


पिंपरी, ता. २९: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडील जलशुद्धिकरण केंद्र व क्षेत्रिय स्तरावरील पाणीपुरवठा व विद्युत विषयक दुरुस्तीची विविध कामे करावयाची असल्यामुळे गुरुवार दि. ०३/०८/२०२५ रोजी पिंपरी चिंचवड शहराचा सकाळचा पाणीपुरवठा नियमित वेळेनुसार होणार असून संध्याकाळचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

पाणीपुरवठा व विद्युत विषयक देखभाल दुरुस्तीची कामे करणेसाठी सर्व पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवलेमुळे शहरातील सर्व भागात दुम-या दिवशी म्हणजेच शुक्रवार दि. ०४/०८/२०२५ रोजी होणारा सकाळचा पाणीपुरवठा अनियमित व कमी दाबाने होईल.
तरी नागरिकांनी मनपाकडील उपलब्ध पाण्याचा पुरेसा साठा करुन काटकसरीने पाणी वापर करून मनपा सहकार्य करावे, हि विनंती मुख्य अभियंता-१, पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांनी केली आहे.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
