Skip to content
06/03/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • ‘प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह भाडे वसुलीत गैरव्यवहार प्रकरणी १६ जणांवर कारवाई’
  • Cultural
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates
  • Poilitical

‘प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह भाडे वसुलीत गैरव्यवहार प्रकरणी १६ जणांवर कारवाई’

suwarna gaware 05/03/2026
9fee2cda-2e2c-4302-aeec-002e33e81720
Spread the love

आमदार शंकर जगताप यांच्या तारांकीत प्रश्नावर एकनाथ शिंदे यांची माहिती

पिंपरी, ५ मार्च (प्रतिनिधी): पिंपरी चिंचवड महापालिकेच्या चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहाच्या भाडे व अनामत रक्कम वसुलीत तब्बल ५० लाख ७० हजार ६२६ रुपयांचा अपहार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणात महापालिकेच्या क्रीडा विभागातील प्रशासन अधिकारी आणि १५ कर्मचाऱ्यांवर कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली. आमदार शंकर जगताप यांनी याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.

प्रेक्षागृह भाड्याने देताना क्रीडा विभागातील अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार केल्याचा मुद्दा मांडण्यात आला. यात आमदार जगताप यांनी म्हंटले की, महापालिकेची शहरात पाच नाट्यगृहे व प्रेक्षागृहे आहेत. त्यामधील चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात सन २०१८-१९ ते २०२३-२४   या कालावधीत कार्यक्रमांचा हिशेबच ठेवण्यात आला नसल्याचे तपासणीत उघड झाले. या काळात प्रशासन अधिकारी व इतर कर्मचाऱ्यांनी जमा झालेल्या रकमेची महापालिकेच्या तिजोरीत भर न करता ती थेट स्वतःच्या खिशात घातल्याचे ऑगस्ट २०२३ मध्ये उघडकीस आले. वेळेत धनादेश सादर न केल्याने पालिकेचे नुकसान झाले. क्रीडा विभागाने हा अहवाल पुढील चौकशी व कारवाईसाठी प्रशासन विभागाकडे पाठविला.  सुरुवातीला सुमारे २० लाख रुपयांच्या अपहाराचा संशय होता. मात्र, तपासात हा आकडा वाढत गेला. या प्रकरणात लिपिक, मुख्य लिपिक, व्यवस्थापक, प्रशासन अधिकारी यांचीही चौकशी सुरू होती  त्यानुसार ४२  लाख ६८ हजार २१५  रुपये वसूलपात्र आणि ८  लाख ३  हजार ४११  रुपये आक्षेपाधीन ठेवण्यात आले. या पार्श्वभूमीवर आमदार जगताप यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उत्तर
याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, लेखापरीक्षणात हा प्रकार उघडकीस आला असून भाडे वसुली, अनामत रक्कम, पावत्या आणि इतर आकारांची रक्कम यामध्ये अनियमितता झाल्याचे निदर्शनास आले आहे.लेखापरीक्षणानुसार २०१८-१९ ते २०२३-२४ या कालावधीत प्रेक्षागृहातील भाडे वसुली आणि अनामत रकमेची योग्य नोंद न ठेवता पावत्यांची परस्पर विल्हेवाट लावण्यात आल्याचे आढळले. तसेच काही आर्थिक व्यवहारांमधील रक्कम महापालिकेच्या कोषागारात जमा झाल्याचे नोंदीत दिसत नसल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

यामध्ये प्रेक्षागृहातील लिपिक, मुख्य लिपिक तसेच प्रभारी व्यवस्थापक यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. या प्रकरणात एका लिपिकाला निलंबित करण्यात आले असून विभागीय चौकशी सुरू आहे. तसेच संबंधित कर्मचाऱ्यांच्या कार्यकाळाचा तपशील हजेरी पुस्तकाच्या आधारे निश्चित करण्यात आला आहे. लेखापरीक्षण अहवालानुसार संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून त्यांच्याकडून खुलासा मागविण्यात आला आहे.

या सर्व प्रकरणाची पुढील चौकशी सुरू असून दोषी आढळणाऱ्यांवर नियमांनुसार कारवाई केली जाईल, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिलेल्या लेखी उत्तरात स्पष्ट केले आहे. 

