Skip to content
04/06/2025
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड़ .com

टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड़ .com

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

cropped-images.jpeg

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2024
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • नागरिकांना आता अॅपद्वारे नोंदवता येणार खड्ड्यांची तक्रार
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

नागरिकांना आता अॅपद्वारे नोंदवता येणार खड्ड्यांची तक्रार

suwarna gaware 01/06/2025
406b8ad1-49c4-4d4d-9d11-01f212f3d810
WhatsApp Image 2025-03-24 at 8.48.54 AM
Spread the love

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा नाविन्यपूर्ण उपक्रम, खड्डे व्यवस्थापन प्रणाली करण्यात आली विकसित

पिंपरी, १ जून : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने खड्डे व्यवस्थापन प्रणाली विकसित केली असून आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर ती सुरू करण्यात येणार आहे. या अंतर्गत ‘पॉटहोल मॅनेजमेंट’ हे नाविन्यपूर्ण अॅप विकसित करण्यात आले असून नागरिकांना या अॅपद्वारे खड्ड्यांची तक्रार नोंदवता येणार आहे, अशी माहिती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची मान्सूनपूर्व तयारी युद्धपातळीवर सुरू आहे. पावसाळ्यामध्ये खड्ड्यांची समस्या सातत्याने उद्भवते. या समस्येवर उपाय म्हणून महानगरपालिकेने पॉटहोल अॅप विकसित केले आहे. या अॅपमुळे खड्डयांची तक्रार नोंदवणे आणि त्या तक्रारींचे निराकरण करण्याची प्रक्रिया सोपी व सुलभ होणार आहे. नागरिक या अॅपद्वारे खड्ड्याची तक्रार नोंदवू शकतात, आणि त्या तक्रारीच्या निराकरणाविषयी अद्ययावत माहिती मिळवू शकतात.

नागरिकांना अशी नोंदवता येणार तक्रार

अॅपद्वारे खड्ड्याची तक्रार नोंदवण्यासाठी नागरिकांना प्रथम पॉटहोल अॅपमध्ये लॉगिन करावे लागणार आहे. त्यानंतर नागरिक खड्याचे फोटो काढून त्याच्या स्थानासह (Geo Location) ते अपलोड करू शकतात. ही माहिती आपोआप संबंधित विभागातील कनिष्ठ अभियंत्यांना त्यांच्या प्रभागानुसार पाठवली जाईल. याच वेळी ती माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही पाठवली जाईल. तक्रारी नोंदवल्यानंतर तिचे निराकरण करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्याकडे दिली जाईल.

दिलेल्या तक्रारीचे निराकरण झाले नाही, तर त्या भागातील वरिष्ठ अधिकारी यांना ईमेल व संदेश पाठवण्यात येईल. एखादी तक्रार कनिष्ठ अभियंता यांच्या अधीन नसल्यास ती महानगरपालिकेच्या ज्या विभागाशी आहे, त्या संबंधित विभागाकडे पाठवण्यात येईल. तक्रारीचे निराकरण संबंधित विभाग किंवा अभियंता यांनी केल्यानंतर ती तक्रार अॅपमध्ये बंद केली जाईल आणि तक्रारदारास फोटोसह निराकरणाची माहिती ईमेल / संदेशाद्वारे कळवली जाईल.
…….
मोबाईल अॅप डाऊनलोड करा

  1. Smart Sarathi PCMC Mobile Application आपल्या मोबाईलवर Google Play Store किंवा Apple App Store वरून डाऊनलोड करा (जर आधीपासून इंस्टॉल नसेल तर).
  2. अॅपमध्ये PCMC Services विभागात जाऊन “Report Pothole / खड्‌डे नोंदवा” App निवडा. यामु‌ळे आपल्याला अॅप स्टोअरवर रिडायरेक्ट केले जाईल.
  3. थेट अॅप स्टोअरमध्ये “PCMC Pothole Management” असे शोधून अॅप डाऊनलोड करता येईल.
  4. किंवा खालील QR कोड वापरुन मोबाइल अप्लिकेशन डाउनलोड करू शकता
    ……
    नोंदणी करा आणि ईमेल OTP दवारे प्रमाणीकरण कराः
  5. युजरनेम आणि पासवर्ड (आपण ठरवलेले)
  6. पूर्ण नाव
  7. मोबाईल नंबर व ई-मेल आयडी
  8. Send OTP” या बटणावर क्लिक करा आणि ईमेलवर आलेला OTP टाकून नोंदणी पूर्ण करा.
    ………

तक्रार कशी नोंदवायची आणि तक्रार ट्रॅकिंग कशी करता येईल?

  1. मोबाईलमध्ये लोकेशन सर्व्हिसेस ऑन करा.
  2. “Zoom GPS Location” वर क्लिक करून सध्याचे लोकेशन पहा. आणि नकाशावर खड्ड्‌याचे स्थान निवडा. व जवळचा ओळखण्याजोगा पत्ता/संदर्भ दया.
  3. समस्या प्रकार निवडा (उदा. कमी खोल खड्‌डा, खोल खड्‌डा, चैबर डॅमेज, युटिलिटी ट्रैच डॅमेज, इ.).
  4. अंदाजे लांबी व रुंदी (मीटरमध्ये) प्रविष्ट करा.
  5. खड्ड्याचे स्पष्ट फोटो अपलोड करा. आणि तक्रार सबमिट करा. आपल्याला एक युनिक तक्रार क्रमांक (Complaint ID) दिला जाईल, ईमेलद्‌वारे ट्रैकिंग लिंकसह पुष्टीकरण मिळेल.

