


भव्य सत्कार आणि वर्ल्ड चॅम्पियनशिपची तयारी सुरू

पिंपरी चिंचवड, ता. ६ (प्रतिनिधी):नेपाळमधील काठमांडू युनिव्हर्सिटी, धुलीखेल येथे दिनांक ३० एप्रिल ते ३ मे २०२६ दरम्यान पार पडलेल्या ७ व्या एशियन व इंटरनॅशनल सवात चॅम्पियनशिप २०२६ स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी शानदार कामगिरी करत आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचा तिरंगा अभिमानाने फडकवला. विविध देशांच्या सहभागात झालेल्या या स्पर्धेत भारताकडून एकूण ७१ खेळाडूंनी सहभाग घेतला होता, त्यामध्ये महाराष्ट्रासह पुणे व पिंपरी चिंचवडमधील खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत देशाची मान उंचावली. त्यांनी २ सुवर्ण, ७ रौप्य आणि १५ कांस्य पदके जिंकले.
विविध राज्यातील खेळाडूंनी देखील उत्कृष्ट प्रदर्शन करत आशियाई स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी पटकावली.
🥋 महाराष्ट्राच्या खेळाडूंची पदक कामगिरी
🥇 सुवर्णपदक विजेते:
गार्गी कुलकर्णी, अंजली चव्हाण
🥈 रौप्यपदक विजेते:
आकांक्षा भालेकर, आर्या पवार, समृद्धी जुगदार, शिवम पाटील, श्रुतिका जाधव, वैष्णवी शिंदे, सार्थक महामुनी
🥉 कांस्यपदक विजेते:
ऐश्वर्या नायक, अस्मि पाटील, वरद शेटे, मकरंद जुगदार, ध्रुव दिघाडे, अविर बनसोडे, प्रमोद ठोंबरे, आदित्य खंडीझोड, यश मोरे, ध्रुव कोलतेकर, ईश्वरी डेरे, स्वयम् शिंदे
🌍 हिमालयन इंटरनॅशनल सवात चॅम्पियनशिप – कांस्य विजेते:
सिद्धी जोगदार, मंथन रोटे, आराध्या भोसले
👨⚖️ महाराष्ट्राच्या जज व रेफ्रींचे योगदान
भूपेंद्र शिवाजी गायकवाड, धनेशा शिंगोटे, राहुल पवार आणि सुशांत पोळ यांनी जज व रेफ्री म्हणून उत्कृष्ट जबाबदारी पार पाडली.
🎓 प्रशिक्षण व मार्गदर्शन
राष्ट्रीय संघ प्रशिक्षक माननीय सुहास धाईंजे, आशिया पंच माननीय राहुल पवार, माननीय भूपेंद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रशिक्षणामुळे खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवले.
🎉 भव्य सत्कार व विजय मिरवणूक
दिनांक ५ मे २०२६ रोजी खांदा कॉलोनी येथे सीकेटी कॉलेजच्या सेमिनार हॉलमध्ये विजयी खेळाडूंचा भव्य सत्कार समारंभ व पत्रकार परिषद उत्साहात पार पडली. यानंतर खेळाडूंची भव्य विजय मिरवणूक काढण्यात आली, ज्यामध्ये नागरिक आणि क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
🌍 आता लक्ष्य – वर्ल्ड चॅम्पियनशिप 2026 (फ्रान्स)
या आशियाई यशानंतर आता सर्व खेळाडूंचे लक्ष सप्टेंबर २०२६ मध्ये फ्रान्स येथे होणाऱ्या सवात वर्ल्ड चॅम्पियनशिप कडे लागले आहे.
यासाठी खेळाडूंनी अधिक जिद्द, चिकाटी आणि कसोटीने प्रयत्न करत, कठोर मेहनत व शिस्त यांच्या जोरावर स्वतःला तयार करण्याचे ध्येय निश्चित केले आहे.
“आता आशियानंतर जग जिंकायचं!” या निर्धाराने खेळाडू सरावाला लागले आहेत.
💬 खेळाडूंच्या भावना
“आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळताना मोठे दडपण होते, पण कठोर सराव आणि आत्मविश्वासामुळे आम्ही हे यश मिळवू शकलो. आता आमचे लक्ष्य वर्ल्ड चॅम्पियनशिप आहे,” असे खेळाडूंनी सांगितले.
🇮🇳 भारताचा अभिमान
या यशामुळे केवळ पनवेलच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्र आणि भारताचे नाव क्रीडा विश्वात उंचावले आहे. ही कामगिरी म्हणजे मेहनत, शिस्त आणि जिद्दीचा विजय असून, येणाऱ्या काळात भारत सवात खेळात जागतिक स्तरावर आपली छाप अधिक ठळक करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
👉 भारताचा तिरंगा आता आशियानंतर जगभर फडकवण्याची तयारी सुरू! 🇮🇳🏆🔥

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
