


पिंपरी चिंचवड, ता. ३०: विकसित भारत सिद्धी से संकल्प सभा भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर शहराध्यक्ष शत्रुघन उर्फ बाप्पू काटे यांचे नेतृत्वाखाली पिंपरी, दापोडी, बोपखेल, फुगेवाडी मंडल अध्यक्ष अनिता वाळुंजकर यांनी सभेचे आयोजन शगुन चौक पिंपरी कॅम्प येथे केले.

प्रमुख वक्ते महेश कुलकर्णी हे होते. यांनी गेल्या अकरा वर्षांमध्ये मोदी सरकारने केलेली यशस्वी कामगिरी व 70 वर्षांपूर्वीचा भारत देश व अकरा वर्षात देशामध्ये झालेल्या आर्थिक सामाजिक विकास जगातील आर्थिक महासत्ता कडे वाटचाल करत भारत देश चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे दळणवळण साधने स्मार्ट सिटी डीबीटी योजना अनुदान आयुष्यमान भारत योजना योजनांची माहिती दिली.
प्रसंगी पिंपरी प्रभाग क्रमांक 21 व सिंधी समाजाचे वतीने सौ अनिता गणेश वाळुंजकर यांचा पिंपरी दापोडी फुगेवाडी बोपखेल मंडलअध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
सभेस प्रमुख उपस्थित माजी नगरसेवक संदीप वाघेरे प्रदेश कार्य सदस्य गणेश वाळुंजकर उपाध्यक्ष विशाल वाळुंजकर भटके विमुक्त अध्यक्ष गणेश ढाकणे महिला मोर्चा उपाध्यक्ष मीनाक्षी गायकवाड छाया कुदळे नितीन अमृतकर कार्यकारणी सदस्य प्रभाग अध्यक्ष जयेश चौधरी सिंधी सेवा भाषा सदस्य महाराष्ट्र राज्य मनोहर जेठवाणी अनिल तेजवानी राजू केसवानी आसवांनी राजू कानडी सुभाष सिंगल अमित कुदळे विलास घरटे धनंजय कुदळे अमित तिवारी इत्यादी प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
सभेचे प्रस्तावना अनिता वाळुंजकर व गणेश ढाकणे , मीनाक्षी गायकवाड यांनी तसेच सूत्रसंचालन हनुमान घुगे यांनी केले.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️