Skip to content
03/03/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांच्या इंग्रजी वाचनकौशल्य आणि शब्दसंख्येत झाली वाढ
  • Education
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांच्या इंग्रजी वाचनकौशल्य आणि शब्दसंख्येत झाली वाढ

suwarna gaware 27/06/2025
eb3da1ba-af1c-4c08-91b8-a50e1555edb4
Spread the love

इंग्लिश एज सेकंड लॅग्वेज (ईएसएल) उपक्रम ठरतोय उपयुक्त

पिंपरी, दि. २७ जून २०२५ : पिंपरी चिंचवड महापालिकेने २०२२ साली इयत्ता पहिली आणि दुसरीच्या वर्गापासून सुरू केलेल्या इंग्लिश एज सेकंड लॅग्वेज (ईएसएल) उपक्रमामुळे शाळांमध्ये एक सकारात्मक बदल घडतो आहे. या उपक्रमामुळे इंग्रजी हा विषय शिक्षक तसेच विद्यार्थ्यांसाठी आत्मविश्वास, अभिव्यक्ती आणि आनंदाचे माध्यम ठरत आहे. आजपर्यंत २७ हजाराहून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेला हा उपक्रम सरकारी शिक्षणातील शिक्षक संचालित बदलांचे प्रभावी उदाहरण ठरत आहे.

या उपक्रमाअंतर्गत सुमारे २०० प्राथमिक शिक्षकांना मासिक कार्यशाळांमधून प्रशिक्षण देण्यात आले आहे. यामध्ये फॉनिक्स, परस्परसंवाद, आणि प्रिंट-समृद्ध वर्गखोल्यांच्या निर्मितीवर भर देण्यात आला. हा उपक्रम शिक्षकांचा आत्मविश्वास वाढवणारा ठरत आहे. याबाबत छत्रपती शाहू महाराज प्राथमिक विद्यालयाच्या शर्मिष्ठा बाबर म्हणाल्या, ‘या उपक्रमात सहभागी झाल्यानंतर जेव्हा मला इंग्रजी प्रॅक्टिस बुक मिळाले, तेव्हा सुरूवातीपासूनच मला बदल दिसू लागला.

माझ्या वर्गातील इयत्ता पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांचे वाचनकौशल्य आणि शब्दसंपत्तीमध्ये वाढ झाली आहे. हे प्रशिक्षण कृतीवर आधारित असल्यामुळे आणि वर्गखोल्यांच्या गरजेनुसार रचना केल्यामुळे आम्हालाही इंग्रजी शिकवताना आनंद वाटत आहे.

शिक्षक केंद्रित दृष्टिकोन

इंग्रजीची भीती आता विद्यार्थ्यांनाच नाही, तर शिक्षकांनाही उरलेली नाही, असे कन्या शाळा क्र. ३१, दापोडीचे शिक्षक सागर गायकवाड यांनी नमूद केले. प्रत्येक विद्यार्थ्याला मिळणाऱ्या इंग्रजी प्रॅक्टिस बुकमुळे वाचनकौशल्य वाढले असून, ते आमच्या वार्षिक मूल्यमापनामध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे.

महापालिका शाळांमधील शिक्षकांच्या अभिप्रायावरून १० शिक्षकांनी मिळून ३०० पानी इंग्रजी प्रॅक्टिस बुक तयार केली आहे. ती तीन टप्प्यांमध्ये विभागलेली असून त्यामध्ये अक्षर ओळख, शब्द वाचन, वाक्य वाचन ते परिच्छेद वाचनापर्यंतचा समावेश करण्यात आला आहे. ही पुस्तकं अध्यापन व मूल्यमापन अशा दोन्ही गोष्टींसाठी वापरली जात आहेत.

उपक्रमाचा विस्तार आणि परिणाम

उपक्रमाच्या यशामुळे आता इयत्ता ३, ४ आणि ५ मध्येही त्याचा विस्तार करण्यात आला आहे. नवीन प्रॅक्टिस बुक्स आणि प्रशिक्षण पद्धती तयार करण्यात आल्या आहेत, ज्यामध्ये २० हून अधिक शिक्षक, टीच फॉर इंडियाचे फेलोज, विद्यार्थी आणि अधिकारी यांचे योगदान आहे.

