Skip to content
11/06/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • ३० जून पर्येंतच्या सवलतींचा जास्तीतजास्त नागरिकांना लाभ घेता यावा यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने घेतला निर्णय
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

३० जून पर्येंतच्या सवलतींचा जास्तीतजास्त नागरिकांना लाभ घेता यावा यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने घेतला निर्णय

suwarna gaware 27/06/2025
IMG_0714
Spread the love

मालमत्ता कर भरण्यासाठी शनिवार व रविवारी कॅश काऊंटर राहणार सुरू

पिंपरी २७ जून २०२५ : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मालमत्ता कर सवलतीचा जास्तीतजास्त नागरिकांना लाभ घेता यावा, यासाठी शनिवार (२८ जून) व रविवारी (२९ जून) या दोन्ही दिवशी मालमत्ता कर भरण्यासाठी कॅश काऊंटर सुरू राहणार आहेत. या दोन्ही दिवशी सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत महापालिकेच्या सर्व १८ विभागीय कर संकलन कार्यालयांमधील कॅश काऊंटर सुरू राहतील, अशी माहिती कर संकलन विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

मालमत्ता कर भरणाऱ्यांसाठी ३० जून २०२५ पर्येंत विविध सवलती देण्यात आल्या आहेत. महापालिकेच्या सिद्धी उपक्रमाअंतर्गत महिला बचत गटांमार्फत मालमत्ताधारकांना मालमत्ता कराची बिलं वेळेत वाटप करण्यात आली आहेत. तसेच, सवलतीबाबत माहिती पोहचवण्यासाठी कर संकलन विभागाकडून वारंवार एसएमएस, कॉलिंग, जनजागृती मोहिमा, होर्डिंग्स व सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत जनजागृती करण्यात येत आहे.

प्रत्येक विभागीय कार्यालयातून सहायक मंडल अधिकारी आणि गट लिपिक मालमत्ताधारकांशी थेट संवाद साधून त्यांना कर भरण्याचे आवाहन करत आहेत. या प्रयत्नांमुळे २०२५-२६ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाही अखेरीस ४३८ कोटी रुपयांचा कर भरणा झाला आहे.

महापालिकेच्या वतीने दरवर्षी आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस विविध सवलती जाहीर केल्या जातात. यंदाही या सवलतीचा लाभ घेण्यासाठी अनेक मालमत्ताधारक उत्स्फूर्तपणे पुढे आले आहेत. ऑनलाईन कर भरणा सुविधेअंतर्गत सेवा उपलब्ध असल्या तरीही अनेक नागरिक रोखीने कर भरणा करतात.

यामुळे कार्यालयांमध्ये गर्दी वाढत आहे. ही गर्दी लक्षात घेऊन शनिवार, रविवारही कॅश काऊंटर सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व मालमत्ताधारकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा आणि आपल्या योगदानाने शहराच्या विकासाला हातभार लावावा, असे आवाहन कर संकलन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
…..
१८ विभागीय कार्यालयांमधून एकूण ४३८ कोटी ३८ लाखांचे कर संकलन

वाकड – ५४ कोटी ६ लाख

थेरगाव – ४१ कोटी २९ लाख

कस्पटे वस्ती – ३३ कोटी १७ लाख

चिखली – ३३ कोटी २ लाख

भोसरी – २९ कोटी ३१ लाख

चिंचवड – २८ कोटी २८ लाख

पिंपरी-वाघेरे – २७ कोटी ७३ लाख

सांगवी – २४ कोटी ७ लाख

मनपा भवन – २३ कोटी ५६ लाख

किवळे – २९ कोटी ३१ लाख

मोशी – २५ कोटी ९ लाख

आकुर्डी – २० कोटी ३९ लाख

फुगेवाडी-दापोडी – १५ कोटी ४७ लाख

निगडी प्राधिकरण – ११ कोटी १५ लाख

तळवडे – १० कोटी ३९ लाख

चऱ्होली – १३ कोटी २७ लाख

दिघी-बोपखेल – ९ कोटी ८६ लाख

पिंपरी नगर – ३ कोटी ४५
….

पिंपरी चिंचवड महानगरपालिका आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच करदात्यांना विविध सवलती देत आहे. त्यामुळे नागरिकही स्वतःहून पुढाकार घेऊन कर भरण्यास उत्सुक आहेत. हे स्वागतार्ह असून, नागरिकांचा प्रतिसाद लक्षात घेता सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे. सध्या शहरात एकूण १८ विभागीय कार्यालयांद्वारे कर संकलन करण्यात येत असून, ऑनलाईन भरणा सुविधाही उपलब्ध आहे. तसेच कार्यालयात येऊन रोखीने कर भरणाऱ्या नागरिकांसाठी येत्या शनिवारी व रविवारी देखील कॅश काऊंटर सुरू राहणार आहेत.
-प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका
……

कोट

पिंपरी चिंचवड महापालिका आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच करदात्यांना विविध सवलती उपलब्ध करून देत आहे. यामुळे नागरिकही स्वतःहून पुढाकार घेत कर भरण्यात उत्सुक आहेत. ही बाब निश्चितच स्वागतार्ह आहे. सध्या १८ विभागीय कार्यालयांतून कर संकलन सुरू असून, ऑनलाईन तसेच रोखीने कर भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. विशेष म्हणजे आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये पहिल्या तिमाहीअखेरपर्यंत ४३८ कोटींचे संकलन झाले असून, यामध्ये वाकड विभागाने ५४ कोटी ६ लाख, थेरगावने ४१ कोटी २९ लाख, कस्पटे वस्तीने ३३ कोटी १७ लाखांचा सर्वाधिक वाटा उचलला आहे.

