


छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त स्वामी विवेकानंद प्रतिष्ठान आणि मा.नगरसेविका शारदा हिरेन सोनवणे यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.

या स्पर्धेमध्ये ३०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.या स्पर्धेचा बक्षीस समारंभ आज पार पडला याप्रसंगी मा.महापौर सौ.माई ढोरे,मा.नगरसेवक श्री.अशोकभाई सोनवणे,मा.नगरसेवक श्री.संतोषभाऊ कांबळे,श्री.संतोषभाऊ ढोरे,श्री.कृष्णा भंडलकर, श्री.वैभवजी ढोरे,मराठी प्रार्थमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.कल्पना सोनवणे मँडम,पिं.चिं.म.न.पा.शाळेच्या सौ.टेकवडे मँडम,पाटील सर आदी मान्यवर तसेच सर्व शिक्षकवर्ग उपस्थित होते.
आयोजकांच्या वतिने सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आले.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
