Skip to content
11/09/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • “दिलेला शब्द पाळतो, जे बोलतो तेच करतो” – राहुल कलाटे
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates
  • Poilitical

“दिलेला शब्द पाळतो, जे बोलतो तेच करतो” – राहुल कलाटे

suwarna gaware 13/01/2026
de5c43d2-88ce-4ec9-a6b5-498d3883c69d
Spread the love

विकसित महाराष्ट्रासोबत विकसित पिंपरी-चिंचवड घडवण्याचा निर्धार व्यक्त करत मांडली प्रभाग क्रमांक २५ च्या विकासाची ७ सूत्र

पिंपरी-चिंचवड | १३ जानेवारी :पिंपरी चिंचवड महापालिका प्रभाग क्रमांक २५ च्या सर्वांगीण विकासासाठी ठोस व्हिजन आणि कामाला प्राधान्य देणारे नेतृत्व आवश्यक असल्याचे मत भाजपचे उमेदवार राहुल कलाटे यांनी व्यक्त केले. “मी बोलण्यापेक्षा कामाला प्राधान्य देतो, त्यामुळेच प्रभागाचा विकास शक्य झाला. येत्या काळात अजून विकासकामांना गती मिळेल.” असे स्पष्ट करत त्यांनी विकासकामांच्या माध्यमातून नागरिकांचा विश्वास मिळवला असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रभाग क्रमांक २५ मधून भाजपचे संपूर्ण पॅनल निवडून देण्याचे आवाहन करताना त्यांनी सहकारी उमेदवार कुणाल वाव्हळकर, रेश्मा चेतन भुजबळ, श्रुती राम वाकडकर यांना मतदान रुपी आशीर्वाद देऊन, सेवेची संधी द्यावी असे आवाहन केले. महापालिका निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित पिंपरी चिंचवड शहर घडवण्याचा निर्धार व्यक्त करत भाजपच्यावतीने प्रचाराची सांगता करण्यात आली.

राज्यातील विकासाच्या दिशेबाबत बोलताना राहुल कलाटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. “देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व विकसित महाराष्ट्रासोबत विकसित पिंपरी-चिंचवड शहर घडवेल. सक्षम नेतृत्व, स्पष्ट धोरण आणि लोकाभिमुख निर्णय यामुळेच शहराचा विकास अधिक वेगाने साध्य होईल,” असे त्यांनी नमूद केले.

त्याचप्रमाणे प्रभाग २५ साठी पुढील काळातील व्हिजन स्पष्ट करताना राहुल कलाटे यांनी नागरिकांच्या मूलभूत गरजांवर केंद्रित अजेंडा मांडला. परिसराला टँकर मुक्त पाणी पुरवठा करणे, ट्रॅफिकमुक्त रस्ते, प्रदूषणमुक्त वातावरण, सक्षम आरोग्य सुविधा तसेच शिक्षण, क्रीडा आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, नागरिकांची सुरक्षा हे या प्रभागाच्या विकासाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.

राहुल कलाटे ;
“मी दिलेला शब्द पाळतो आणि जे बोलतो तेच करून दाखवतो. लोकांच्या विश्वासावरच माझी राजकीय आणि सामाजिक जीवनातील वाटचाल सुरु आहे. केवळ आश्वासने नव्हे, तर प्रत्यक्ष कामातून बदल घडवणे हाच माझा अजेंडा आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक २५ मधील नागरिकांच्या समोर विकासाचे ७ सूत्र मांडत आहे.”

प्रभाग २५ साठी विकासाची ७ सूत्र! :
१. टँकरमुक्त प्रभाग – नियमित व पुरेसा पाणीपुरवठा
२. ट्रॅफिकमुक्त व्यवस्था – रस्ते, कनेक्टिव्हिटी, मेट्रो व पार्किंगचे नियोजन, सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था
३. प्रदूषणमुक्त परिसर – हरित व धूळ, प्रदूषण नियंत्रण उपक्रम
४. आरोग्य सुविधा संपन्न प्रभाग – दवाखाने व वैद्यकीय सेवा, परवडणाऱ्या आरोग्य सुविधांमध्ये वाढ करणे
५. शिक्षण– क्रीडा – रोजगार सुविधा संपन्न प्रभाग – सर्व वयोगटातील नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी संधी
६. कुटुंब कल्याण आणि संस्कृती रक्षण – महिला सक्षमीकरण, ज्येष्ठ नागरिकांना सुलभता होईल असे उपक्रम आणि सांस्कृतिक पुनर्जागरण
७. सुरक्षित प्रभाग – प्रभागातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध

