


पुणे, ता.१ : ११ वी महाराष्ट्र राज्य वरिष्ठ (पुरुष व महिला) टेनिस बॉल क्रिकेट चॅम्पियनशिप स्पर्धेत पीसीएमसीच्या वरिष्ठ महिला संघाने उत्कृष्ट कामगिरी करत उपविजेतेपद पटकाविले, तर १४ वर्षांखालील मुलांच्या संघाने उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली. नागपूर डिस्ट्रिक्ट टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित या राज्यस्तरीय स्पर्धेत तब्बल ८० संघांनी सहभाग घेतला होता.

या स्पर्धेत चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनीही उल्लेखनीय सहभाग नोंदवत आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. अवनी सोनटकले, सोहम चौधरी, अनुजा अतुल पाटील, शार्दुल विनायक आमले आणि विती काब्रा या विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभागी होत शाळेचे नाव उज्ज्वल केले.
या यशस्वी संघांना आयोजन सचिव डॉ. प्रशांत चव्हाण, सचिव मुकुंद चव्हाण, सहसचिव श्री. भारत पाटील आणि श्री. रसूल शेख सर यांचे मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय क्रीडा कामगिरीबद्दल चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. ज्योतिका मल्कानी आणि चेअरमन श्री. संदीप काटे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात मिळविलेले हे यश शाळेसाठी अभिमानाची बाब असून, त्यांच्या पुढील क्रीडा वाटचालीसाठी शाळा प्रशासनाने शुभेच्छा दिल्या.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