(https://gisapp0824.giscdn.net/PotHoleManagementPCMC/complaint-status)

ही तक्रार संबंधित PCMC अभियंत्याकडे पाठवली जाईल, जे योग्य ती कारवाई करतील किंवा ती दुसऱ्या संबंधित विभागाकडे पाठवतील. काम पूर्ण झाल्यानंतरचा फोटो व काम पूर्ण झाल्याचा अहवान आपल्या नोंदणीकृत ईमेलवर पाठवला जाईल.
……

कोट

पिंपरी चिंचवड शहरातील रस्ते खड्डेमुक्त असावेत, यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका सातत्याने प्रयत्नशील आहे. नागरिकांना देखील महानगरपालिका हद्दीत असणाऱ्या रस्त्यांवरील खड्ड्यांची तक्रार सहज करता यावी, यासाठी खड्डे व्यवस्थापन प्रणाली सुरू करण्यात येत आहे. खड्डे व्यवस्थापन प्रक्रियेमध्ये पारदर्शकता, जबाबदारी आणि कार्यक्षमतेची वाढ करून रस्ते अधिक सुरक्षित व सुरळीत करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

  • शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

……

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 9
Tags: #pathole #shekhar singh Pcmc Pimpri and Chinchwad

Continue Reading

Previous: तिसरा “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर गौरव पुरस्कार” बारामतीच्या 70 वर्षीय लता भगवान करे यांना प्राप्त
Next: आता थांबायचं नाय’ चित्रपटाद्वारे सफाई सेवकांमध्ये नवचेतना निर्माण करण्याचा प्रयत्न

Related Stories

0272844d-1526-4075-b32a-9a7b5df8b536
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

दापोडीत शून्य कचरा प्रकल्प चालवला जातोय महिला बचत गटामार्फत

suwarna gaware 03/06/2025
Official_Logo_of_PCMC
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

हरित कर्ज रोख्यांतून निधी उभारणारी पिंपरी चिंचवड ठरली राज्यातील पहिली महापालिका!

suwarna gaware 03/06/2025
7f565d00-923e-49ae-adf4-0f8242b4b983
  • Daily Breaking News
  • Poilitical

स्व. गोपीनाथ मुंडे यांना पिंपरी चिंचवड भाजप च्यावतीने अभिवादन

suwarna gaware 03/06/2025

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

दापोडीत शून्य कचरा प्रकल्प चालवला जातोय महिला बचत गटामार्फत 0272844d-1526-4075-b32a-9a7b5df8b536 1

दापोडीत शून्य कचरा प्रकल्प चालवला जातोय महिला बचत गटामार्फत

03/06/2025
हरित कर्ज रोख्यांतून निधी उभारणारी पिंपरी चिंचवड ठरली राज्यातील पहिली महापालिका! Official_Logo_of_PCMC 2

हरित कर्ज रोख्यांतून निधी उभारणारी पिंपरी चिंचवड ठरली राज्यातील पहिली महापालिका!

03/06/2025
स्व. गोपीनाथ मुंडे यांना पिंपरी चिंचवड भाजप च्यावतीने अभिवादन 7f565d00-923e-49ae-adf4-0f8242b4b983 3

स्व. गोपीनाथ मुंडे यांना पिंपरी चिंचवड भाजप च्यावतीने अभिवादन

03/06/2025
फेरीवाला कायद्याच्या अंमलबजावणीसाठी बैठकीचे आयोजन करावे : काशिनाथ नखाते f790e38e-4340-4d80-9ecd-d46415d32236 4

फेरीवाला कायद्याच्या अंमलबजावणीसाठी बैठकीचे आयोजन करावे : काशिनाथ नखाते

03/06/2025
आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ प्रतिसादासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती Official_Logo_of_PCMC 5

आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ प्रतिसादासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती

03/06/2025

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

0272844d-1526-4075-b32a-9a7b5df8b536
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

दापोडीत शून्य कचरा प्रकल्प चालवला जातोय महिला बचत गटामार्फत

suwarna gaware 03/06/2025
Official_Logo_of_PCMC
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

हरित कर्ज रोख्यांतून निधी उभारणारी पिंपरी चिंचवड ठरली राज्यातील पहिली महापालिका!

suwarna gaware 03/06/2025
7f565d00-923e-49ae-adf4-0f8242b4b983
  • Daily Breaking News
  • Poilitical

स्व. गोपीनाथ मुंडे यांना पिंपरी चिंचवड भाजप च्यावतीने अभिवादन

suwarna gaware 03/06/2025
f790e38e-4340-4d80-9ecd-d46415d32236
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

फेरीवाला कायद्याच्या अंमलबजावणीसाठी बैठकीचे आयोजन करावे : काशिनाथ नखाते

suwarna gaware 03/06/2025

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • दापोडीत शून्य कचरा प्रकल्प चालवला जातोय महिला बचत गटामार्फत
  • हरित कर्ज रोख्यांतून निधी उभारणारी पिंपरी चिंचवड ठरली राज्यातील पहिली महापालिका!
  • स्व. गोपीनाथ मुंडे यांना पिंपरी चिंचवड भाजप च्यावतीने अभिवादन
  • फेरीवाला कायद्याच्या अंमलबजावणीसाठी बैठकीचे आयोजन करावे : काशिनाथ नखाते
  • आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ प्रतिसादासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • 402, gangotri park, dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.