Skip to content
17/04/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • भाविकांचे डोळे पाणावले, ‘पुढच्या वर्षी लवकर या’ च्या जयघोषात कानबाई मातेला निरोप; पिंपरी-चिंचवडमध्ये ‘खान्देश भवन’ उभारण्याची मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे मागणी
  • Cultural
  • Daily Breaking News

भाविकांचे डोळे पाणावले, ‘पुढच्या वर्षी लवकर या’ च्या जयघोषात कानबाई मातेला निरोप; पिंपरी-चिंचवडमध्ये ‘खान्देश भवन’ उभारण्याची मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे मागणी

suwarna gaware 05/08/2025
fc174adf-2d23-4dae-8b2c-b789841206dd
Spread the love

पिंपरी-चिंचवड, ५ ऑगस्ट २०२५: तीन दिवसांच्या उत्साहानंतर आज पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित ‘खान्देश सार्वजनिक श्री कानबाई माता उत्सव २०२५’ चा समारोप झाला. हजारो खान्देशी बांधवांनी ‘पुढच्या वर्षी लवकर या’ च्या जयघोषात आपल्या लाडक्या कानबाई मातेला भावपूर्ण निरोप दिला. या उत्सवाच्या निमित्ताने पिंपरी-चिंचवडमध्ये ‘खान्देश भवन’ उभारण्याची मागणी राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे करण्यात आली.

या सोहळ्याला जलसंपदामंत्री गिरीश महाजन, उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार श्रीरंग बारणे, आमदार मंगेश चव्हाण, आमदार शंकर जगताप, आमदार उमा खापरे, आमदार राजू मामा भोळे, माजी आमदार कुणाल पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. उत्सवाच्या आयोजकांनी पाहुण्यांचे स्वागत करून त्यांचा सत्कार केला. रात्री, श्री कानबाई फ्रेंड्स सर्कल ग्रुपने सादर केलेल्या भक्तिगीतांनी वातावरण भक्तिमय केले.

कानबाई उत्सवाचा उत्साह आणि ‘खान्देश भवन’ची मागणी
पिंपरी-चिंचवडमध्ये स्थायिक झालेल्या खान्देशी बांधवांसाठी हा उत्सव संस्कृती आणि परंपरेच्या जतनाचे एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरला. उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी, रविवारी आयोजित मुख्य कार्यक्रमात प्रमुख संयोजक नामदेव ढाके यांनी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना ‘खान्देश भवन’ उभारण्याची मागणी केली.

“पिंपरी-चिंचवडमध्ये खान्देशातून आलेले लाखो बांधव रोजगारासाठी आणि व्यवसायानिमित्त स्थायिक झाले आहेत. आपल्या मूळ गावापासून दूर असले तरी, आपली संस्कृती आणि परंपरा जपण्याची त्यांची इच्छा आहे. ‘खान्देश भवन’ हे अशा लोकांसाठी एक सांस्कृतिक केंद्र बनेल.

या ठिकाणी खान्देशातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, नोकरी-व्यवसायासाठी मार्गदर्शन केंद्र, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सभागृह अशा अनेक सुविधा उपलब्ध होऊ शकतील. हे भवन खान्देशी समाज बांधवांसाठी एक हक्काचे व्यासपीठ ठरेल.”, असे ढाके यांनी सांगितले. आमदार मंगेश चव्हाण, आमदार शंकर जगताप, आमदार राजू मामा भोळे यांच्यासह अनेक मान्यवर आणि खान्देशी समाज बांधवांनी या मागणीला पाठिंबा दिला.


या मागणीवर सकारात्मक प्रतिसाद देत मंत्री गिरीश महाजन म्हणाले, “पिंपरी-चिंचवडमध्ये खान्देशी बांधवांनी आपली संस्कृती जपली आहे. ‘खान्देश भवन’ची मागणी योग्य असून, यासंदर्भात लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला जाईल.” त्यांच्या या आश्वासनामुळे उपस्थितांमध्ये आनंदाची लाट पसरली.

‘पुढच्या वर्षी लवकर या’ च्या जयघोषात कानबाई मातेला निरोप
तीन दिवसांच्या उत्साहानंतर आज पिंपरी-चिंचवडमधील ‘खान्देश सार्वजनिक श्री कानबाई माता उत्सव २०२५’ चा समारोप झाला. डोळे पाणावलेल्या हजारो खान्देशी बांधवांनी ‘पुढच्या वर्षी लवकर या’ च्या जयघोषात आपल्या लाडक्या कानबाई मातेला निरोप दिला. पारंपरिक वेशभूषा आणि लोकगीतांच्या साथीने निघालेल्या विसर्जन मिरवणुकीने पिंपरी-चिंचवडमध्ये एक भावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

सकाळी ८ वाजता आहेर गार्डन, वाल्हेकरवाडी येथून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. यावेळी मिरवणुकीत शिरपूर येथील गोल्डन बँडने आपल्या सुमधुर संगीताने वातावरण अधिक भक्तिमय केले. मिरवणुकीत सहभागी झालेले पुरुष, महिला आणि लहान मुलांनी पारंपरिक अहिराणी गाण्यांवर नृत्य करत कानबाई मातेच्या जयजयकार केला. आपल्या कुलदेवतेच्या निरोपावेळी अनेकांचे डोळे भरून आले होते.

