Skip to content
10/09/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • संभाजी नगरमध्ये जेष्ठांचा आनंदमेळा….
  • Cultural

संभाजी नगरमध्ये जेष्ठांचा आनंदमेळा….

suwarna gaware 24/06/2025
c4bcce9f-4fab-4e30-8367-5ed82d24c5cd
Spread the love

संभाजीनगर (चिंचवड) , ता. २४ : संभाजीनगर येथील सिद्धिविनायक जेष्ठ नागरिक संघाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
सकाळच्या सत्रात सिद्धिविनायक मंदिर येथे योगासन ची प्रात्यक्षिके आयोजित करण्यात आली होती. योगशिक्षक अरविंद वाडकर यांनी योगासन व प्राणायाम यांची प्रात्यक्षिके करून दाखवले आणि योगासनांचे महत्व सांगितले. पतंजली चा अष्टांग योग जीवनाला दिशा देतो असे ते म्हणाले.

सायंकाळच्या सत्रात जेष्ठ व्याख्याते राजेंद्र घावटे यांचे “जगणे सुंदर आहे” या विषयावर व्याख्यान झाले.

राजेंद्र घावटे म्हणाले की, “मनाला मिळते ते समाधान, शरीराला मिळते ते सुख, आणि आत्म्याला मिळते तो आनंद. भौतिक सुखापेक्षा आत्मिक आनंद महत्त्वाचा आहे. आचार, विचार, आहार, विहार यांच्या द्वारे आदर्श आचरणाने जीवन सुंदर होऊ शकते. आपले जीवन आपणच सुंदर बनवू शकतो. आयुष्य हा ऊनपावसाचा, आशा निराशेचा प्रवास आहे.

आयुष्यात येणारी संकटे, अडीअडचणी, नैराश्य, दुःख, सुख, आनंद या सर्व गोष्टीमुळे जगण्याची चव वाढते. दुःखाने माणूस डोळस बनतो आणि अडचणीमुळे अनुभव वाढतात. ज्ञान, प्रज्ञा, व्यासंग आणि सत्संग यामुळे आयुष्याला उजाळा देत समृद्धीकडे वाटचाल करता येते. सिंहावलोकन करून जीवनातील प्रत्येक क्षण जपता आला पाहिजे. मृत्यू हे आयुष्याचे अंतिम आणि अटळ सत्य आहे.

त्याची भीती न बाळगता दिलेल्या आयुष्यात स्वतः आनंदी राहून दुसऱ्याला सुखी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सेवा हा धर्म मानत आंधळ्याचा डोळा, पांगळ्याचा पाय आणि अनाथांचा नाथ होता आले पाहिजे. निसर्गाचा संग, अध्यात्म, पर्यटन, कौटुंबिक जिव्हाळा, विविध छंद, सामाजिक उपक्रम, पर्यावरण संवर्धन आदींसाठी केलेले काम यातून आयुष्य जगताना उत्तम अनुभूती मिळते. आयुष्य सुंदर बनवण्यासाठी स्वतः सकारात्मक राहून मिळालेल्या प्रत्येक क्षणाचा चांगल्या पद्धतीने उपयोग करतात आला पाहिजे.” असे सांगताना घावटे अनेक उदाहरणे सांगितली.

परबती वाडकर कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी होते.
याप्रसंगी निगडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक खाडे सर यांनीही मागदर्शन केले . ते म्हणाले की , “सध्याच्या डिजिटल युगामध्ये ज्येष्ठांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे. वेगवेगळ्या लिंक व फोन कॉल मार्फत फसवणूक केली जात आहे. जेष्ठांनी कोणतीही लिंक ओपन करू नये. आपली वैयक्तिक माहिती शेअर करू नये. तसेच शेअर मार्केटचा आमिष ,पैसे दाम दुप्पट करून देतो ,बँकेचा मॅनेजर आहे केवायसी पाठवा अशा स्वरूपाचा कोणताही फोन अथवा लिंक असल्यास त्याला कोणतेही उत्तर देऊ नये. ताबडतोब ११२ या क्रमांकावर कॉल करावा.” जेष्ठांसाठी साठी तयार करण्यात आलेल्या “जेष्ठांनुबंध” या ॲप विषयी माहिती सांगून अनेक ज्येष्ठ नागरिकांना ॲप डाऊनलोड करून दिले.


