Skip to content
10/09/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • पिंपरी-चिंचवडमध्ये जागतिक पर्यावरण दिन उत्साहात; भाजपतर्फे वृक्षारोपण आणि जनजागृती कार्यक्रमांची रेलचेल
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates
  • Poilitical

पिंपरी-चिंचवडमध्ये जागतिक पर्यावरण दिन उत्साहात; भाजपतर्फे वृक्षारोपण आणि जनजागृती कार्यक्रमांची रेलचेल

suwarna gaware 06/06/2025
a7ee1bb1-de2c-4a44-a6fc-6b54076f52a5
Spread the love


पिंपरी-चिंचवड, दि. ६ : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड शहर पर्यावरण संवर्धनाच्या संदेशाने भारले होते. भारतीय जनता पक्षाच्यावतीने शहरभर विविध संस्था, राजकीय पक्ष आणि प्रशासकीय विभागांनी सहभागाने वृक्षारोपण व जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन केले. आमदार महेशदादा लांडगे आणि आमदार शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांच्या नेतृत्वात झालेल्या या कार्यक्रमांमध्ये स्थानिक नेते, प्रशासकीय अधिकारी, नागरिक आणि पर्यावरणप्रेमींनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला.


‘शत्रुघ्न काटे युथ फाउंडेशन’तर्फे पिंपळे सौदागर येथे वृक्षारोपण
पिंपळे सौदागर येथील शिव छत्रपती लिनिअर अर्बन गार्डन येथे ‘शत्रुघ्न काटे युथ फाउंडेशन’ने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले. पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धनाचा संदेश देणारा हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्यांनी पर्यावरणाच्या संरक्षणाची गरज अधोरेखित केली आणि प्रत्येकाने वृक्षारोपण करून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी योगदान देण्याचे आवाहन केले. या प्रसंगी जयनाथ काटे, भरत काटे, प्रवीण कुंजीर, बाळकृष्ण परघळे यांच्यासह ‘ऑल सिनियर सिटीजन असोसिएशन’चे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.


‘नक्षत्र बाग वृक्षारोपण सोहळा’ पिंपरी-चिंचवडमध्ये उत्साहात संपन्न
वनस्पती आणि पर्यावरणाच्या संरक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत, पिंपरी-चिंचवड येथे ‘नक्षत्र बाग वृक्षारोपण सोहळा’ मोठ्या उत्साहात पार पडला. ‘ट्रान्सपोर्टर्स असोसिएशन पुणे’ आणि ‘विप्रा फाउंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित हा कार्यक्रम गुरुवारी सूर्यमुखी हनुमान मंदिर, ट्रान्सपोर्ट नगर, हनुमान मंदिर निगडी येथे संपन्न झाला.


या सोहळ्याला आमदार उमा खापरे, आमदार अमित गोरखे, प्रदेश सदस्य मोरेश्वर शेडगे, माजी महापौर राहुल जाधव, राजेंद्र बाबर, माजी उपमहापौर शैलजा मोरे, अजय पाताडे, तुषार हिंगे, माजी नगरसेविका शर्मिला बाबर, प्राधिकरण – चिंचवड मंडल अध्यक्ष जयदीप खापरे, प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष आनंदराव मुळुक, सुशांत मोहिते, संत ज्ञानेश्वर उद्यान हास्य परिवाराचे अध्यक्ष जगन्नाथ वैद्य, गणेश ढाकणे, नंदू कदम, बाळा शिंदे, प्रमोद भावसार, अनिल गौंड, आळंदी खंडोबा देवस्थानचे तानाजी काळभोर, सोमनाथ काळभोर, राधिका बोरालिकर, विजय शिनकर, देविदास साबळे, देविदास पाटील यांसह अनेक सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील व्यक्तींनी उपस्थिती लावली. मंडल अध्यक्ष जयदीप खापरे यांनी ‘नक्षत्र बाग’ संकल्पनेचे महत्त्व विषद केले. या उपक्रमांतर्गत विविध प्रकारच्या देशी रोपांची लागवड करण्यात आली.


