


पिंपरी चिंचवड, ता. २: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सावित्रीबाई फुले कन्या शाळा मोशी क्रमांक 107 मध्ये पुनावळे येथील 7 प्ल्यूमेरिया सोसायटी मधील तरुणांनी एलिमेंटरी परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या सहावी ते आठवीच्या साठ विद्यार्थिनींना चित्रकलेच्या किटचे वाटप शनिवार दिनांक 2 ऑगस्ट 2025 रोजी केले .

शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सुरेखा डांगे मॅडम नेहमी विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांसाठी व खेळासाठी प्रेरणा देत असतात आपल्या शाळेतील मुली एलिमेंट्री परीक्षेची तयारी करत आहे पण त्यांच्याकडे आवश्यक असे चित्रकलेचे साहित्य नाही हे ओळखून उर्मी संस्थेच्या सायली मॅडम यांना याविषयी खंत व्यक्त केल्यानंतर उर्मी संस्थेच्या माध्यमातून हेल्पिंग हँड या तरुणांच्या गटाशी संपर्क साधला .
मी समाजाचे काहीतरी देणे लागतो व मला समाजासाठी काहीतरी केले पाहिजे या भावनेतून 7 प्ल्युमेरिया या पुनवळे येथील सोसायटीतील काही तरुण एकत्र येऊन श्री सागर शेंडे, श्री विनोद डिगोळे, श्री श्रेयस मोहिते ,श्री अश्विन सुतार व श्री दिग्विजय राजूरकर यांनी हेल्पिंग हँड च्या माध्यमातून नेहमी समाजाला उपयोगी पडणाऱ्या सामाजिक कार्यामध्ये यांचा सहभाग असतो याच उदात्त भावनेतून मोशी कन्या शाळेत सहावी ते आठवीच्या साठ विद्यार्थिनींना चित्रकलेच्या किटचे वाटप केले .
याप्रसंगी श्री संतोष उपाध्ये सर श्री संतोष गवारे सर श्री पन्हाळे सर श्री सूर्यवंशी सर श्री अमोल भालेकर सर उपस्थित होते शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सुरेखा डांगे मॅडम यांनी सर्वांचे आभार मानून असेच पालिकेच्या शाळेतील मुलांसाठी सहकार्य असावे अशी अपेक्षा व्यक्त केली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री श्री सोमनाथ शिंदे सर यांनी केले

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️