Skip to content
11/06/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • महापालिकेच्या अधिकृत नळजोडीवर थेट विद्युत मोटर/पंप जोडणाऱ्या ६० जणांवर दंडात्मक कारवाई
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

महापालिकेच्या अधिकृत नळजोडीवर थेट विद्युत मोटर/पंप जोडणाऱ्या ६० जणांवर दंडात्मक कारवाई

suwarna gaware 21/04/2025
IMG_0807
Spread the love

पाणीपुरवठा विभागाच्या भरारी पथकाने शहरात सुरु केली दंडात्मक कारवाई मोहीम

पिंपरी, २१ एप्रिल २०२५ : शहरातील नळजोडणीवर अनधिकृतपणे थेट विद्युत मोटर/पंप जोडणाऱ्या ६० विद्युत पंप धारकांवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत महानगरपलिका नियमावलीतील नियम क्र. १५ नुसार कारवाई करण्यात आली. महापालिका अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या सूचनेनुसार नळजोडणीवर अनधिकृत विद्युत पंप जोडणाऱ्यावर कारवाई करण्यासाठी भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. या अंतर्गत ही कारवाई करण्यात आली.

शहरातील ब क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत येणाऱ्या चिंचवड, बळवंतनगर, शिवनगरी, साईराज कॉलनी, ग क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत येणाऱ्या रहाटणी परिसरातील अमृतवेल कॉलनी, फ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या मोरे वस्ती भागातील भावेश्वरी व श्री कुंज कॉलनी, सांगवी परीसरातील गणेशनगर, राजारामनगर, समतानगर, पवनानगर तसेच दापोडी परिसरातील गुलाबनगर, पवार वस्ती एसएमएस कॉलनी, नव भारत नगर या परिसरात पाणी पुरवठा विभागाच्या भरारी पथकाने ही कारवाई केली.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका पाणीपुरवठा विभागामार्फत शहरातील पाणीपुरवठा सुरळीत राहावा, यासाठी विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणी वापरात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. त्यामुळे मनपाच्या नळजोडीवर थेट विद्युत मोटर/पंप जोडल्यास उंच भागात पाणी कमी दाबाने पोहोचत आहे आणि नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. महानगरपलिका नियमावलीतील नियम क्र. १५ नुसार, मनपाच्या अधिकृत नळजोडीवर थेट विद्युत मोटर/पंप जोडण्यास मनाई आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर मनपा कठोर कारवाई करीत आहे.

चिंचवड मधील बळवंतनगर, शिवनगरी, साईराज कॉलनी परिसरातील अनधिकृत पणे थेट नळाला जोडलेले २१ विद्युत पंपांचे संच पाणी पुरवठा व ब क्षेत्रीय कार्यालयामार्फत जप्त करण्यात आले. या कारवाई वेळी उपअभियंता प्रविण धुमाळ, कनिष्ठ अभियंता ऋषिकेश गेंगजे , रघुनाथ शेमले, तुषार सव्वासे, साधना ठोंबरे, स्था. अभि. सहाय्यक मदन फंड उपस्थित होते.

ग क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या रहाटणी परिसरातील अमृतवेल कॉलनी भागात थेट नळाला जोडलेले ११ विद्युत पंप पाणीपुरवठा विभाग ग क्षेत्रिय कार्यालय मार्फत जप्त करण्यात आले. तसेच १ इंचाचे १ अनधिकृत नळजोड बंद करण्यात आले. कनिष्ठ अभियंता समिक्षा मालपुरे यांच्या नेतृत्वात पाणीपुरवठा विभागाचे प्लंबर आणि कर्मचारी यांनी कारवाई केली आहे.

फ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या मोरे वस्ती भागातील भावेश्वरी व श्री कुंज कॉलनी भागात थेट नळाला जोडलेले १० विद्युत पंप पाणीपुरवठा विभाग फ क्षेत्रिय कार्यालय मार्फत जप्त करण्यात आले . ही कारवाई कनिष्ठ अभियंता सचिन लोणे व ओम इंगोले व त्यांच्या पाणीपुरवठा विभागाचे प्लंबर आणि कर्मचारी यांनी केली आहे.

सांगवी परीसरातील गणेशनगर, राजारामनगर, समतानगर, पवनानगर तसेच दापोडी परिसरातील गुलाबनगर, पवार वस्ती एसएमएस कॉलनी, नव भारत नगर येथील १८ अनधिकृत विद्युत पंप जप्त करण्यात आले. यावेळी उपभियांता चंद्रकांत मोरे, कनिष्ठ अभियंता सागर पाटील, संदीप ढेपले, सोनाली खेमनर, अभियांत्रिकी सहाय्यक प्रतीक्षा बढीये, अजय मखारे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

कोट-
सध्या उन्हाळ्याच्या दिवसात नागरिकांनी पाणी जपून वापरावे. तसेच नळजोडणीला अनधिकृत पद्धतीने मोटार जोडून पाणी उपसा करणाऱ्यांवर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जाऊन वापरा व अनधिकृत पद्धतीने पाण्याचा अपव्यय करू नका. अन्यथा महानगरपालिकेच्या कडक कारवाईला सामोरे जावे लागेल.

