


पिंपरी, दि. ६: जुन्नर वनविभाग वनपरिक्षेत्र चाकण आणि संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पिंपरी चिंचवड शहर यांच्या संयुक्त विद्यमाने मेदनकरवाडी चाकण येथे वनजमिनी वरती 5000 झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले यामध्ये कांचन बेहडा आवळा पिंपळ सिताफळ कवट कडूलिंब अशा विविध जातींच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.

यामध्ये विविध संस्थांचे आणि कंपनीचे कर्मचारी सहभागी झाले होते. सुरुवातीला संस्कार प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ.मोहन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कार्याध्यक्ष श्री राजेंद्र फडतरे यांच्या हस्ते वृक्षाचे पूजन करण्यात आले.
वन परिमंडळ अधिकारी पी आर अहिर, बॉस कंपनीचे हेड श्रीयुत पारेख,वनक्षेत्र अधिकारी चाकण संतोष कंक, सिने अभिनेत्री आर्या घारे, वन अधिकारी रावसाहेब चौरे, चाकणचे पोलीस निरीक्षक टी आर घार्गे, संस्कार प्रतिष्ठानचे सभासद सायली सुर्वे संध्या स्वामी विजय आगम मनीषा आगम सिद्धी ढेरे कविता वाल्हे, पल्लवी नायक, स्तुती सोमवंशी, बाल स्वयंसेवक कु.मीरा कदम यांनी सहभाग घेतला होता

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️