


अप्पर कामगार आयुक्त, कामगार उपायुक्त पुणे यांच्याकडे कष्टकरी संघर्ष महासंघाचे मागणी.

पिंपरी दि .५ – महाराष्ट्र राज्यात वाढत्या उन्हाळ्यामुळे (उष्णतेची लाट) असंघटित कामगारांच्या आरोग्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यानुसार दुपारी १२ ते ४या वेळेत कामगारांना सक्तीची विश्रांती (सुट्टी) देणे आरोग्याची काळजी घेणे बंधनकारक आहे, मात्र याची अंमलबजावणी होत नाही ती कडक करावी व कामगारांना ओआरएस पावडर देण्यात यावी अशी मागणी कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी केली आहे.
कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र तर्फे अप्पर कामगार आयुक्त कामगार उप आयुक्त पुणे यांना निवेदन देण्यात आले. कामगार अधिकारी एस.आर.धोत्रे यांनी निवेदन स्वीकारले यात म्हटले आहे की विशेषतः बांधकाम कामगार, हमाल, सुरक्षा रक्षक, शेतमजूर, ई-कॉमर्स डिलिव्हरी बॉय, उघड्यावर काम करणारे सर्व प्रकारचे कामगार, आणि उन्हात काम करणाऱ्या असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी.वेळ: दुपारी १२ ते ४ या वेळेत काम थांबवून विश्रांती घेण्याचे आदेश आहेत.कामगार वेळ बदल: तीव्र उष्णता टाळण्यासाठी कामाच्या वेळा सकाळी लवकर किंवा सायंकाळी करणे सुचवण्यात आले आहे.
मात्र सध्या कोणत्याही आस्थापनामध्ये कंपनीमध्ये कारखान्यामध्ये व कॉन्ट्रॅक्टरकडे अशी सुट्टी दिली जात नाही उलट उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात काम करून घेतले जात आहे त्यामुळे उष्माघाताने कामगारांची मृत्यू होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. उन्हामुळे होणारे आजार, उष्माघात यांपासून कामगारांचे नुकसान टाळण्यासाठी राज्य शासन, कामगार विभाग, पोलीस प्रशासनाने ही प्रयत्न करणे गरजेचे असून कामगारांना ORS (Oral Rehydration Solution) पावडर ची पाकिटे वाटप करणे हे महत्त्वाचे व महत्त्वाचे ठरणार आहे.
आपण पुणे जिल्ह्यातील सर्व आस्थापनांची चौकशी करून 12 ते 4 या वेळेत सुट्टी न देणाऱ्या आणि शासनाच्या निर्णयाच्या अंमलबजावणी न करणाऱ्या संस्थापनावर, ठेकेदार ,कंपनी मालक त्वरित कारवाई करावी व संबंधित ठेकेदार, कंपनी व्यवस्थापन तसेच कॉन्ट्रॅक्टर, मालक यांना उन्हाळ्यात ओआरएस ORS (Oral Rehydration Solution)
पावडर देण्याची व उन्हाळ्यात कामगारांची काळजी घेण्याची सक्ती करावी. अशी मागणी करण्यात आले यावेळी कामगार नेते काशिनाथ नखाते, उपाध्यक्ष राजेश माने,सखाराम केदार लाला राठोड यांनी निवेदन दिले आहे .

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
