


पिंपरी, ता. १६ : दिगंबर जैन सारस्वत प्रज्ञाश्रमण आचार्य श्री देवनंदीजी महाराज व संघ यांचे पिंपरी चिंचवड शहरात दि.१६ सकाळी वाजता पारसभवन उद्योगनगर येथे मंदिर प्रतिष्ठा निमित्त दिगंबर मुनी सहित आगमन झाले.

एसकेएफ कंपनी समोर त्याचे रंगी बिरंगी फूले उधळून महिला पुरुष जंगी स्वागत करण्यात आले. मंदिरात वास्तुविधान व यागमंडल विधान झाले. ज्यात भाविकानी उत्स्फूर्त सहभाग घेतला. तदनन्तर महाराजांचें प्रवचन झाले. महाराजानी नव निर्मित पारसभवनचे कौतुक करून मंदिरांचे महत्व विषद केले.
लहान मूलाच्या धार्मिक पाठशाला विषयी महाराजानी कौतुक करुण आशीर्वाद प्रदान केले व सर्व ट्रस्ट कमिटी, कार्यकर्ता याची प्रशंसा केली. आज सकाळी वेदी प्रतिष्ठा व मूर्ति स्थापना होईल . 11.30 ते 3 पर्यंत महाराज विविध जैन ट्रस्ट चे पदाधिकारी, कार्यकर्ता याची भेट घेवुन मार्गदर्शन करणार आहेत. अशी माहिती चिंचवड मधील उद्योग नगर श्री पार्श्वनाथ दिगंबर जैन ट्रस्ट यांनी दिली.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