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मालमत्तांमधून मिळणारा महसूल हा जनतेचा पैसा आहे. प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहाच्या भाडे वसुलीत झालेला ५० लाख ७० हजार ६२६ रुपयांचा अपहार हा अत्यंत गंभीर प्रकार आहे. सन २०१८ पासून सुरू असलेला हा गैरव्यवहार प्रशासनाच्या डोळ्यादेखत घडला, ही चिंतेची बाब आहे. या प्रकरणी मी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता, ज्यावर सरकारने दोषींवर कारवाई सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे. केवळ एका लिपिकाचे निलंबन करून हे प्रकरण थांबणार नाही; यातील मुख्य सूत्रधार आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि अपहाराची संपूर्ण रक्कम व्याजासह वसूल केली पाहिजे. पालिकेच्या तिजोरीवर डल्ला मारणाऱ्या एकाही दोषीला सोडले जाणार नाही,  

— शंकर जगताप (आमदार, चिंचवड विधानसभा मतदारसंघ)

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 3
Tags: #shankar jagtap #चिंचवड Pcmc Pimpri and Chinchwad politics

Continue Reading

Previous: किवळे गृहप्रकल्पात मनपाच्या चुकीचा भुर्दंड कष्टकरी लाभार्थ्यांना
Next: श्रीक्षेत्र आळंदी तीर्थक्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी पाठपुरावा

Related Stories

8aaeaba2-d64b-484f-ad1c-e9fb1d4444ce
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

पुणे जिल्हा भविष्यातील ‘ग्रोथ हब’ : आमदार शंकर जगताप

suwarna gaware 06/03/2026
755ebdd8-0acd-4f61-a8ff-660516d93fec
  • Daily Breaking News
  • Poilitical

श्रीक्षेत्र आळंदी तीर्थक्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी पाठपुरावा

suwarna gaware 06/03/2026
e6134b6d-7cfb-406b-9cb8-98a0b9775544
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

किवळे गृहप्रकल्पात मनपाच्या चुकीचा भुर्दंड कष्टकरी लाभार्थ्यांना

suwarna gaware 05/03/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

पुणे जिल्हा भविष्यातील ‘ग्रोथ हब’ : आमदार शंकर जगताप 8aaeaba2-d64b-484f-ad1c-e9fb1d4444ce 1

पुणे जिल्हा भविष्यातील ‘ग्रोथ हब’ : आमदार शंकर जगताप

06/03/2026
श्रीक्षेत्र आळंदी तीर्थक्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी पाठपुरावा 755ebdd8-0acd-4f61-a8ff-660516d93fec 2

श्रीक्षेत्र आळंदी तीर्थक्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी पाठपुरावा

06/03/2026
‘प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह भाडे वसुलीत गैरव्यवहार प्रकरणी १६ जणांवर कारवाई’ 9fee2cda-2e2c-4302-aeec-002e33e81720 3

‘प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह भाडे वसुलीत गैरव्यवहार प्रकरणी १६ जणांवर कारवाई’

05/03/2026
किवळे गृहप्रकल्पात मनपाच्या चुकीचा भुर्दंड कष्टकरी लाभार्थ्यांना e6134b6d-7cfb-406b-9cb8-98a0b9775544 4

किवळे गृहप्रकल्पात मनपाच्या चुकीचा भुर्दंड कष्टकरी लाभार्थ्यांना

05/03/2026
महा. अंनिस, पिंपरी शाखेच्या प्रयत्नाने, होळीची पुरणपोळी गरीबांना दान 8a850c36-ec06-4f46-93c8-244ed5758988 5

महा. अंनिस, पिंपरी शाखेच्या प्रयत्नाने, होळीची पुरणपोळी गरीबांना दान

03/03/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

8aaeaba2-d64b-484f-ad1c-e9fb1d4444ce
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

पुणे जिल्हा भविष्यातील ‘ग्रोथ हब’ : आमदार शंकर जगताप

suwarna gaware 06/03/2026
755ebdd8-0acd-4f61-a8ff-660516d93fec
  • Daily Breaking News
  • Poilitical

श्रीक्षेत्र आळंदी तीर्थक्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी पाठपुरावा

suwarna gaware 06/03/2026
9fee2cda-2e2c-4302-aeec-002e33e81720
  • Cultural
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates
  • Poilitical

‘प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह भाडे वसुलीत गैरव्यवहार प्रकरणी १६ जणांवर कारवाई’

suwarna gaware 05/03/2026
e6134b6d-7cfb-406b-9cb8-98a0b9775544
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

किवळे गृहप्रकल्पात मनपाच्या चुकीचा भुर्दंड कष्टकरी लाभार्थ्यांना

suwarna gaware 05/03/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • पुणे जिल्हा भविष्यातील ‘ग्रोथ हब’ : आमदार शंकर जगताप
  • श्रीक्षेत्र आळंदी तीर्थक्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी पाठपुरावा
  • ‘प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह भाडे वसुलीत गैरव्यवहार प्रकरणी १६ जणांवर कारवाई’
  • किवळे गृहप्रकल्पात मनपाच्या चुकीचा भुर्दंड कष्टकरी लाभार्थ्यांना
  • महा. अंनिस, पिंपरी शाखेच्या प्रयत्नाने, होळीची पुरणपोळी गरीबांना दान

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • 402, gangotri park, dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.