Skip to content
12/06/2025
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड़ .com

टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड़ .com

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

cropped-images.jpeg

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2024
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • विविध नागरी समस्यांवर आमदार शंकर जगताप व आयुक्त शेखर सिंह यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक
  • Daily Breaking News
  • Poilitical

विविध नागरी समस्यांवर आमदार शंकर जगताप व आयुक्त शेखर सिंह यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक

suwarna gaware 06/06/2025
a2a1f066-5bc1-421c-8aca-67e222fadba2
Spread the love

पिंपरी, ६ जून – पिंपरी-चिंचवड शहरातील नागरी समस्या, विकास प्रकल्प, वाहतूक आणि पायाभूत सुविधांसंदर्भातील अनेक मुद्यांवर आमदार शंकर जगताप आणि महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्यात विस्तृत चर्चा झाली. या बैठकीत महापालिकेच्या विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीस सहआयुक्त प्रदीप जांभळे पाटील, शहर अभियंता मकरंद निकम, उपायुक्त मनोज लोणकर, पाणीपुरवठा व स्थापत्य विभागाचे प्रमुख अभियंता प्रमोद ओंबासे, सहशहर अभियंता देवअण्णा गट्टूवार व बापू गायकवाड, नगररचना विभागाचे उपसंचालक प्रसाद गायकवाड, पर्यावरण विभागाचे प्रमुख अभियंता संजय कुलकर्णी, मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, सहशहर अभियंता मनोज शेटीया आणि स्मार्ट सिटीचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव यांच्यासह संबंधित अधिकारी सहभागी झाले होते.

बैठकीत खालील प्रमुख मुद्यांवर चर्चा झाली:

  • मोरया गोसावी मंदिरासमोरील दगडी रस्ता आणि पार्किंगची देखभाल व दुरुस्ती
  • राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) ने महानगरपालिकेला ताथवडे पुनावळे वाकड परिसरातील सर्विस रस्त्याजवळील नाले कलव्हर्ट इत्यादी मोकळे व स्वच्छ करण्याबाबत केलेला पत्रव्यवहार. त्या दृष्टीने कारवाई करून पावसाळ्यात अंडरपास खाली जमणारे पाण्याचा निचरा करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याबाबत.
  • रिलायन्स कंपनीतर्फे दुरुस्तीच्या नावाखाली शहरातील फुटपाथ व इतर ठिकाणी टाकण्यात आलेल्या केबल्समुळे महानगरपालिकेचे कोट्यवधी रुपयांचे झालेले नुकसानाची चौकशी संदर्भात कारवाई
  • महापालिका शिक्षकांच्या विविध मागण्या
  • कल्पतरू पिंपळे गुरव, पी.के चौक पिंपळे सौदागर, काळेवाडी अंडरपास व एमएम चौक पूल संदर्भातील प्रश्न
  • काळेवाडी चौकातील शिवसृष्टी ट्राफिक आयलंडचे काम सुरू करण्याचे नियोजन
  • वृक्षारोपणासाठी प्राईड पर्पलला देण्यात आलेली जागा भाडेपट्टा करार रद्द करून ताब्यात घेणे.
  • काळेवाडी एम एम चौक येथे ग्रेड सेपरेटर करणे
  • काळेवाडीत ‘लेफ्ट फ्री’ मार्गांची अंमलबजावणी
  • पशुसंवर्धन जागेत पार्क आणि रिव्हर फ्रंट रिझर्वेशन योजनेबाबत प्रगती
  • पुनावळे येथे ऑक्सीजन पार्क
  • नवविकसित गावांमध्ये पाण्याच्या टाक्यांसाठी आरक्षणाची पुनर्तपासणी
  • भूमकर चौकात प्रत्यक्ष पाहणी करुन पुन्हा आढावा घेण्याचा निर्णय
  • भूमकर चौकात ड्रेनेज लाईन टाकून दिल्यास वाहतुकीच्या दृष्टीने जागा ताब्यात येऊन वाहतूक समस्या सुटण्यास मदत होईल.
  • मेट्रो प्रकल्पासाठी काळा खडक येथील जुना जकात नाका ते वाकड पोलीस चौकी पर्यंत रस्ते काम आणि अतिक्रमण हटवण्याची सूचना
  • ताथवडे- पुनावळे रस्त्याच्या कामाची गती
  • प्रारूप विकास आराखड्याचे भाषांतर मराठीत करण्याची मागणी
  • एसटीपी कनेक्शन रद्द केल्यामुळे सोसायट्यांमध्ये निर्माण झालेला गोंधळ
  • वाल्हेकरवाडी स्मशानभूमीच्या मेरी या संस्थेचे सर्वेक्षण अहवाल आला असून त्या अनुषंगाने कामाचा आढावा

या बैठकीत नागरी समस्यांवर त्वरित उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला. आमदार शंकर जगताप यांनी अधिकाऱ्यांना दिलेल्या सूचना लवकरात लवकर प्रत्यक्षात आणण्याचा आग्रह धरला. तसेच नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने बैठका घेण्यात येतील, असेही ते म्हणाले.