मिरवणुकीचा समारोप जाधव घाट, रावेत येथे झाला. येथे सर्व खान्देशी समाज बांधवांनी एकत्र येऊन भावपूर्ण वातावरणात कानबाई मातेचे विसर्जन केले. या उत्सवाच्या निमित्ताने पिंपरी-चिंचवडमधील सर्व खान्देशी समाज एकत्र आला. या उत्सवाने केवळ धार्मिक परंपराच नव्हे, तर खान्देशी संस्कृतीचा वारसा जपण्याची आणि पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याची प्रेरणा दिली, अशी भावना उत्सवाच्या आयोजकांनी व्यक्त केली.

या भव्य उत्सवाच्या यशस्वीतेसाठी माजी नगरसेविका शारदाताई सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते दीपक भोंडवे, जितेंद्र पाटील, हेमंत चव्हाण, शंकर पाटील, भगवान निकम, प्रदीप पटेल, विलास महाजन, मनोहर पाटील, अण्णा सावंत, भाऊसाहेब पाटील, राजेंद्र देसले, अजय गुजर, गोविंद चौधरी, महेंद्र पाटील, नरेंद्र चर्हाटे, अरविंद सैंदाणे, लीलाधर मगरे, गिरीधर पाटील, मिलिंद चौधरी, महेंद्रसिंग गिरासे, श्रीकृष्ण काळे, मनोज ब्राह्मणकर, बापूसाहेब पिंगळे, प्रकाश लोहार, किरण चौधरी, अमोल पाटील, हेमंत झोपे, निनाद खर्चे, नकुल महाजन, शरद पाटील, पंकज निकम, मोतीलाल भामरे, सोपान पाटील, शिवाजी पाटील, सुनील मराठे, कैलास रोटे, भूषण महाजन, संदीप महाजन, रवी महाजन, जयंत पाटील, सारिकाताई पवार, पियुषा पाटील, कल्पना बागुल, विजया मानमोडे, हेमंत पाटील, सचिन सानप, रवींद्र ढाके, चंद्रकांत ढाके, शशिकांत पाटील, राजेंद्र देसले, मनोहर पाटील, रुपेश पाटील, सुरेश पाटील, प्रदीप हिरे, चंद्रकांत पाटील, दीपक पाटील,दीपक महाजन, नंदू महाजन, विकास पाटील, अरविंद महाजन, योगेश महाजन, योगेश चिनावले, विशाल पाटील, शिवाजी पाटील, जगदीश पाटील, सुनील मराठे, देविदास पाटील, विजय जावळे यांसह अनेक कार्यकर्त्यांनी आणि खान्देशी बांधवांनी मोलाचे सहकार्य केले.

प्रमुख संयोजक नामदेव ढाके यांनी सर्व स्वयंसेवक, सहभागी मंडळे आणि खान्देशी बांधवांचे आभार मानले. पुढील वर्षी हा उत्सव आणखी मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 63
Tags: #girishmahajan #kahandeshutsav #Kanbai mhitsav Pcmc Pimpri and Chinchwad

Continue Reading

Previous: एक हात मदतीचा या भावनेतून मोशी कन्या शाळेतील विद्यार्थिनींना इलेमेंटरी परीक्षेचे कीटचे वाटप
Next: सिंधू प्रोग्रेसिव मॅट्रिमोनिअल ऑर्गनायझेशन या संस्थेच्या वतीने वधुवर मेळाव्याचे आयोजन उत्साहात

Related Stories

e71e5c5f-b1b6-41dd-a3b2-42a51bb41da4
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

फेरीवाल्यांचे ड प्रभागावर आंदोलन

suwarna gaware 17/04/2026
f60baa66-a41c-442e-a0c2-25b0a838465d
  • Daily Breaking News
  • Education

उत्कृष्ट निकालाची परंपरा यंदाही राखली..पिंपळे सौदागरच्या ‘Challenger Public School’ च्या विद्यार्थ्यांचे दहावी सीबीएसई परिक्षेत घवघवित यश..

suwarna gaware 16/04/2026
3215eb5b-9fb6-43ab-9782-33288c742e28
  • Daily Breaking News

वाकडमधून थेट हायवे कनेक्टिव्हिटी देणाऱ्या लिंक रस्त्यांना गती; ट्रॅफिक प्रश्न सोडवण्यासाठी राहुल कलाटे यांचे नियोजन; नगरसेवक राहुल कलाटे यांच्या १०० दिवसांच्या संकल्पातील महत्वाचा टप्पा पूर्णत्वाकडे

suwarna gaware 16/04/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

फेरीवाल्यांचे ड प्रभागावर आंदोलन e71e5c5f-b1b6-41dd-a3b2-42a51bb41da4 1

फेरीवाल्यांचे ड प्रभागावर आंदोलन

17/04/2026
उत्कृष्ट निकालाची परंपरा यंदाही राखली..पिंपळे सौदागरच्या ‘Challenger Public School’ च्या विद्यार्थ्यांचे दहावी सीबीएसई परिक्षेत घवघवित यश.. f60baa66-a41c-442e-a0c2-25b0a838465d 2

उत्कृष्ट निकालाची परंपरा यंदाही राखली..पिंपळे सौदागरच्या ‘Challenger Public School’ च्या विद्यार्थ्यांचे दहावी सीबीएसई परिक्षेत घवघवित यश..