रावेतमध्ये ‘माझं झाड, माझी जबाबदारी’ उपक्रमांतर्गत २५० वृक्षारोपणाचा संकल्प


जागतिक पर्यावरण दिनानिमित्त रावेत येथे ‘हरित रावेत – माझं झाड, माझी जबाबदारी’ या अनोख्या उपक्रमांतर्गत २५० झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

रावेतमधील युवक, विविध सोसायट्या, पर्यावरण संरक्षण गतीविधी गट आणि शिवछत्रपती मित्र मंडळ (सदगुरू चौक, रावेत) यांच्या संयुक्त विद्यमाने हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. पावसाळ्यादरम्यान संपूर्ण रावेत नगरीमध्ये या वृक्षांचे रोपण करण्यात येणार आहे. या उपक्रमाला सर्वांचे उत्स्फूर्त सहकार्य मिळत असून, पिंपरी चिंचवड उद्योग आघाडीचे सरचिटणीस चैतन्य देशपांडे, तसेच सत्यवान भोंडवे, दीपक तपास, तुषार निकम, शरद भुजबळ, वीरेंद्र सोनवणे, अनुया चव्हाण, ऐश्वर्या भोंडवे, यतीन पत्की, नाना भोंडवे, राजेश देशमुख, मयूर नरखडे, प्रवीण पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते.


भाजपा सांगवी-पिंपळे गुरव मंडलातर्फे वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वी
छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, मधुबन सोसायटी, जुनी सांगवी येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमात मंडळाचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. पर्यावरण संवर्धनाची गरज लक्षात घेता आज लावलेले हे रोप भविष्यात एक मोठा वटवृक्ष बनेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

या उपक्रमाचे मार्गदर्शन आमदार शंकर जगताप यांनी केले. कार्यक्रमाला नगरसेवक हर्षल ढोरे, नगरसेवक संतोष कांबळे, भाजपा उपाध्यक्ष जवाहर ढोरे, सिनेट सदस्य कृष्णा भंडलकर, भाजपा चिटणीस हिरेन सोनवणे, भाजपा कायदा आघाडी सदस्य परेश नरुटे, अविनाश गायकवाड, प्रदीप झांजुर्णे, सुभाष जाधव, जगदाळे, प्रभाग प्रमुख वैभव ढोरे, निलेश सरोदे, अतुल बडगे, ऋत्विक काची, दीपक घंगाळे, राहुल गवारी, विकी सोनवणे असे सर्वजण उपस्थित होते. भाजपा सांगवी पिंपळे गुरव मंडल अध्यक्ष गणेश ढोरे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.


वाकड परिसरात ‘पिंक सिटी रस्ता’ येथे दुकानदारांच्या सहभागातून वृक्षारोपण


जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वाकड परिसरात पिंक सिटी रस्त्यावर ठिकठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमात रस्त्याच्या बाजूचे दुकानचालक देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. माजी नगरसेवक विनायक रमेश गायकवाड, संदीप कस्पटे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हे वृक्षारोपण पार पडले. वृक्षारोपण करताना, लावण्यात आलेली सर्व झाडे दुकानदारांनी दत्तक घेऊन त्यांचे १० वर्षांपर्यंत संगोपन व काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले. या आवाहनाला सर्व दुकानचालकांनी सकारात्मक प्रतिसाद देत या उपक्रमाचे स्वागत केले.


शहरातील इतर भागांतील पर्यावरण दिन कार्यक्रम


• संत तुकाराम नगर: संत तुकाराम नगर पोलीस स्टेशन येथे वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरख कुंभार यांच्या हस्ते वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी महिला मोर्चा अध्यक्षा सुजाता पालांडे, मंडल अध्यक्ष मंगेश धाडगे, भाजपा सरचिटणीस संजय मंगोडेकर, नंदू आप्पा कदम, कुणाल लांडगे, देवदत्त लांडे, महेंद्र बाविस्कर, सुनील पालांडे, ऍड. युवराज लांडे, सुनील लांडगे, संतोष टोनगे, ऍड. दत्तात्रय झुळूक, गणेश संभेराव, अनघा रुद्र, दीपक भंडारी, संतोष दुबे, प्रज्योतसिंग हंस, अभय फाळके, राजाराम जगताप, सुरेश गदिया, सार्थ पालांडे, प्रणव शेलार, गौरव दास, ज्ञानेश्वर लोहकरे आणि मनपा वृक्ष प्राधिकरण अधिकारी घोडे आदी मान्यवर उपस्थित होते.

