


मावळ, परंदवाडी ता. २१ – इंदिरा कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट, परंदवाडी येथे २१ जून रोजी ‘आंतरराष्ट्रीय योग दिना’निमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन करून हा दिवस अत्यंत उत्साहात व शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी संस्थेच्या चेअरपर्सन व चीफ मेंटॉर डॉ. तरिता शंकर मॅडम आणि अकॅडमिक ॲडव्हायझर प्रा. चेतन वाकलकर यांनी शुभेच्छा दिल्या. उल्लेखनीय बाब म्हणजे, हे दोघेही दैनंदिन जीवनामध्ये फिटनेस आणि योगसाधनेला विशेष प्राधान्य देत असतात. त्यांच्या प्रेरणादायी कार्यशैलीमुळेच संस्थेच्या प्रत्येक उपक्रमात आरोग्य व शारीरिक तंदुरुस्तीला अग्रक्रम दिला जातो.

कार्यक्रमावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. निलेश उके, उपप्राचार्य डॉ. सौमित्र दास, अकॅडमिक डीन डॉ. सौरभ गुप्ता, तसेच सर्व विभागांचे विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शारीरिक शिक्षण संचालक प्रा. अतुल गोरे यांनी योग, सूर्यनमस्कार आणि प्राणायामाचे महत्त्व विशद करत उपस्थितांना मार्गदर्शन केले. या सत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्स व डेटा सायन्स विभागप्रमुख डॉ. मंजुषा टाटिया यांनी देखील सहभाग घेऊन कार्यक्रमाची गुणवत्ता वाढवली.
‘फिटनेस क्लब’ आणि ‘एनएसएस युनिट’च्या सहकार्याने यशस्वीपणे पार पडलेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्तपणे भाग घेत योगाभ्यास केला आणि मन:पूर्वक आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️