ईएसएल तंत्रज्ञानाचा उपयोग आता इंग्रजीपुरताच न राहता मराठी व पर्यावरणशास्त्रासारख्या विषयांतही केला जात आहे. शिक्षक आता प्रश्नोत्तर पद्धती, ग्रुप स्टडी अशा विविध गोष्टींचा वापर करून शिकवण्याच्या पद्धतीत बदल करत आहेत.

उपक्रमामुळे झालेले परिवर्तन

सुरूवातीला इंग्रजीला घाबरणाऱ्या ते आत्मविश्वासाने गोष्टी सांगणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंतचा प्रवास या उपक्रमामुळे शक्य झाला आहे. शिक्षकांवर विश्वास ठेवून त्यांना आवश्यक साधने व स्वातंत्र्य दिल्यास, सार्वजनिक शिक्षणव्यवस्थेत देखील परिवर्तन घडू शकते, हे या उपक्रमातून सिद्ध झाले आहे.

उपक्रमाची पार्श्वभूमी (ठळक वैशिष्ट्ये)

• इंग्रजी शिक्षण बळकट करण्यासाठी २०२२ मध्ये सुरूवात
• २०० हून अधिक शिक्षकांना मासिक प्रशिक्षण
• ३०० पानी शिक्षक निर्मित इंग्रजी प्रॅक्टिस बुक: इयत्ता पहिली व दुसरीमधील २७,००० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांद्वारे त्याचा वापर
• पुस्तकातील तीन टप्पे: अक्षर ओळख, शब्द वाचन, वाक्य वाचन तसेच परिच्छेद वाचन
• मास्टर ट्रेनर्सद्वारे सहकार्यांना मार्गदर्शन व साधने निर्मिती: उपक्रमाच्या शाश्वततेस बळ
• क्युसीआयच्या थर्ड पार्टी मूल्यांकनात सुधारलेली इंग्रजी शैक्षणिक गुणवत्ता
• शिक्षकांचा आत्मविश्वास वाढून विद्यार्थ्यांचा तणाव कमी होऊन सार्वजनिक शिक्षणात नवचैतन्य

……

पिंपरी चिंचवड महापालिका शाळांमधील शिक्षकांचा आत्मविश्वास वाढविणे हा या उपक्रमामागचा उद्देश आहे. जेव्हा शिक्षकांना योग्य प्रशिक्षण आणि संधी दिली जाते, तेव्हा शाळांमध्ये सकारात्मक बदल घडू शकतात. या ईएसएल उपक्रमामुळे शिक्षक, विद्यार्थी यांच्या इंग्रजीमध्ये सुधारणा तर झालीच, शिवाय पालकांचा महापालिका शाळांवरील विश्वासही दृढ झाला आहे. या उपक्रमाच्या सातत्यासाठी आणि विस्तारासाठी महापालिकेने मास्टर ट्रेनर्सची टीम तयार केली आहे. हे प्रशिक्षक आपल्या सहकाऱ्यांना मार्गदर्शन तर करतातच शिवाय नवीन सामग्री तयार करून दर्जेदार अध्यापन पद्धती देखील शाळांमध्ये रुजवत आहेत.

  • शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महापालिका
    …..

पिंपरी चिंचवड महापालिकेचा इंग्लिश एज सेकंड लँग्वेज या उपक्रमाच्या यशाची टक्केवारी पाहून आगामी काळात तो ३ री ते ५ वी पर्येंतच्या विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्याचे नियोजन आहे. आता हा केवळ एक प्रकल्प राहिला नसून ती विद्यार्थ्यांच्या प्रगतीची एक चळवळ बनली आहे. विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे.

