


पुणे, ता. ६ : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त हिंदुस्थान अँटिबायोटिक लिमिटेड (एच.ए.एल ) कंपनीमध्ये विविध देशी ३० ते ३५ झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.


तसेच, एच.ए कॉलनी मध्ये देखील रोपे लावण्यात आली. हिंदुस्थान अँटिबायोटिक कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालिका नीरजा सराफ यांनी पर्यावरणाचे म्हत्व सांगितले. तसेच, सर्व कर्मचाऱ्यांसोबत प्लॅस्टिकमुक्त भारत वृक्ष संवर्धन व पर्यावरण रक्षणाची शपथ घेतली.

एच. ए. कंपनीतील अधिकारी व कर्मचारी तसेच कंपनीतील विविध संघटनांचे पदाधिकारी या सर्वांनी मोहिमेत सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपक भुजबळ वरिष्ठ अधिकारी, मानवसंसाधन व विधी यांनी केले.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️