• कृष्णा नगर, घरकुल परिसर (प्रभाग ११): प्रभाग क्रमांक ११, कृष्णा नगर, घरकुल परिसरामध्ये जनजागृती फेरी काढण्यात आली आणि त्यानंतर स्पाईन रोड शेजारील बुद्ध विहारात वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमाचे संयोजन अजय पाताडे यांनी केले.

• इंद्रायणी नगर, नेहरूनगर मंडळ: धावडे वस्ती, इंद्रायणी नगर, नेहरूनगर मंडळात वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. शिवराज लांडगे, कविता भोंगाळे यांनी या कार्यक्रमात उपस्थिती दर्शवली.

• चिंचवडगाव (प्रभाग १८): जिजाऊ पर्यटन केंद्रात अश्विनी चिंचवडे आणि यांच्या पुढाकाराने वृक्षारोपण करण्यात आले.

• प्रभाग १३: भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे आणि आमदार महेशदादा लांडगे यांच्या सूचनेनुसार वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यामध्ये भाजप पदाधिकारी रामदास कुटे, नगरसेविका कमलताई घोलप, बाबा परब, नगरसेवक उत्तम केंदळे, चंद्रकांत शेडगे, जयश्रीताई मकवाना, सुनील राणे, किशोर मकवाना, उमेश घोडेकर आणि प्रभागातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.

• रहाटणी पिंपळे सौदागर मंडलांतर्गत: थेरगाव हॉस्पिटलसमोर वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. पद्मश्री आणि अर्जुन पुरस्कार विजेते मुरलीधर पेटकर, क्षेत्रीय अधिकारी किशोर ननवरे, नगरसेवक अभिषेक बारणे, तानाजी बारणे, आरोग्य निरीक्षक दरोडे, मेजर रणदिवे आणि आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सोमनाथ तापकीर यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले.


या सर्व कार्यक्रमांच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवडकरांनी पर्यावरणाबद्दलची आपली बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखित केली, ज्यामुळे शहरात हरित आणि स्वच्छ पर्यावरणाचा संदेश अधिक प्रभावीपणे पोहोचला.

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 143
Tags: #bjp #shatrugn kate Pcmc Pimpri and Chinchwad

Continue Reading

Previous: चाकण येथे संस्कार प्रतिष्ठानकडून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण
Next: विविध नागरी समस्यांवर आमदार शंकर जगताप व आयुक्त शेखर सिंह यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक

Related Stories

7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d
  • Daily Breaking News

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

suwarna gaware 10/09/2026
bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38
  • Daily Breaking News
  • Maharashtra

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

suwarna gaware 08/09/2026
4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

suwarna gaware 03/09/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर 7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d 1

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

10/09/2026
फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38 2

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

08/09/2026
निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक 4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724 3

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

03/09/2026
लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा 2ab21609-c117-42b9-9dad-ab31ab6e3cef 4

लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

02/09/2026
क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी 3f8116cd-99ba-4589-80b4-49a26e8e58ec 5

क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

02/09/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d
  • Daily Breaking News

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

suwarna gaware 10/09/2026
bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38
  • Daily Breaking News
  • Maharashtra

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

suwarna gaware 08/09/2026
4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

suwarna gaware 03/09/2026
2ab21609-c117-42b9-9dad-ab31ab6e3cef
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

suwarna gaware 02/09/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर
  • फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश
  • निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक
  • लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा
  • क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • Dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.