Skip to content
10/09/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी शाळेमध्ये जात विद्यार्थ्यांना दिला यशाचा कानमंत्र!
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी शाळेमध्ये जात विद्यार्थ्यांना दिला यशाचा कानमंत्र!

suwarna gaware 28/03/2025
b0247fac-d719-43a0-a2e6-8d16d4e2cfb8
Spread the love

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा क्रीडा प्रबोधनी शाळेत आयोजित ‘परीक्षा पे चर्चा’ उपक्रम उत्साहात

पिंपरी, २८ मार्च २०२५ : विद्यार्थ्यांनी परीक्षेला सामोरे जाताना काय काळजी घ्यावी, करिअरची निवड कशी करावी, अपयश आल्यानंतर खचून न जाता पुन्हा जोमाने प्रयत्न करीत यशाला गवसणी कशी घालावी, याबाबतचे सविस्तर मार्गदर्शन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी विद्यार्थ्यांना करतानाच एकप्रकारे जीवनात यशस्वी कसे व्हावे, याचा कानमंत्रच शाळकरी विद्यार्थ्यांना दिला. निमित्त होते महानगरपालिकेच्या वतीने पिंपरी मधील उद्यमनगर येथील क्रीडा प्रबोधिनी शाळेत आयोजित केलेल्या ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमाचे. यावेळी जांभळे पाटील यांनी व्यासपीठावर न बसता थेट विद्यार्थ्यांसोबत बसून त्यांच्याशी खेळ, अभ्यास, छंद आणि भविष्यातील संधी आदी विषयांवर मनमोकळेपणाने संवाद साधला.

शाळकरी विद्यार्थ्यांचा परीक्षा जवळ आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना तणावमुक्त परीक्षा देण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, यासाठी महानगरपालिकेच्या वतीने क्रीडा प्रबोधिनी शाळेत ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

या कार्यक्रमात अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात, माध्यमिक शिक्षणाधिकारी संगीता बांगर, मुख्याध्यापक जयराम वायळ, क्रीडा प्रमुख ऋषिकांत वचकल, शिक्षक सोनाली पाटील, संग्राम मोहिते, राहुल मोरे, अक्षता बांगर, मनोज राऊत, प्रमिला अल्हाट, दत्तात्रय कोळी, दिनेश राऊत, विजय पाटील, प्रियंका पाटील, गौरी गाडेकर यांच्यासह शाळेतील शिक्षक, कर्मचारी वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.

याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील म्हणाले, ‘आयुष्यात यशस्वी होण्यासाठी लक्ष्य निश्चित करा. आपले क्षेत्र निवडून त्यामध्ये यश मिळवण्यासाठी प्रयत्न करा. आपले पालक आपल्याला सांगत आहेत, केवळ म्हणून अभ्यास न करता मनापासून अभ्यास करा. तुम्हाला यश नक्की मिळेल. तुमच्या आवडत्या क्षेत्रात करिअर करा.

विविध खेळांमध्ये सहभागी होऊन क्रीडा क्षेत्रामध्येही तुम्ही चांगले करिअर करू शकता. महानगरपालिका तुम्हाला क्रीडा प्रशिक्षक, क्रीडा साहित्य, मैदान उपलब्ध करून देतच आहे. विद्यार्थ्यांसाठी उत्तम दर्जाच्या खेळाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिका प्रयत्नशील आहे. विद्यार्थ्यांनी देखील खेळामध्ये राष्ट्रीय स्तरावर आपल्या शहराला नावलौकिक मिळाले, अशा पद्धतीने क्रीडा क्षेत्रात कामगिरी करावी,’ असे आवाहनही त्यांनी केले.

शाळेचे मुख्याध्यापक जयराम वायळ यांनी यावेळी आतापर्यंत शाळेतील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये केलेल्या कामगिरीची माहिती दिली.
———
चौकट-
शाळेतील जुन्या आठवणीनां उजाळा

अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यावेळी आपल्या शाळेतील आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, ‘नांदेड सारख्या जिल्ह्यात मी लहानच मोठा झालो. पूर्वी शाळेत बेंच नव्हते. शाळेतील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी कला शाखेत पदवी घेतली, त्यानंतर डी.एड केले. तीन वर्ष प्राथमिक शिक्षक म्हणून नोकरी केली. परंतु आई सारखी म्हणायची की, काहीतरी वेगळे कर. त्यामुळे मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरु केला. त्यातून सुरुवातीला गट विकास अधिकारी म्हणून काही दिवस काम केले. आज मी आपल्या समोर अतिरिक्त आयुक्त म्हणून काम करत आहे. सातत्यपूर्ण मन लावून तुम्ही तुमच्या ध्येयाच्या मागे धावलात, तर यश निश्चित मिळते,’ असेही त्यांनी सांगितले.
———
कोट:

क्रीडा आणि शिक्षण यांचा समतोल राखत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणे हेच आमचे उद्दीष्ट आहे. महानगरपालिकेच्या क्रीडा प्रबोधिनी शाळेच्या माध्यमातून राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या शहराचे नाव उंचावणारे खेळाडू घडविण्यासाठी येथील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण व क्रीडा प्रशिक्षण आणि उत्कृष्ट सुविधा मिळाव्यात यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. आज शाळेतील विद्यार्थ्यांसोबत संवाद साधल्यामुळे क्रीडा क्षेत्रात मुलांना यशस्वी होण्यासाठी आणखी कोणत्या सोयीसुविधा उपलब्ध करणे आवश्यक आहे, हे देखील समजले असून त्यादृष्टीने भविष्यात नियोजन करणे शक्य होणार आहे.

  • प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

—————–
कोट

पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्रीडाप्रबोधिनी विद्यालय हे केवळ शैक्षणिक केंद्र नसून खेळाडू घडवण्याचे एक महत्त्वाचे व्यासपीठ आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत खेळाच्या माध्यमातून भविष्यातील संधी प्राप्त होण्यासाठी येथे आवश्यक सर्व सुविधा पुरवण्यात येतात. त्यामुळे हे विद्यालय अनेक विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी ठरत आहे. आज या शाळेत थेट अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी येऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधल्याने येथील विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली आहे.

  • विजयकुमार थोरात, सहायक आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
    —————–

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 101
Tags: #अतिरिक्त आयुक्त Pcmc Pimpri and Chinchwad

Continue Reading

Previous: औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी महापालिकेच्या वतीने ‘उद्योग सुविधा कक्ष’ स्थापन
Next: पाणीपुरवठा ३ व ४ तारखेला राहणार विस्कळीत 

Related Stories

7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d
  • Daily Breaking News

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

suwarna gaware 10/09/2026
bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38
  • Daily Breaking News
  • Maharashtra

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

suwarna gaware 08/09/2026
4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

suwarna gaware 03/09/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर 7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d 1

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

10/09/2026
फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38 2

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

08/09/2026
निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक 4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724 3

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

03/09/2026
लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा 2ab21609-c117-42b9-9dad-ab31ab6e3cef 4

लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

02/09/2026
क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी 3f8116cd-99ba-4589-80b4-49a26e8e58ec 5

क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

02/09/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d
  • Daily Breaking News

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

suwarna gaware 10/09/2026
bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38
  • Daily Breaking News
  • Maharashtra

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

suwarna gaware 08/09/2026
4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

suwarna gaware 03/09/2026
2ab21609-c117-42b9-9dad-ab31ab6e3cef
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

suwarna gaware 02/09/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर
  • फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश
  • निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक
  • लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा
  • क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • Dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.