


गुढीपाडवा, रमजान ईद या सुट्टीच्या दिवशीसुध्दा महानगरपालिकेचे कॅश काऊंटर रात्री १२ पर्यंत उघडेराहणार…

नागरिकांच्या सोयीसाठी सुट्टीच्या दिवशी विभागीय करसंकलन कार्यालयेसुध्दा राहणार सुरु…
पिंपरी, दि. २८ मार्च : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील मालमत्ताधारकांना मालमत्ताकर भरण्याचे आवाहनविविध माध्यमातून वारंवार करण्यात येत आहे. अद्यापही निवासी मालमत्ताधारकांकडून जवळपास २७४ कोटी तर व्यावसायिक मालमत्तांधारकांकडून १२४ कोटींचा असा एकूण जवळपास ३९८ कोटींचा मालमत्ताकर येणे बाकी आहे. आर्थिक वर्ष संपायला केवळ ३ दिवस शिल्लक असताना करदात्यांना आपला कर भरण्यास सोयीचे व्हावे यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या करसंकलन विभागाची पुढील १८ विभागीय कार्यालये व कॅश काऊंटर्स २९ मार्च रोजी सकाळी ९.४५ ते रात्री ०९ वाजेपर्यंत तसेचरविवार ३० मार्च, गुढीपाडव्याच्या दिवशी व ३१ मार्च, रमजान ईदच्या दिवशी रात्री १२ वाजेपर्यंत (शेवटचा व्यक्ती येईपर्यंत) कॅश काऊंटर्स सुरु ठेवण्याचा निर्णय करसंकलन विभागाने घेतला आहे. तसेच नागरिकांना या कालावधीत मालमत्ताकर भऱण्याबाबत कोणतेही अडचण येऊ नये म्हणून प्रत्येक विभागीय कार्यालयांचा पत्ता, संपर्क क्रमांक प्रसिध्द करण्यात येत असून नागरिकांनी तात्काळ आपल्या कराचा भरणा करण्याचे आवाहन सुध्दा करण्यात आले आहे.
| करआकारणी व करसंकलन विभाग | ||||
| विभागीय कार्यालयाची माहिती | ||||
| अ. क्र. | करसंकलनविभागीय कार्यालयाचे नाव | कार्यालायीन पत्ता | सहायक मंडलाधिकारी तथा जनमाहिती अधिकारी | मोबाईलक्रमांक |
| 1 | निगडी – प्राधिकरण | डॉ. हेडगेवार भवन, सेक्टर नंबर 26, निगडी प्राधिकरण, पुणे – 411 044. | श्री. मुंढे ढवळू सिताराम | 9922502063 |
| 2 | आकुर्डी | पांडुरंग काळभोर सभागृह, पांढारकरनगर, आकुर्डी गांव, पुणे – 411 035. | श्री. चिंचवडे अंबर किसन | 9922501989 |
| 3 | चिंचवड | गावडे कॉलनी, लोकमान्य हॉस्पिटल समोर, चिंचवड, पुणे – 411 033. | श्री. जाधव शरद काशिराम | 9011004858 |
जनता संपर्क अधिकारी
| अ. क्र. | करसंकलनविभागीय कार्यालयाचे नाव | कार्यालायीन पत्ता | सहायक मंडलाधिकारी तथा जनमाहिती अधिकारी | मोबाईलक्रमांक |
| 4 | थेरगाव | ग क्षेत्रिय कार्यालय इमारत, दुसरा मजला, थेरगाव, पुणे – 411 033 | श्री. शिंदे मनोज लक्ष्मण | 7887896532 |
| 5 | सांगवी | गजानन महाराज मंदिरासमोर, सांगवी, पुणे – 411027. | श्रीमती कुलकर्णी सुचेता मिलींद | 9922502124 |
| 6 | पिंपरी वाघेरे | भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर बाह्य रुंग्णालय इमारत,शिवाजी पुतळा चौक,पिंपरी, पुणे-411 017 | श्री. यादव रमेश शंकरराव | 8805013905 |
| 7 | पिंपरी नगर | पिंपरी नगर सांस्कृतिक भवन, एच.बी.16/8, साई चौक जवळ, पिंपरी – 411017. | श्री. आढारी अशोक ज्ञानदेव | 9922889292 |
| 8 | मनपा भवन | संत तुकारामनगर भाजी मंडई इमारत, संत तुकारामनगर, पिंपरी – 411018. | श्री. कुदळे जयश्री दिलिप | 8421999686 |
| 9 | फुगेवाडी – दापोडी | म.न.पा. दवाखाना इमारत, पहिला मजला, रेल्वे गेट जवळ, कासारवाडी, पुणे – 411 034. | श्री. तळपाडे संजय सखाराम | 9766319570 |
| 10 | भोसरी | भगवान गव्हाणे चौक, पी.एम.पी.एम.एल. बस डेपो समोर, गव्हाणे वस्ती, भोसरी, पुणे – 411039. | श्री . गोरडे ज्ञानेश्वर धोंडिबा | 8796315171 |
| 11 | च-होली | पोस्ट ऑफिस समोर, च-होली बु.ता.हवेली, जिल्हा-पुणे, पुणे- 412105. | श्री. भाट रविंद्र वजीरसिंग | 9762333637 |
