


सौ. सोनाली तुषार हिंगे, संचालिका : आरंभ सोशल फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य व सचिव : श्री.रेणुकादेवी प्राथमिक विद्यामंदिर, मोरवाडी

आरंभ सोशल फाउंडेशन मोरवाडी पिंपरी,महाराष्ट्र राज्य या फाउंडेशन ची स्थापना सन २०१५ साली करण्यात आली. संस्थेची पार्श्वभूमी सांगताना आपल्या सभोवतालच्या सामाजिक, नैसर्गिक तसेच सामाजिक घटकांच्या सर्वांगीण विकास साधण्याच्या व्यापक हेतूने स्थापना करण्यात आली.

आरंभ सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून परिसरामध्ये विविध समाजोपयोगी उपक्रम नियमितपणे राबवण्यात येत आहेत. संस्थेचे ध्येय ही विशिष्ठ समुदायापूरते मर्यादित न ठेवता सर्व घटकांना समावेशक धोरणे आखून विकास घडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आरंभ सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून करत आहोत. यातील काही सामाजिक उपक्रम अधोरेखित करत आहोत.

रेणुकादेवी प्राथमिक विद्यामंदिर ही मराठी माध्यमाची शाळा मोरवाडी येथील विठ्ठल मंदिरामध्ये भरवण्यात येत असे.हि जागा अपुरी पडत असल्याने नवीन जागी शाळेची स्वतंत्र्य सर्व सोई युक्त बांधकाम करण्यात आले आहे या शाळेमध्ये सुमारे ४००-४५० विद्यार्थी मोफत व दर्जेदार शिक्षण घेत असून मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आरंभ सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव भेटावा यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करनेत येते तसेच तालुका ,जिल्हा स्तरावरील स्पर्धांमध्ये सहभागी होता यावे त्यांना प्रोत्साहन व आर्थिक मदत ही आरंभ सोशल फाउंडेशन करते.

कोरोना च्या काळामध्ये आरंभ सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून नागरिकांना वैधकीय किट वाटप, तसेच मास्क सॅनिटायजर व औषधी मोफत उपलब्ध करून दिले, तसेच सर्व नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लसिकरण शिबिराचे आयोजन करून सर्वाना लसिकरणाचा लाभ मिळवून दिला. तसेच मोफत अन्नदान व शिधा वाटप करण्यात आले.तसेच कोरोना बाधितांना उपचारासाठी बेड उपलब्ध करून देणे तसेच कोरोना जाणीव जागृती प्रबोधनपर कार्यक्रम आरंभ सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून घेण्यात आले.
छत्रपती श्री.संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी आरंभ सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले जाते. या सामाजिक उपक्रमाला नागरिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. या शिबिरावेळी किमान २००-२५० रक्त संकलित होत असते. यावेळी सहभाग घेणाऱ्या रक्तदात्याना भेटवस्तू ही आरंभ सोशल फाउंडेशन कडून दिल्या जातात.

महिलांसाठी बचत गटाच्या माध्यमातून महिलांना स्वयंरोजगार निर्मिती साठी पालिकेच्या माध्यमातून किंवा इतर सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबिर आरंभ सोशल फाउंडेशन च्या वतीने आयोजित केले जाते. तसेच महिला बचत गटाला पालिकेच्या वतीने अर्थसहाय्य केले जाते त्याबाबत महिलांना कागदपत्राची पूर्तता व अर्ज भरून दिले जातात तसेच अर्थसहाय्य प्राप्त होईपर्यंत त्याचा पाठपुरावा करून लाभ मिळवून देण्याचे महत्वाचे काम आरंभ सोशल फाउंडेशनच्या वतीने नियमित चालू आहे. आज प्रभागात सुमारे १२० पालिका नोंदणीकृत बचत गट सक्रियपणे कार्यरत आहेत.
जेष्ठ नागरिकांना हक्काचे व्यासपीठ म्हणून प्रभागात जेष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र निर्मिती केली आहे. आज प्रभागात सुमारे १२-१५ जेष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र कार्यरत आहेत. त्यांना लागणाऱ्या टेबल खुर्ची तसेच कपाटे ,साऊंड सिस्टम असेल अथवा कॅरम बोर्ड दैनिक वर्तमानपत्रे आपल्या माध्यमातून दिले जातात.
दहावी व बारावी मधील विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात येतो प्रभागातील गुणवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व शैक्षणिक साहित्य वाटप व व्याख्यानाच्या माध्यमातून मार्गदर्शन केले जाते.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
