या उपस्थित पार पडला.

मा.श्री.सुमतीलालजी ओस्तवाल (कार्यकारिणी सदस्य, श्री जैन विद्या प्रसारक मंडळ) मा.श्री.ऋषिकेश पासलकर, अमोल जायभाये यांनी विद्यार्थ्यांना आरोग्याचे महत्त्व सांगितले. या प्रसंगी कब बुलबुल संचलन, मशाल ज्योत प्रज्वलन इ उपक्रम सादर केले. सचिन परब यांनी निवेदन केले,. अनुजा आगम यांनी प्रास्ताविक केले. गणेश शिंदे यांनी विशेष मेहनत घेतली. मा.मुख्याध्यापक जयप्रकाश दहीफळे , यांनी आभार मानले.
ॲड.राजेंद्रकुमारजी शंकरलालजी मुथा (ऑनररी जनरल सेक्रेटरी, श्री जैन विद्या प्रसारक मंडळ),.प्रा अनिलकुमारजी मोतीलालजी कांकरिया (सहाय्यक सेक्रेटरी, श्री जैन विद्या प्रसारक मंडळ) यांचे विशेष मार्गदर्शन सदर समारंभास लाभले.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️