  • अविनाश शिंदे, सहायक आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका
    …
suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 54
Tags: #shekhar singh #tax Pcmc Pimpri and Chinchwad

Continue Reading

Previous: महापुरुषांचे विचार आत्मसात करणे ही काळाची गरज : पो. विठ्ठल साळुंखे
Next: महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांच्या इंग्रजी वाचनकौशल्य आणि शब्दसंख्येत झाली वाढ

Related Stories

Screenshot
  • Daily Breaking News
  • Maharashtra
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

अनधिकृत इमारतींना वीजजोडण्या देण्यात गैरव्यवहार: महावितरणच्या सेवा नियमांचे उल्लंघन

suwarna gaware 10/06/2026
12a8354a-5cba-479e-833e-eb9c0699d038
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

घरेलू कामगार राज्यव्यापी परिषदेत विविध ठरावांना मंजुरी

suwarna gaware 10/06/2026
c9a20d53-325a-4da4-8388-f75249c10e88
  • Daily Breaking News

निवडणूकीत लाडक्या असलेल्या बहिणी आता परक्या का झाल्या ? – काशिनाथ नखाते

suwarna gaware 05/06/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

अनधिकृत इमारतींना वीजजोडण्या देण्यात गैरव्यवहार: महावितरणच्या सेवा नियमांचे उल्लंघन Screenshot 1

अनधिकृत इमारतींना वीजजोडण्या देण्यात गैरव्यवहार: महावितरणच्या सेवा नियमांचे उल्लंघन

10/06/2026
घरेलू कामगार राज्यव्यापी परिषदेत विविध ठरावांना मंजुरी 12a8354a-5cba-479e-833e-eb9c0699d038 2

घरेलू कामगार राज्यव्यापी परिषदेत विविध ठरावांना मंजुरी

10/06/2026
निवडणूकीत लाडक्या असलेल्या बहिणी आता परक्या का झाल्या ? – काशिनाथ नखाते c9a20d53-325a-4da4-8388-f75249c10e88 3

निवडणूकीत लाडक्या असलेल्या बहिणी आता परक्या का झाल्या ? – काशिनाथ नखाते

05/06/2026
नगरसेविका सौ. कविताताई भोंगळे-पाटील यांच्या पुढाकारातून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात 1e9bbaac-5cd5-4078-851e-bd9953451c25 4

नगरसेविका सौ. कविताताई भोंगळे-पाटील यांच्या पुढाकारातून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात

05/06/2026
पोलीस आयुक्तांची तात्काळ उचलबांगडी करा : देवेंद्र तायडे 08f4fa96-6b7d-4b57-9ffd-81ade35fb5ba 5

पोलीस आयुक्तांची तात्काळ उचलबांगडी करा : देवेंद्र तायडे

01/06/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

Screenshot
  • Daily Breaking News
  • Maharashtra
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

अनधिकृत इमारतींना वीजजोडण्या देण्यात गैरव्यवहार: महावितरणच्या सेवा नियमांचे उल्लंघन

suwarna gaware 10/06/2026
12a8354a-5cba-479e-833e-eb9c0699d038
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

घरेलू कामगार राज्यव्यापी परिषदेत विविध ठरावांना मंजुरी

suwarna gaware 10/06/2026
c9a20d53-325a-4da4-8388-f75249c10e88
  • Daily Breaking News

निवडणूकीत लाडक्या असलेल्या बहिणी आता परक्या का झाल्या ? – काशिनाथ नखाते

suwarna gaware 05/06/2026
1e9bbaac-5cd5-4078-851e-bd9953451c25
  • Cultural
  • Poilitical

नगरसेविका सौ. कविताताई भोंगळे-पाटील यांच्या पुढाकारातून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात

suwarna gaware 05/06/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • अनधिकृत इमारतींना वीजजोडण्या देण्यात गैरव्यवहार: महावितरणच्या सेवा नियमांचे उल्लंघन
  • घरेलू कामगार राज्यव्यापी परिषदेत विविध ठरावांना मंजुरी
  • निवडणूकीत लाडक्या असलेल्या बहिणी आता परक्या का झाल्या ? – काशिनाथ नखाते
  • नगरसेविका सौ. कविताताई भोंगळे-पाटील यांच्या पुढाकारातून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात
  • पोलीस आयुक्तांची तात्काळ उचलबांगडी करा : देवेंद्र तायडे

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • 402, gangotri park, dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.