  • प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका
    ….
suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 54
Tags: #education #shekhar singh Pcmc Pimpri and Chinchwad

Continue Reading

Previous: ३० जून पर्येंतच्या सवलतींचा जास्तीतजास्त नागरिकांना लाभ घेता यावा यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने घेतला निर्णय
Next: पंडित भीमसेन जोशी संगीत अकादमी वर्धापन दिनी महोत्सवाचा समारोप

Related Stories

47e01899-2556-4828-98dc-a3dc43a85f8d
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

महिंद्रा लॉजिस्टिक लि. मध्ये ऐतिहासिक वेतनवाढ करार!

suwarna gaware 02/03/2026
271e8f1c-7c41-4b6b-b19d-af18957d12c3
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

नागपूर दुर्घटनेतील कामगारांच्या वारसांना २० लाख रुपये द्या – काशिनाथ नखाते.

suwarna gaware 01/03/2026
570a8e99-9470-4e4e-941c-83a470afda3b
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

समाविष्ट भागाला लवकरच स्वच्छ पाणीपुरवठा : आमदार महेश लांडगे

suwarna gaware 27/02/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

महिंद्रा लॉजिस्टिक लि. मध्ये ऐतिहासिक वेतनवाढ करार! 47e01899-2556-4828-98dc-a3dc43a85f8d 1

महिंद्रा लॉजिस्टिक लि. मध्ये ऐतिहासिक वेतनवाढ करार!

02/03/2026
नागपूर दुर्घटनेतील कामगारांच्या वारसांना २० लाख रुपये द्या – काशिनाथ नखाते. 271e8f1c-7c41-4b6b-b19d-af18957d12c3 2

नागपूर दुर्घटनेतील कामगारांच्या वारसांना २० लाख रुपये द्या – काशिनाथ नखाते.

01/03/2026
समाविष्ट भागाला लवकरच स्वच्छ पाणीपुरवठा : आमदार महेश लांडगे 570a8e99-9470-4e4e-941c-83a470afda3b 3

समाविष्ट भागाला लवकरच स्वच्छ पाणीपुरवठा : आमदार महेश लांडगे

27/02/2026
पवित्र पोर्टलच्या धर्तीवर प्राध्यापक आणि प्राचार्य भरती प्रक्रिया राबवा – आमदार शंकर जगताप 9fee2cda-2e2c-4302-aeec-002e33e81720 4

पवित्र पोर्टलच्या धर्तीवर प्राध्यापक आणि प्राचार्य भरती प्रक्रिया राबवा – आमदार शंकर जगताप

27/02/2026
डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अँड ग्रीन ग्रोथ’ विषयावर पाचवी आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वी 5cc080f0-551f-4ecd-931c-e6e1199d9794 5

डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अँड ग्रीन ग्रोथ’ विषयावर पाचवी आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वी

27/02/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

47e01899-2556-4828-98dc-a3dc43a85f8d
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

महिंद्रा लॉजिस्टिक लि. मध्ये ऐतिहासिक वेतनवाढ करार!

suwarna gaware 02/03/2026
271e8f1c-7c41-4b6b-b19d-af18957d12c3
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

नागपूर दुर्घटनेतील कामगारांच्या वारसांना २० लाख रुपये द्या – काशिनाथ नखाते.

suwarna gaware 01/03/2026
570a8e99-9470-4e4e-941c-83a470afda3b
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

समाविष्ट भागाला लवकरच स्वच्छ पाणीपुरवठा : आमदार महेश लांडगे

suwarna gaware 27/02/2026
9fee2cda-2e2c-4302-aeec-002e33e81720
  • Daily Breaking News
  • Poilitical

पवित्र पोर्टलच्या धर्तीवर प्राध्यापक आणि प्राचार्य भरती प्रक्रिया राबवा – आमदार शंकर जगताप

suwarna gaware 27/02/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • महिंद्रा लॉजिस्टिक लि. मध्ये ऐतिहासिक वेतनवाढ करार!
  • नागपूर दुर्घटनेतील कामगारांच्या वारसांना २० लाख रुपये द्या – काशिनाथ नखाते.
  • समाविष्ट भागाला लवकरच स्वच्छ पाणीपुरवठा : आमदार महेश लांडगे
  • पवित्र पोर्टलच्या धर्तीवर प्राध्यापक आणि प्राचार्य भरती प्रक्रिया राबवा – आमदार शंकर जगताप
  • डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अँड ग्रीन ग्रोथ’ विषयावर पाचवी आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वी

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • 402, gangotri park, dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.