


पिंपरी चिंचवड, ता. २१: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त प्राधिकरण येथील चिंचवड बधिरमुक विद्यालयातील आवारात असलेल्या इलाईट जिम्नॅस्टिक हॉलमध्ये विद्यार्थ्यांनी विविध योगासनांचे प्रात्यक्षिक करीत योग दिन साजरा केला व योगासनांचे महत्त्व माहिती करून घेतले.

यावेळी इलाईट जिम्नॅस्टिक व फिटनेस सेंटरचे श्री चैतन्य जोशी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री गणेश टिळेकर यांनी केले तर श्रीमती पल्लवी पिंपळे यांनी आभार प्रदर्शन केले. विद्यार्थ्यांना कार्यक्रम करपल्लवीत (sign language) समजावून सांगण्याचे काम श्रीमती पठाण यांनी केले.
शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती उमा तारू यांच्या मार्गदर्शनाखाली श्री गणेश टिळेकर, श्रीमती पल्लवी पिंपळे, श्रीमती अलसबा पठाण, यांनी सदर कार्यक्रमाचे आयोजन पाहिले.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️