


पिंपरी चिंचवड, ता ३१: भारतीय जनता पार्टीचे निष्ठावान कार्यकर्ते श्री संतोष भाऊसाहेब तापकीर हे पिंपरी चिंचवड शहरामध्ये गेले ३० वर्षापासुन संघटनेमध्ये कार्यरत असून यांनी आत्तापर्यंत भोसरी – चर्होली मंडल सरचिटणीस, भोसरी-चर्होली मंडल अध्यक्ष, शहर किसान मोर्चा अध्यक्ष, कार्यकारिणी चिटणीस, उपाध्यक्ष आशा विविध म्हत्वाच्या पदावर काम करून पक्ष संघटना बळकट करण्यासाठी हातभार लावलेला आहे

असे असताना नुकत्याच जाहीर झालेल्या शहर कार्यकारीणीमध्ये ते सरचिटणीस पदासाठी इच्छुक होते परंतु पक्ष संघटनेत म्हत्वाची जबाबदारी देण्याऐवजी त्यांना कार्यकारिणी सदस्य पद देवुन त्यांचे खच्चीकरण केले गेले त्यामुळे त्यांनी आत्मदाहन करण्याचा जाहीरपणे इशारा दिला.
या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरातील भाजपच्या निष्ठावान शिर्ष नेतृत्वाने याची गंभीर दखल घेऊन प्रदेश नेतृत्वाशी संवाद साधून योग्य वेळी योग्य जबाबदारी देण्याचे आश्वासन दिले त्यामुळे श्री. संतोष तापकीर यांचा आत्मदहनाचा निर्णय स्थगित करण्यात आलेला आहे.
प्रदेश नेतृत्वा बरोबर संपर्क करत असताना भाजपाचे शहराचे शीर्ष नेतृत्वामध्ये आमदार उमाताई खापरे, मा. खासदार अमरजी साबळे, मा. प्राधिकरण अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) श्री. सदाशिव खाडे, युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष अनुप मोरे, मा. सत्तारूढ पक्ष नेते नामदेवजी ढाके, मा. उपमहापौर केशवजी घोळवे, मा. नगरसेवक माऊली थोरात, मा. सरचिटणीस शैला मोलक, संजय मंगोडकर, विजयबापू शिनकर, मंडल अध्यक्ष जयदीप खापरे, युवा सरचिटणीस सतीश नागरगोजे आदी उपस्थित होते.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
