


गुरूंनी दिला ज्ञानरूपी वसा:
आम्ही चालवू पुढे वारसा:

पिंपरी चिंचवड, ता. २२: हिंदू गर्जना प्रतिष्ठानच्या वतीने कु.श्रावणी टोणगे हिचा सन्मान करण्यात आला. ही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या छत्रपती शाहू महाराज इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये शिकलेल्या श्रावणी ने १० वीत तब्बल ९३% गुण मिळवले.
आणि तिची युनायटेड वर्ल्ड कॉलेज (U W C) जर्मनी या आंतरराष्ट्रीय पातळीवरील संस्थेत निवड झाली असून, ती महाराष्ट्रातून एकमेव विद्यार्थिनी आहे . असे महापालिकेच्या वतीने जाहीर करण्यात आले व तब्बल १ कोटी रुपयांची शिष्यवृत्ती तिला मिळाली ही अभिमानास्पद बाब आहे.
तिच्या मेहनतीला आणि कर्तृत्वाला सलाम नाही तर तिच्या आई-वडिलांना आणि तिला मार्गदर्शन करणाऱ्या PCMC च्या सर्व शिक्षकवर्ग व कर्मचाऱ्यांनाही शतशः सलाम..!
या वेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री सुमित घाटे व किरण लोखंडे उपस्थित होते .

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