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 10
Tags: #civic issues #shankar jagtap #shekhar singh Pcmc Pimpri and Chinchwad

Continue Reading

Previous: पिंपरी-चिंचवडमध्ये जागतिक पर्यावरण दिन उत्साहात; भाजपतर्फे वृक्षारोपण आणि जनजागृती कार्यक्रमांची रेलचेल
Next: वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या चिखली-पाटीलनगर येथील ट्रान्सफॉर्मरचे स्थलांतर!

Related Stories

8c184321-adce-4f82-bcb1-d257886188ea
  • Daily Breaking News
  • Maharashtra

Green Municipal Bonds : पिंपरी-चिंचवड महापालिका ठरली देशात पहिली!

suwarna gaware 10/06/2025
a2786f7b-00aa-4920-8b67-da9187ffe93b
  • Daily Breaking News
  • Education
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

राजेश आगळे यांची महापालिका कायदा सल्लागार पदी नियुक्ती

suwarna gaware 10/06/2025
IMG_0807
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

गुरुवार व शुक्रवार दोन दिवस पाणी पुरवठा बंद

suwarna gaware 10/06/2025

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

मित्रत्व हे ‘माझी जीवनगंगा’चे बलस्थान! – राजन लाखे a277baea-4e68-42d3-887b-059551040c3e 1

मित्रत्व हे ‘माझी जीवनगंगा’चे बलस्थान! – राजन लाखे

11/06/2025
इंद्रायणीच्या साक्षीने ‘कृष्णार्पण’चे प्रकाशन संपन्न 0174ce86-6568-449b-9119-3e944503b282 2

इंद्रायणीच्या साक्षीने ‘कृष्णार्पण’चे प्रकाशन संपन्न

10/06/2025
अभिनव गगन स्पोर्ट्स क्लब व हिंदवी मित्र मंडळ यांच्या वतीने कासारवाडी येथे गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ fb8f5bd4-fc47-498e-9dd7-9332fdc99961 3

अभिनव गगन स्पोर्ट्स क्लब व हिंदवी मित्र मंडळ यांच्या वतीने कासारवाडी येथे गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ

10/06/2025
Green Municipal Bonds : पिंपरी-चिंचवड महापालिका ठरली देशात पहिली! 8c184321-adce-4f82-bcb1-d257886188ea 4

Green Municipal Bonds : पिंपरी-चिंचवड महापालिका ठरली देशात पहिली!

10/06/2025
वडाच्या झाडाचे रोपे देऊन महात्मा फुले नगर मध्ये वटपौर्णिमा सण उत्साहात साजरा 3a6d56bb-1c57-4471-b407-527ff51dd4a0 5

वडाच्या झाडाचे रोपे देऊन महात्मा फुले नगर मध्ये वटपौर्णिमा सण उत्साहात साजरा

10/06/2025

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

a277baea-4e68-42d3-887b-059551040c3e
  • Cultural
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

मित्रत्व हे ‘माझी जीवनगंगा’चे बलस्थान! – राजन लाखे

suwarna gaware 11/06/2025
0174ce86-6568-449b-9119-3e944503b282
  • Cultural

इंद्रायणीच्या साक्षीने ‘कृष्णार्पण’चे प्रकाशन संपन्न

suwarna gaware 10/06/2025
fb8f5bd4-fc47-498e-9dd7-9332fdc99961
  • Education
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

अभिनव गगन स्पोर्ट्स क्लब व हिंदवी मित्र मंडळ यांच्या वतीने कासारवाडी येथे गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ

suwarna gaware 10/06/2025
8c184321-adce-4f82-bcb1-d257886188ea
  • Daily Breaking News
  • Maharashtra

Green Municipal Bonds : पिंपरी-चिंचवड महापालिका ठरली देशात पहिली!

suwarna gaware 10/06/2025

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • मित्रत्व हे ‘माझी जीवनगंगा’चे बलस्थान! – राजन लाखे
  • इंद्रायणीच्या साक्षीने ‘कृष्णार्पण’चे प्रकाशन संपन्न
  • अभिनव गगन स्पोर्ट्स क्लब व हिंदवी मित्र मंडळ यांच्या वतीने कासारवाडी येथे गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ
  • Green Municipal Bonds : पिंपरी-चिंचवड महापालिका ठरली देशात पहिली!
  • वडाच्या झाडाचे रोपे देऊन महात्मा फुले नगर मध्ये वटपौर्णिमा सण उत्साहात साजरा

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • 402, gangotri park, dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.