


पिंपरी चिंचवड, ता. १९ मे: पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादितची ५५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार दिनांक १६ मे २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता प्रा. रामकृष्ण मोरे, सभागृह, चिंचवड पुणे येथे मा. अध्यक्ष श्री. शशिकांत उर्फ बबनराव झिंजुर्डे यांच्या अध्यक्षते खाली व पिपरी चिंचवड महानगरपालिकेचे मा. महापौर रविभाऊ लांडगे व क्रिडा सभापती मा. कैलास कुटे यांच्या प्रमुख पाहुणे म्हणून व संचालक, सल्लागार व सभासद यांच्या उपस्थित संपन्न झाली.

सभेला मोठ्या प्रमाणावर सभासद उपस्थित राहिल्यावर सभेची सुरुवात श्रीम. भारती मानमोडे यांच्या स्वागत गिताने झाली. मा. चेअरमन श्री शिवाजी येळवंडे यांनी प्रास्ताविक करुन संस्थेविषयी माहिती दिली तसेच सभेचे सर्व विषय मा. सचिव विश्वनाथ लांडगे यांनी वाचून दाखविण्यात आले या सर्व विषयांना सभासदांन कडून बहुमताने व एकविचाराने मंजुरी मिळाली यामध्ये सभासदांना १३% दराप्रमाणे लाभांश मंजुर करणेत आला.
महाराष्ट्र विकास अधिकारी मा. विलास लिंबळे यांच्या मार्फत सभासदांना प्रशिक्षण देणेत आले. सभेला उपस्थित सभासदांना सभा भत्ता म्हणून रु. ५००/- देण्यास मंजूरी देण्यात आली तसेच सेवानिवृत्त व सलग २५ वर्ष सभासदांना रु. ५०००/- बक्षिसचा चेक, शॉल व स्मृती चिन्ह देवून सन्मानित करणेत आले. तसेच सभासदांच्या गुणवंत पाल्यांना व राज्य स्तरीय खेळाडूंना स्मृती चिन्ह देवून सन्मानित करणेत आले.
यावेळी संस्थेचे व्हा. चेअरमन ज्ञानेश्वर शिंदे, खजिनदार अभिषेक फुगे, संचालक चारुशिला जोशी, सनी कदम, नथा मातेरे,, भास्कर फडतरे, चंद्रकांत भोईर, विजय नलावडे, अनिल लखन, कृष्णा पारगे, विजया कांबळे, संदीप कापसे, योगेश रानवडे, विजय मुंडे, वैभव देवकर, विशाल भुजबळ, गणेश गवळी, युनूस पगडीवाले तसेच सल्लागार मनोज माछरे, दिगंबर चिंचवडे, महादेव बोत्रे, धमेंद्र शिंदे, संजय कापसे, नंदकुमार इंदलकर, लाला गाडे, उमेश बांदल, मंगेश कलापुरे, विशाल बाणेकर, चंद्रशेखर गावडे, तुषार कस्पटे, सुरज टिंगरे, दत्तात्रय ढगे, मदन चिंचवडे, प्रमोद अंबपकर, किसन आरजे, सुहास ताक्वले भाऊसाहेब शेलार, किशोर आठवाल, गौतम पायाळ, गौतम भालेराव, राकेश चव्हाण आदि उपस्थित होते. सदर सभेचे स्वागत व सूत्रसंचालन कर्मचारी महासंघाचे उपाध्यक्ष मा. महादेव बोत्रे यांनी केले. व मा. व्हा. चेअरमन ज्ञानेश्वर शिंदे यांनी सभेस उपस्थित सभासदांचे आभार मानले.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
