


पिंपरी चिंचवड, ता. ४: पिंपरी येथील बी टी अडवाणी धर्मशाळा येथे दिनांक ३ / ७ / २५ वार रविवार रोजी सकाळी सिंधू प्रोग्रेसिव मॅट्रिमोनिअल ऑर्गनायझेशन या संस्थेच्या वतीने वधुवर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते .

याचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष कुमार मोटवानी आणि जवाहर कोटवानी यांनी केले तर वधु वर यांची नोंदणी मनोहर जेठवानी,ताहिल चुघवानी, श्रीचंद नागरानी,संतवंतकौर पंजाबी, यांनी केली कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून बाबा गोविंदराम झुलेलाल मंदिर साई चौक येथील गादी नशिन साई सोनूरामजी आणि उद्योजक दिपक पंजाबी आणि प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक परमानंद जमतानी ऍड नरेश पंजाबी हे उपस्थित होते.
यावेळी बोलताना साई सोनूरामजी यांनी सांगितले की आपला सिंधी समाज तसा इतर समाजापेक्षा छोटा असून आता समाजातील तरुण तरूणी शिक्षित होउन मोठ्या प्रमाणावर नोकरी करत आहेत त्या मुळे अशा प्रकारचे वधुवर मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहेत.
आपली भाषा, संकृती,जपली पाहिजे कारण आजकाल लव्ह जीहाद चे प्रमाण वाढले आहे माझी पालकांना विनंती आहे कि आपल्या घरामध्ये एक मेकांशी संवाद देखील वाढला पाहिजे .दिपक पंजाबी यांनी सांगितले की जर आपण आपली संस्कृती, संस्कार यांचं पालन केले पाहिजे त्या मुळे एकोपा वाढीस मदत होईल.
हा कार्यक्रम सुमारे १४० तरुण तरूणी आणि त्यांचे पालक उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे पदाधिकारी शोभा दखनेजा,हरेश भांग्या, शाम त्रिलोकचंदानी, मनीषा करमचंदानी, रमेश मोटवानी,भारत कुकरेजा , सुनील कुकरेजा, सुनील केसवानी,जाॅनी थडानी,सुरिंदर मंघवानी, अशोक पंजाबी, आदींनी परिश्रम घेतले.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️