


सौ. अनिता संदीप काटे, चॅलेंजर पब्लिक स्कूल, व्हाईस चेअरमन व सामाजिक कार्यकर्त्या

*अन्नपूर्णा तू ,गृहलक्ष्मी हि तू
आणि तुच आहेस दुर्गा माता
रोमारोमात तुझ्या भरलीये
ममता आणि कणखरता*
अशाच कणखर अनिता काटे यांनी स्व बळावर महिलांसाठी समाजपयोगी उपक्रम राबवून नागरिकांना मदतीचा हातभार दिला आहे. नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन त्या सोडविण्यावर त्यांचा भर असतो.
पिंपळे सौदागर प्रभाग क्रमांक २८ मध्ये ब्लड डोनेशन कॅम्प त्यांनी राबविले. त्याच बरोबर क्रिकेट स्पर्धा, महिलांसाठी सहभाग वाढविण्यासाठी हळदी कुंकू समारंभ, शारीरिक तंदुरुस्तीसाठी योगा दिवस, मुलांसाठी शालेय उपक्रम वह्या पुस्तक वाटप करून त्यांनी मोलाची मदत केली. कोरोना काळातही अन्नदान करून त्यांनी गरजूचे अन्नदाते बनले. या सर्व उपक्रमात महिलांचा हिरिरीने सहभाग असतो.
माणुसकीची भिंत उपक्रम स्तुत्य
माणुसकीची भिंत या उपक्रमाद्वारे गोरगरीबाना कपडे वाटप केले. हा उपक्रम वाखान्याजोगा ठरला. अनेक गोरगरीब लोकांना यामुळे मदत झाली.
निवडणूक काळात शंकर जगताप यांना पाठिंबा देऊन प्रचारासाठी काटे परिवाराने मेहनत घेतली.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
