


पिंपरी चिंचवड, ता. २४:

🚨🚨 महत्त्वाची सूचना🚨🚨
वडिवळे धरण
दिनांक 24 जून 2025
वेळ : 16.00 Hrs
वडिवळे धरणाच्या सांडव्यातून कुंडली नदी पात्रामधील विसर्ग वाढवून 3977 क्यूसेक्स करण्यात येत आहे. पाऊस चालू/वाढत राहिल्यास व येवा वाढत गेल्यास परिस्थितीनुसार विसर्ग कमी /जास्त करण्यात येईल.
तरी सर्वांना याद्वारे विनंती करण्यात येते की कृपया नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदीपात्रात तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत. कृपया सखल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात याव्यात व सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी.
इंजिनियर दि. म. डुबल
कार्यकारी अभियंता,
पुणे पाटबंधारे विभाग ,
पुणे
🚨🚨 महत्त्वाची सूचना🚨🚨
कासारसाई धरण
दिनांक :-२४ जून २०२५
वेळ : १०.४५ am
कासारसाई धरणाच्या सांडव्यातून कासारसाई नालापात्रात १३६० क्यूसेक्सने सुरु असणारा विसर्ग वाढवून २०४० क्यूसेक्सने करण्यात येत आहे. पाऊस चालू/वाढत राहिल्यास व येवा वाढत गेल्यास परिस्थितीनुसार विसर्ग कमी /जास्त करण्यात येईल.
तरी सर्वांना याद्वारे विनंती करण्यात येते की कृपया नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदीपात्रात तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत. कृपया सखल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात याव्यात व सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी.
हे आपल्या माहितीसाठी सविनय सादर.
इंजि.दि.म.डुबल,
कार्यकारी अभियंता,
पुणे पाटबंधारे विभाग्,
पुणे
🚨 महत्त्वाची सूचना-🚨
खडकवासला धरण
दि. 24/06/2025
खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा 3883 क्युसेक्स विसर्ग वाढवुन सकाळी 11:00 वा. 7700 क्यूसेक्स करण्यात येत आहे. आवश्यकतेनुसार बदल संभवू शकतो. कृपया नोंद घ्यावी.
तसेच पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे याची नोंद घेण्यात यावी.
माहिती साठी सविनय सादर.
श्री. मोहन शां.भदाणे
उपविभागीयअभियंता
मुठा कालवे पाटबंधारे उपविभाग,
स्वारगेट, पुणे
महत्वाची सूचना
कळमोडी धरण
दि. 24/06/2025, वेळ :- 10.30 AM
सर्वांना याद्वारे कळविण्यात येते की, कळमोडी धरण 95% इतके भरलेले आहे. सदर धरण हे “द्वाररहित” – Ungated आहे. सद्यस्थितीचा पाऊस व धरणात येणारा येवा पाहता पुढील काही तासांत कोणत्याही क्षणी कळमोडी धरण 100% भरून अनियंत्रित विसर्ग आरळा (भीमा) नदीमधे चालू होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.
तरी सर्वांना याद्वारे विनंती करण्यात येते की, सर्व नदीकाठच्या ग्रामस्थांनी नदीपात्रालगत जाऊ नये आणि नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत. तसेच संबंधित ग्रामपंचायत यांनी अनियंत्रित विसर्गाबाबत सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात येत आहे.
मो. ता. जाधवर
कार्यकारी अभियंता
चासकमान पाटबंधारे विभाग पुणे

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️