16/04/2026
वाकडमधून थेट हायवे कनेक्टिव्हिटी देणाऱ्या लिंक रस्त्यांना गती; ट्रॅफिक प्रश्न सोडवण्यासाठी राहुल कलाटे यांचे नियोजन; नगरसेवक राहुल कलाटे यांच्या १०० दिवसांच्या संकल्पातील महत्वाचा टप्पा पूर्णत्वाकडे 3215eb5b-9fb6-43ab-9782-33288c742e28 3

वाकडमधून थेट हायवे कनेक्टिव्हिटी देणाऱ्या लिंक रस्त्यांना गती; ट्रॅफिक प्रश्न सोडवण्यासाठी राहुल कलाटे यांचे नियोजन; नगरसेवक राहुल कलाटे यांच्या १०० दिवसांच्या संकल्पातील महत्वाचा टप्पा पूर्णत्वाकडे

16/04/2026
डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये २८ वर्षीय महिला रुग्णामध्ये आढळलेल्या द्विपक्षीय फिओक्रोमोसायटोमा या दुर्मिळ आजाराचे यशस्वी उपचार 5cc080f0-551f-4ecd-931c-e6e1199d9794 4

डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये २८ वर्षीय महिला रुग्णामध्ये आढळलेल्या द्विपक्षीय फिओक्रोमोसायटोमा या दुर्मिळ आजाराचे यशस्वी उपचार

13/04/2026
शालेय साहित्य वाटप विद्यार्थी हितासाठी ? का अधिकारी आणि ठेकेदार यांच्या फायद्यासाठी ? IMG_5588 5

शालेय साहित्य वाटप विद्यार्थी हितासाठी ? का अधिकारी आणि ठेकेदार यांच्या फायद्यासाठी ?

10/04/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

e71e5c5f-b1b6-41dd-a3b2-42a51bb41da4
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

फेरीवाल्यांचे ड प्रभागावर आंदोलन

suwarna gaware 17/04/2026
f60baa66-a41c-442e-a0c2-25b0a838465d
  • Daily Breaking News
  • Education

उत्कृष्ट निकालाची परंपरा यंदाही राखली..पिंपळे सौदागरच्या ‘Challenger Public School’ च्या विद्यार्थ्यांचे दहावी सीबीएसई परिक्षेत घवघवित यश..

suwarna gaware 16/04/2026
3215eb5b-9fb6-43ab-9782-33288c742e28
  • Daily Breaking News

वाकडमधून थेट हायवे कनेक्टिव्हिटी देणाऱ्या लिंक रस्त्यांना गती; ट्रॅफिक प्रश्न सोडवण्यासाठी राहुल कलाटे यांचे नियोजन; नगरसेवक राहुल कलाटे यांच्या १०० दिवसांच्या संकल्पातील महत्वाचा टप्पा पूर्णत्वाकडे

suwarna gaware 16/04/2026
5cc080f0-551f-4ecd-931c-e6e1199d9794
  • Daily Breaking News
  • Education
  • Health

डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये २८ वर्षीय महिला रुग्णामध्ये आढळलेल्या द्विपक्षीय फिओक्रोमोसायटोमा या दुर्मिळ आजाराचे यशस्वी उपचार

suwarna gaware 13/04/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • फेरीवाल्यांचे ड प्रभागावर आंदोलन
  • उत्कृष्ट निकालाची परंपरा यंदाही राखली..पिंपळे सौदागरच्या ‘Challenger Public School’ च्या विद्यार्थ्यांचे दहावी सीबीएसई परिक्षेत घवघवित यश..
  • वाकडमधून थेट हायवे कनेक्टिव्हिटी देणाऱ्या लिंक रस्त्यांना गती; ट्रॅफिक प्रश्न सोडवण्यासाठी राहुल कलाटे यांचे नियोजन; नगरसेवक राहुल कलाटे यांच्या १०० दिवसांच्या संकल्पातील महत्वाचा टप्पा पूर्णत्वाकडे
  • डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये २८ वर्षीय महिला रुग्णामध्ये आढळलेल्या द्विपक्षीय फिओक्रोमोसायटोमा या दुर्मिळ आजाराचे यशस्वी उपचार
  • शालेय साहित्य वाटप विद्यार्थी हितासाठी ? का अधिकारी आणि ठेकेदार यांच्या फायद्यासाठी ?

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • 402, gangotri park, dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.