याप्रसंगी निगडी पोलीस स्टेशनच्या दामिनी पथकाच्या सदस्या उपस्थित होत्या .


सिद्धिविनायक ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष परबती वाडकर यांनी संघाने गेल्या नऊ वर्षांमध्ये केलेल्या विविध कार्यक्रमांची व उपक्रमांची माहिती दिली, तसेच भविष्यात ज्येष्ठांसाठी कोणती कामे करावयाची आहेत व आरोग्य शिबिर विरंगुळा केंद्र यांची माहिती दिली .
माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे, सामाजिक कार्यकर्ते कैलास दुर्गे, आर्ट ऑफ लिविंग चे प्रशिक्षक विलास जेऊरकर, सावरकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल गोडसे, सावरकर मित्र मंडळाचे अध्यक्ष संजय कुरबेट्टी, जेष्ठ नागरिक महासंघाचे सचिव प्रा. हरिनारायण शेळके, सुनील कदम आदींची प्रमुख उपस्थिती होती.

माधव धावडेकर यांनी तिसऱ्या वेळी आणि गणेश बेल्हेकर यांनी दुसऱ्या वेळी नर्मदा परिक्रमा केल्याबद्दक विशेष सत्कार करण्यात आला. वयाची अमृतमहोत्सवी वाटचाल करत वैशिष्ट्य पूर्ण कामासाठी शिवाजी पाटील यांचाही सन्मान करण्यात आला.


कार्यक्रमाच्या संयोजनासाठी वैजनाथ स्वामी, बोराडे काका , अंकुश इंदलकर , सदाशिव आढाव, बहादूर मन्हास, शांताराम पवार, भाकरे, संपत बोत्रे, रामचंद्रन , गणेश बेलेकर, प्रभाकर शेवते, ज्ञानेश्वर बोत्रे यांनी पुढाकार घेतला.


या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघाचे सचिव दिलीप जाधव यांनी केले. आभार प्रदर्शन भिमसेन साळवी यांनी केले.

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 58
Tags: #senior citizen #चिंचवड Pcmc Pimpri and Chinchwad

Continue Reading

Previous: पुण्यातील धरणे तुडुंब भरली; दक्षता घेण्याचे आव्हान
Next: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त दोन दिवसीय विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन

Related Stories

d8c6fb7c-76a4-43d2-b1dd-d1071bc6d8ff
  • Cultural
  • Education

चॅलेंजर पब्लिक स्कूल येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

suwarna gaware 30/07/2026
a07d775e-b732-4531-9c37-2a08f0a4616f
  • Cultural

दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन

suwarna gaware 22/07/2026
249b6d4f-90f1-4aeb-99b9-55d317b30700
  • Daily Breaking News
  • Cultural

पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

suwarna gaware 14/07/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर 7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d 1

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

10/09/2026
फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38 2

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

08/09/2026
निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक 4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724 3

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

03/09/2026
लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा 2ab21609-c117-42b9-9dad-ab31ab6e3cef 4

लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

02/09/2026
क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी 3f8116cd-99ba-4589-80b4-49a26e8e58ec 5

क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

02/09/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d
  • Daily Breaking News

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

suwarna gaware 10/09/2026
bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38
  • Daily Breaking News
  • Maharashtra

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

suwarna gaware 08/09/2026
4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

suwarna gaware 03/09/2026
2ab21609-c117-42b9-9dad-ab31ab6e3cef
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

suwarna gaware 02/09/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर
  • फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश
  • निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक
  • लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा
  • क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • Dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.