कुणाल वाव्हळकर
“राहुल कलाटे यांच्या जनसंपर्काचा प्रचारादरम्यान भरपूर लाभ झाला. प्रभाग २५ मधील नागरिकांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास हीच आमची खरी ताकद आहे. विकास, पारदर्शकता आणि लोकांच्या प्रश्नांसाठी आम्ही एकजुटीने काम करणार आहोत. प्रचाराच्या शेवटच्या दिवसापर्यंत मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता विजयाचा आत्मविश्वास निश्चितच वाढला आहे.”

रेश्मा चेतन भुजबळ
“प्रभागातील वाकड, ताथवडे, पुनावळे परिसरात राहणाऱ्या प्रत्येक महिलांचे प्रश्न, पाणी, स्वच्छता, आरोग्य आणि सुरक्षितता या विषयांवर आम्ही ठोस भूमिका मांडली आहे. प्रचारादरम्यान मिळालेला नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद हेच सांगतो की नागरिकांना विकास हवा आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात प्रभागाचा सर्वसमावेशक विकास हाच आमचा खरा अजेंडा आहे.”

श्रुती राम वाकडकर
“प्रभाग क्रमांक २५ मधील महिलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येक घटकाच्या प्रश्नांना न्याय देणे ही आमच्या सर्वांची प्राथमिकता आहे. केवळ आश्वासनांवर नाही, तर प्रत्यक्ष कामातून विश्वास निर्माण करणे हेच भाजपाचे ध्येय आहे. राहुलदादा कलाटे यांचा अनुभव आणि प्रभागातील नागरिकांकडून मिळणारा पाठिंबा पाहता, प्रभागाचा सर्वांगीण विकास घडवण्यासाठी नागरिक आम्हाला नक्की आशीर्वाद देतील, याबाबत खात्री आहे.”

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 32
Tags: #election #Rahulkalate #Ravet #चिंचवड Pcmc Pimpri and Chinchwad politics

Continue Reading

Previous: वाकडमध्ये साकारते आहे आंतरराष्ट्रीय दर्जाचे बॅडमिंटन स्टेडियम
Next: प्रभाग क्रमांक २५ मध्ये भाजप उमेदवारांच्या प्रचाराला वेग

Related Stories

96fc4f1d-d06e-4d2a-a766-6f879ce264dd
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

किवळे गृहप्रकल्प शुल्क सवलत बाबत लवकरच निर्णय – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

suwarna gaware 10/09/2026
7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d
  • Daily Breaking News

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

suwarna gaware 10/09/2026
bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38
  • Daily Breaking News
  • Maharashtra

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

suwarna gaware 08/09/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

किवळे गृहप्रकल्प शुल्क सवलत बाबत लवकरच निर्णय – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे 96fc4f1d-d06e-4d2a-a766-6f879ce264dd 1

किवळे गृहप्रकल्प शुल्क सवलत बाबत लवकरच निर्णय – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

10/09/2026
लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर 7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d 2

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

10/09/2026
फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38 3

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

08/09/2026
निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक 4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724 4

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

03/09/2026
लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा 2ab21609-c117-42b9-9dad-ab31ab6e3cef 5

लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

02/09/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

96fc4f1d-d06e-4d2a-a766-6f879ce264dd
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

किवळे गृहप्रकल्प शुल्क सवलत बाबत लवकरच निर्णय – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

suwarna gaware 10/09/2026
7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d
  • Daily Breaking News

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

suwarna gaware 10/09/2026
bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38
  • Daily Breaking News
  • Maharashtra

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

suwarna gaware 08/09/2026
4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

suwarna gaware 03/09/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • किवळे गृहप्रकल्प शुल्क सवलत बाबत लवकरच निर्णय – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
  • लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर
  • फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश
  • निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक
  • लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • Dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.