| 12 | मोशी | नागेश्वर मंदिराजवळ, मोशी गाव, ता.हवेली, जिल्हा-पुणे, पुणे – 412005. | श्री. नखाते अजित दत्तात्रय | 9552501931 |
| 13 | चिखली | रोहन कॉम्पलेक्स, साने चौक, भाजी मंडई शेजारी, चिखली, पुणे – 411 062 | श्री. लोंढे बाळू रामचंद्र | 8380959074 |
| 14 | तळवडे | श्री. स्वामी समर्थ सांस्कृतिक भवन, सेक्टर नंबर 21,शिवभूमी विद्यालया जवळं, यमुनानगर, निगडी, पुणे – 411 044. | श्री. काळे लक्ष्मण मल्हारी | 9922501537 |
| 15 | किवळे | पिं.चिं.मनपा प्राथमिक शाळेजवळ, मु.पो.किवळे, ता.हवेली, जिल्हा-पुणे, 412101. | श्री. बांदल राजेश बापू | 9850811123 |
| 16 | दिघी – बोपखेल | लोटस पॅराडाईज, पहिला मजला, स.नं. 5/4/9, दत्तनगर, दिघी, पुणे – 411 015 | श्री. भाट रविंद्र वजीरसिंग | 9762333637 |
| 17 | वाकड | स.नं.162/1, 163/2पै, 163/3, तेजस इंपेरीअल, भुजबळ चौक, वाकड-411 057 | श्रीमती मिनाक्षी सुहास पवार | 9850828986 |
| 18 | कस्पटे वस्ती | वाकड गावठाण, म्हातोबा मंदिर रोड, नवीन मारुती मंदिर समोर, वाकड, पुणे – 411057 | श्री. जयवंत निरगुडे | 9011488957 |
नागरिकांना घरबसल्या मालमत्ताकराचा भरणा करण्यासाठीऑनलाइन माध्यमे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. यासाठी नागरिकांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या https://publicptaxpcmc.in/ या संकेतस्थळावरुन मालमत्ताकराबाबत आवश्यक माहिती भरुन क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, बी.एच.आय.एम(भीम) यूपीआय, पोस्ट डेबिट कार्ड, पोस्ट क्रेडिट कार्ड, यूपीआय, ईबीपीपी, मोबाईल वॉलेट या ऑनलाइन पध्दतीने मालमत्ताकराचा भऱणा करुन
करुन वेळेची बचत करावी. असे आवाहन करसंकलन विभागाकडून करण्यात आले आहे.
नागरिकांना मालमत्ताकर भरण्यामध्ये कोणतीही अडचण येऊ नये म्हणून करसंकलन भरणा कार्यालय व विभागीय कार्यालये सुरु असून त्यांचे संपर्क क्रमांक सुध्दा प्रसिध्द करण्यात आले आहेत. नागरिकांच्या अडचणींचा तात्काळ निपटारा करण्यासाठी करसंकलन विभाग कार्यरत असून नागरिकांनी आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तीन दिवसांमध्ये मालमत्ताकर भरण्यासाठी पुढाकार घेऊन आपल्या कराचा भऱणा करण्याचे आवाहन करसंकलन विभागाकडून करण्यात आले आहे.
कोट : नागरिकांनी मालमत्ताकराचा भरणा करुन शहराच्या विकासामध्ये हातभार लावावा !
“नागरिकांच्या सोयीसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या करसंकलन विभागाने सर्व करसंकलन विभागीय कार्यालये व कॅश काऊंटर्स साप्ताहिक व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीसुध्दा सुरु ठेवली आहेत. नागरिकांनी याचा लाभ घेत आपला कर भरुन शहराच्या विकासामध्ये हातभार लावावा.”
– शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
कोट : नागरिकांच्या सोयीसाठी कॅश काऊंटर्स सुरु ठेवण्याचा निर्णय !
“शहरातील सर्व मालमत्ताधारकांना आर्थिक वर्षाच्या शेवटच्या काही दिवसांमध्ये मालमत्ताकराचा भऱणा करण्यासाठी अडचण येऊ नये यासाठी साप्ताहिक व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीसुध्दाशहरातील सर्व कॅश काऊंटर्स सुरु ठेवण्याचा करसंकलन विभागाने निर्णय घेतला आहे. मालमत्ताधारकांना मालमत्ताकर भऱण्यासाठी ऑनलाइन प्रक्रियासुध्दा उपलब्ध करण्यात आली असून ३१ मार्चपूर्वीच कराचा भरणा करावा.”
– प्रदीप जाभंळे – पाटील, अतिरिक्त आयुक्त (१), पिंपरी चिंचवड महानगरपालिका

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
