


पिंपरी चिंचवड, ता. ३: पर्यावरणपूरक होळी साजरी केली जावी म्हणून महाराष्ट्र अंनिसतर्फे ‘होळी करा लहान, पोळी करा दान’ हा उपक्रम दरवर्षीप्रमाणे यंदाही राबवला गेला.

होळीची पोळी करू दान, बाळगू विवेकाचे भान’ लिहिलेले फलक हाती घेऊन आणि समोर बॉक्स ठेऊन महा अंनिस पिंपरी-चिंचवड शाखेचे कार्यकर्ते विविध ठिकाणी भाविकांना पोळी होळीत अर्पण करण्याऐवजी दान करण्याचे तसेच होळी लहान करण्याचे आवाहन करीत होते. त्यास चांगलाच प्रतिसाद लाभला आणि चार खोके भारतील एवढ्या पोळ्या कार्यकर्त्यांनी गोळा केल्या.
महा. अंनिसचे कार्यकर्ते भावना फुलझेले, ज्ञानेश महाजन, विकास सूर्यवंशी, राजकुमार माळी, बाळासाहेब घस्ते, मनोहर पाटील, संजय बारी, उत्तम जोगदंड यांनी या पोळ्या गोळा करून नंतर पवळे पूल, भक्ती-शक्ती चौक परिसरातील गोरगरिबांना वाटल्या.
होळीत भस्म होणार्या पोळ्या महा. अंनिसच्या उपक्रमामुळे गरीबांच्या मुखात गेल्यामुळे नागरिकांनी कार्यकर्त्यांचे कौतुक केले आणि गोरगरिबांनी आभार मानले. नागरिकांमध्ये याबाबत जागृती होत असून महा. अंनिसवाले पोळ्या घ्यायला येणार हे माहिती असल्याने काही ठिकाणी नागरिकांनी स्वतःच पोळ्या व्यवस्थित गोळा केल्याचे या वर्षी आढळून आले.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
