


पिंपरी चिंचवड, ता. २१:जागतिक योगा दिन आज पिंपरी येथील बी टी अडवाणी धर्मशाळा येथे भारतीय योग साधना या संस्थेच्या पिंपरी शाखेच्या वतीने योगा दिनाच्या निमित्ताने सामुदायिक योगा, प्राणायाम,या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते अत्यंत उत्साहात हा दिवस साजरा करण्यात आला.

पिंपरी येथील प्रत्येक शाळेत सकाळी योग प्रशिक्षण सुरू करावे असे निवेदन पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्तांना देणार. योग साधक मनोहर जेठवानी यांनी सांगितले.
यावेळी बोलताना मनोहर जेठवानी म्हणाले की २०१४ मधे देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी भारतीय संस्कृतीत शरीर स्वास्थ्य, मानसिक स्वास्थ्य,या साठी योग साधना अत्यंत महत्त्वाची आहे म्हणून त्यांनी भारतीय योगा जगामध्ये पटवून देऊन दिनांक २१ जुन हा दिवस जागतिक योगा दिन म्हणून सुरू झाला भारतीय योग साधना पिंपरी शाखा गेली अनेक वर्षे रोज सकाळी योग साधना करीत असते आज त्याला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे.
यावेळी योग साधना म्हणजे योगा, प्राणायाम प्रत्येक नागरिकाने कसा करावा याचे मार्गदर्शन संस्थेच्या मुख्य पदाधिकारी किरण रामनानी यांनी केले. संस्थेचे साधक आणि पिंपरी येथील नागरिक मोठ्या उत्साहाच्या वातावरणात उपस्थित होते.
हा योगादीनाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे पदाधिकारी मनोहर जेठवानी, किरण रामनानी,भागचंद मोटवानी, भावना पारवानी,पुजा मुलचंदानी, प्रदिप नचनानी,दयाल तलरेजा, रविना मिरानी,सुरिंदर मंघवानी, सिताराम मोरे, अरुण सर, चेतन ओछानी, महादेव घट, आणि वर्षा, श्रध्दा,हनीशा,सरला आशा आदींनी परिश्रम घेतले.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️