Skip to content
10/09/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • पिंपरी-चिंचवडमधील शिवसेनेच्या रणरागिनीचा उबाठा गटाला ‘जय महाराष्ट्र’
  • Daily Breaking News
  • Maharashtra
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

पिंपरी-चिंचवडमधील शिवसेनेच्या रणरागिनीचा उबाठा गटाला ‘जय महाराष्ट्र’

suwarna gaware 13/03/2025
aec23c68-f808-43d2-86da-15d4c48174c5
Spread the love

  • नेत्या सुलभा उबाळे यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
  • शहरातील महाविकास आघाडीला आणखी एक धक्का

पिंपरी, ता. १३ : पिंपरी-चिंचवड शहरातील अत्यंत आक्रमक आणि धडाडीच्या शिवसेना नेत्या आणि माजी गटनेत्या सुलभा उबाळे यांनी अखेर ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’ केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये उबाळे यांनी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला. त्यामुळे शहरात ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे. 

राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीमध्ये सुलभा उबाळे यांनी शिंदे गटात प्रवेश केला. उबाळे गेल्या 36 वर्षांपासून सक्रीय राजकारणात आहेत. महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या, गटनेत्या म्हणून त्यांनी कारकीर्द गाजवली आहे. तसेच, शिरुर लोकसभा प्रमुख आणि पुणे जिल्हा संघटिका म्हणून त्या ठाकरे गटात कार्यरत होत्या. 

शिवसेनेत उभी फूट पडली आणि एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षावर दावा केला. त्यावेळी उबाळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. विधानसभा निवडणूक 2024 मध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून भोसरी विधानसभा मतदार संघ शिवसेनेला सोडला जाईल आणि मशाल चिन्हावर निवडणूक लढवता येईल, अशी तयारी त्यांनी केली होती. मात्र, सदर मतदार संघ राष्ट्रवादी शरद पवार गटाला सोडण्यात आला.

तसेच, पिंपरी-चिंचवडमधील एकही मतदार संघ ‘‘मशाल’’ चिन्हासाठी मिळाला नाही. त्यामुळे सुलभा उबाळे यांच्यासह अनेक निष्ठावंत शिवसैनिकांमध्ये नाराजी होती. विधानसभा निवडणुकीनंतर उबाळे यांनी पक्षकार्यातून अलिप्त राहिल्याचे चित्र होते. अखेर त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. परिणामी, महाविकास आघाडीला शहरात आणखी एक धक्का मानला जात आहे. 

प्रवेशासाठी युवा सेना शहर प्रमुख भोसरी विधानसभा अजिंक्य उबाळे, शहर संघटक संतोष सौंदणकर, उपशहर अधिकारी पिंपरी चिंचवड युवा सेना सागर शिंदे, युवा नेते विशाल उबाळे, उप जिल्हा प्रमुख पुणे अमित शिंदे, प्रसिद्धीप्रमुख भोसरी विधानसभा सार्थक दोषी, विभागप्रमुख अनिकेत येरुणकर, विभागप्रमुख किरण वाडकर, शाखा प्रमुख संकेत मारवलकर, विभागप्रमुख रुपीनगर अभिषेक सुरवसे, शाखा प्रमुख सागर मुणगेकर, सुरज कदम, तेजस पवार, उपविभागप्रमुख गणेश शिंदे, सिद्धांत दोषी, अविनाश खडके, प्रभागप्रमुख कुणाल डमरे, शाखाप्रमुख सुहास तळेकर, शुभम महाडिक, संतोष भोसले, सुजित माने , वैभव सस्ते, गटप्रमुख लोकेश मुचूनडिकर, शाखाप्रमुख निखील पिसे, हेमंत पळसकर, अमोल मोरे, प्रभागप्रमुख सोमनाथ थरकुडे, शुद्धोधन भालेराव, शाखाप्रमुख अजय मिसाळ, बंटी काकडे, नरेंद्र पाटील, प्रवीण येवले, शुभम नेमाने शुभम कांबळे , सोमनाथ थरकुडे , लहू नाटेकर यांनी प्रवेश केला. 

तसेच, पिं चिं शहर, सुधाकर नलावडे, उप शहर प्रमुख पिं चिं शहर, गणेश झिळे, उप विभाग प्रमुख, राजेंद्र पालांडे, विभाग संघटक काळेवाडी, कौस्तुभ गोळे, उप विभाग प्रमुख महेश डोके, शाखाप्रमुख विजय घुले, सुहास फडकले, चवडप्पा तलवार , विभाग संघटक ॲड योगेश शिंदे, प्रभाकर पवार, गटप्रमुख सुभाष पवार, गोपाळ अप्पा काळभोर, किरण शेलार, विजय मोगरे, गजानन ढमाले, प्रकाश वाडकर, गणेश बोडरे, संदीप कोठावदे, मनोज कांबळे, मिलिंद कोंढाळकर, राजकुमार डमरे, अमर पवार, गणेश शेवाळे, नरेश उंद्रे, गणेश शिंदे, सचिन मसने, प्रणव नागर, बाजीराव पळसकर, लक्ष्मण राउत, हनुमंत पळसकर यांनीही शिवसेना शिंदे गटाचा झेंडा खांद्यावर घेतला आहे. 


