


पिंपरी चिंचवड, ता. २२: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने २ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त विचार प्रबोधन पर्व आयोजित करणे आणि प्रबोधन पर्वाच्या नियोजनाबाबत नियोजन बैठक घेण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते राहुल कोल्हटकर यांनी आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

२ ऑक्टोंबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि दिवंगत पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती आहे. दरवर्षी पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात येते तसेच स्वच्छता सेवा पंधरवडा असा उपक्रम राबवला जातो.
भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे योगदान आणि कार्य हे देशासाठी नव्हे तर जगातील अनेक राष्ट्रासाठी प्रेरणादायी आहेत. जगात २ ऑक्टोबर हा दिवस “आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन ” म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या अहिंसेच्या विचारांचा प्रसार जगभर केला जातो त्यानिमित्ताने विविध कार्यक्रम, विचारपर्व यांचे आयोजन केले जाते.
येत्या २ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या वतीने सुद्धा विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन करण्यात यावे जेणे करून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे योगदान आणि कार्य तसेच त्याचे अहिंसेचे विचार हे शहरातील नागरिकांच्या पर्यंत या विचारपर्वाच्या माध्यमातून पोहचवले जातील.
तरी सदर निवेदनाच्या माध्यमातुन मा आयुक्त शेखर सिंह साहेब यांना विनंती आहे की , पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने २ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त विचार प्रबोधन पर्व आयोजित करण्यात यावे आणि या प्रबोधन पर्वाच्या नियोजनाबाबत नियोजन बैठक त्वरीत घेण्यात यावी.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