-प्रदीप जांभळे पाटील , अतिरिक्त आयुक्त , पिंपरी चिंचवड महानगरपालिका

—-

कोट –

उन्हाळ्याच्या दिवसात देखील पिंपरी चिंचवड महानगरपालिका नागरिकांना आवश्यक पाणी पुरवठा करत आहे. अनधिकृत विद्युत पंप जोडणीमुळे पाणी पुरवठा करण्यास अडथळा येत आहे. यामुळे नळ जोडणीवर अनधिकृत पद्धतीने विद्युत पंप जोडणाऱ्यावर पाणी पुरवठा विभागाच्या वतीने दंडात्मक कारवाई करण्यात येईल. याची कृपया नोंद घ्यावी.


  • अजय सूर्यवंशी , सह शहर अभियंता, पाणीपुरवठा विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 75
Tags: Pcmc Pimpri and Chinchwad भोसरी

Continue Reading

Previous: पिंपरी चिंचवड भाजप संघटन पर्वात १४ मंडल अध्यक्षांची निवड; पक्षाला मिळणार नवी ऊर्जा
Next: वकील संरक्षण कायदा लागू करा; पिं. चिं. ॲड. बार असोसिएशनचे केंद्रीय न्यायमंत्र्यांना साकडे

Related Stories

Screenshot
  • Daily Breaking News
  • Maharashtra
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

अनधिकृत इमारतींना वीजजोडण्या देण्यात गैरव्यवहार: महावितरणच्या सेवा नियमांचे उल्लंघन

suwarna gaware 10/06/2026
12a8354a-5cba-479e-833e-eb9c0699d038
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

घरेलू कामगार राज्यव्यापी परिषदेत विविध ठरावांना मंजुरी

suwarna gaware 10/06/2026
c9a20d53-325a-4da4-8388-f75249c10e88
  • Daily Breaking News

निवडणूकीत लाडक्या असलेल्या बहिणी आता परक्या का झाल्या ? – काशिनाथ नखाते

suwarna gaware 05/06/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

अनधिकृत इमारतींना वीजजोडण्या देण्यात गैरव्यवहार: महावितरणच्या सेवा नियमांचे उल्लंघन Screenshot 1

अनधिकृत इमारतींना वीजजोडण्या देण्यात गैरव्यवहार: महावितरणच्या सेवा नियमांचे उल्लंघन

10/06/2026
घरेलू कामगार राज्यव्यापी परिषदेत विविध ठरावांना मंजुरी 12a8354a-5cba-479e-833e-eb9c0699d038 2

घरेलू कामगार राज्यव्यापी परिषदेत विविध ठरावांना मंजुरी

10/06/2026
निवडणूकीत लाडक्या असलेल्या बहिणी आता परक्या का झाल्या ? – काशिनाथ नखाते c9a20d53-325a-4da4-8388-f75249c10e88 3

निवडणूकीत लाडक्या असलेल्या बहिणी आता परक्या का झाल्या ? – काशिनाथ नखाते

05/06/2026
नगरसेविका सौ. कविताताई भोंगळे-पाटील यांच्या पुढाकारातून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात 1e9bbaac-5cd5-4078-851e-bd9953451c25 4

नगरसेविका सौ. कविताताई भोंगळे-पाटील यांच्या पुढाकारातून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात

05/06/2026
पोलीस आयुक्तांची तात्काळ उचलबांगडी करा : देवेंद्र तायडे 08f4fa96-6b7d-4b57-9ffd-81ade35fb5ba 5

पोलीस आयुक्तांची तात्काळ उचलबांगडी करा : देवेंद्र तायडे

01/06/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

Screenshot
  • Daily Breaking News
  • Maharashtra
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

अनधिकृत इमारतींना वीजजोडण्या देण्यात गैरव्यवहार: महावितरणच्या सेवा नियमांचे उल्लंघन

suwarna gaware 10/06/2026
12a8354a-5cba-479e-833e-eb9c0699d038
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

घरेलू कामगार राज्यव्यापी परिषदेत विविध ठरावांना मंजुरी

suwarna gaware 10/06/2026
c9a20d53-325a-4da4-8388-f75249c10e88
  • Daily Breaking News

निवडणूकीत लाडक्या असलेल्या बहिणी आता परक्या का झाल्या ? – काशिनाथ नखाते

suwarna gaware 05/06/2026
1e9bbaac-5cd5-4078-851e-bd9953451c25
  • Cultural
  • Poilitical

नगरसेविका सौ. कविताताई भोंगळे-पाटील यांच्या पुढाकारातून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात

suwarna gaware 05/06/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • अनधिकृत इमारतींना वीजजोडण्या देण्यात गैरव्यवहार: महावितरणच्या सेवा नियमांचे उल्लंघन
  • घरेलू कामगार राज्यव्यापी परिषदेत विविध ठरावांना मंजुरी
  • निवडणूकीत लाडक्या असलेल्या बहिणी आता परक्या का झाल्या ? – काशिनाथ नखाते
  • नगरसेविका सौ. कविताताई भोंगळे-पाटील यांच्या पुढाकारातून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात
  • पोलीस आयुक्तांची तात्काळ उचलबांगडी करा : देवेंद्र तायडे

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • 402, gangotri park, dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.