महिला शक्तीची साथ…

सुजाता काटे, भोसरी विधानसभा समन्व्यक महिला आघाडी, शशिकला उभे, उपशहर संघटिका, भारती चकवे, विभाग संघटिका, निर्मला पाटील, उप शहर प्रमुख, लिलावती देवकाते, उप शहर प्रमुख, सांगिता टुपके, विभाग संघटिका, नजमा शेख, विभाग संघटिका दमयंती गायकवाड, उप विभाग संघटिका, तहेरा शेख, उप विभाग संघटिका, ममता कदम, विभाग संघटिका, कावेरी परदेशी, शाखाप्रमुख प्रिया जपे, उप शाखाप्रमुख, नयना पारखे, उप शाखाप्रमुख, स्मिता मोगरे, गटप्रमुख, लीना नेहते, गटप्रमुख मंदा पाटील, गटप्रमुख दीपा जागते
गटप्रमुख, वैशाली जिडेवार, गटप्रमुख, नम्रता जाधव, गटप्रमुख, अश्विनी डोके, गटप्रमुख, प्रज्ञा कोटावडे, गटप्रमुख, स्वाती चौधरी, गटप्रमुख, समीक्षा जागते, गटप्रमुख, मंगल पाटील, गटप्रमुख, शिल्पा साळवे, गटप्रमुख यांनीही शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. 


सुलभा उबाळे यांचा राजकीय जीवनप्रवास… 
1992 : शिवसेना शाखा प्रमुख म्हणून कामाला सुरुवात..
1997 : नगरसेवक
1998:  विरोधी पक्षनेता
1999 : उप सभापती
2001 :  अ प्रभाग समिती
2007-12 : शिवसेना गटनेता, स्थायी समिती सदस्य.
2009 : भोसरी विधानसभा निवडणूक अवघ्या 1272 मतांनी पराभव. 
2014-2017 : गटनेता 
2014 : भोसरी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी 15 हजार 641 मतांनी पराभव.
संघटनात्मक पदे : 
उप जिल्हा संघटिका : शिवसेना महिला आघाडी 
शिवसेना शहर संघटिका : पिंपरी चिंचवड म्हणून 5 वर्ष
जिल्हा संघटिका : 2017 ते आजतगायत
अध्यक्ष : पिंपरी-चिंचवड महिला बचत गट महासंघ.

……

प्रतिक्रिया

गेल्या दोन ते तीन वर्षापासून शहरातील आम्हा पदाधिकारी, कार्यकर्त्यांची संघटनात्मक बांधणी विस्कळीत झाली होती. वारंवार पक्षश्रेष्ठींना सांगूनही याकडे लक्ष दिले जात नव्हते. त्यामुळे कार्यकर्त्यांकडून वारंवार विचारणा होत होती. विधानसभा निवडणुकीत वरिष्ठ पातळीवर घेतलेल्या निर्णयानंतर कार्यकर्त्यांचा आग्रह वाढला त्यामुळे संघटनात्मक बांधणी, पक्ष वाढ, कार्यकर्त्यांची मागणी या दृष्टीने शिवसेना पक्षांमध्ये प्रवेश करून उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला आहे.

सुलभा उबाळे
माजी गटनेत्या
पिंपरी चिंचवड महापालिका

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 78
Tags: #sulbha Ubale Pcmc Pimpri and Chinchwad politics

Continue Reading

Previous: आगामी विधान परिषद निवडणूक पिंपरी चिंचवड शहराला विधान परिषद सदस्य म्हणून योग्य त्या कार्यकर्त्याला संधी मिळावी
Next: दिगंबर जैन सारस्वत प्रज्ञा श्रमण आचार्य श्री देवनंदीजी महाराज व संघ यांचे पिंपरी चिंचवड शहरात पारसभवन उद्योगनगर येथे आगमन

Related Stories

7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d
  • Daily Breaking News

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

suwarna gaware 10/09/2026
bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38
  • Daily Breaking News
  • Maharashtra

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

suwarna gaware 08/09/2026
4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

suwarna gaware 03/09/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर 7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d 1

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

10/09/2026
फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38 2

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

08/09/2026
निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक 4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724 3

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

03/09/2026
लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा 2ab21609-c117-42b9-9dad-ab31ab6e3cef 4

लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

02/09/2026
क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी 3f8116cd-99ba-4589-80b4-49a26e8e58ec 5

क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

02/09/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d
  • Daily Breaking News

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

suwarna gaware 10/09/2026
bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38
  • Daily Breaking News
  • Maharashtra

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

suwarna gaware 08/09/2026
4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

suwarna gaware 03/09/2026
2ab21609-c117-42b9-9dad-ab31ab6e3cef
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

suwarna gaware 02/09/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर
  • फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश
  • निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक
  • लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा
  • क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • Dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.