


सौ. ज्योतीताई संदीप भालके

उपशहर संघटिका
(शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे)
अध्यक्ष:-जिजाऊ सोशल फाउंडेशन, जिजाऊ महिला मंच
ज्योतीताई संदीप भालके मागील १० वर्ष पासून राजकारणामध्ये सक्रिय आहेत. लोकसभा व विधानसभा निवडणुकी मध्ये पक्षाच्या माध्यमातून प्रचारात सहभागी झाल्या आहेत.
तसेच, महिलांवर झालेल्या अत्याचारा वरील आंदोलनात पक्षाच्या वतीने सहभागी झाल्या असून अनेकांना न्याय मिळवून दिला आहे.
महिलांना संघटित करून बचत गटांची स्थापना केली. त्या माध्यमातून त्या आर्थिक सक्षम बनत आहेत. महिला सबलीकरणासाठी घर बसल्या महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे सोपस्कर झाले आहे.

पिंपरी चिंचवड शहर प्लास्टिक मुक्त करण्यासाठी रोटरी क्लबच्या माध्यमातून एक लाख पिशवीचे वाटप करण्यामध्ये सहभागी झाल्या. त्याच प्रमाणे स्वखर्चातून देखील प्रभाग क्रमांक 17 मधे घरोघरी कापडी पिशवीचे वाटप त्यांनी मोफत केले.
त्याच प्रमाणे, पर्यावरणासाठी खारीचा वाटा उचलत नदी स्वच्छतेसाठी बचत गट भजनी मंडळाच्या माध्यमातून एकत्र येऊन नदी स्वच्छ अभियान राबविले.
प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यासाठी वेगवेगळे आरोग्य शिबिरे राबवून 1000 लोकांचे मोतीबिंदूत शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करून दिल्या.
कोरोणा काळामध्ये गरजू लोकांना अन्नधान्य वाटप केले. त्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.
पिंपरी चिंचवड शहरात असणारे अनाथ आश्रम, वृद्धाश्रम यांना वेळोवेळी गरजेच्या वस्तू व अन्नधान्याचे वाटप त्यांनी केले.
घरातील तरुणांना रोजगाराची संधी मिळण्यासाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन त्या वारंवार करत असतात.

निराधार महिलांना महापालिकेच्या योजनांचा लाभ मिळवून देणे तसेच कष्टकरी कामगार योजनेचा देखील लाभ हा कष्टकरी लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम त्यांनी सक्षमपणे केले.
प्रभागातील अनेक समस्यांचे निराकरण करून ते सोडवण्याचा प्रयत्न त्यांचा नेहमी असतो .
जिजाऊ सोशल फाउंडेशन च्या माध्यमातून कापडी पिशवी गृह उद्योगाची स्थापना करून महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध केले.

राजकीय सामाजिक शैक्षणिक वैद्यकीय अशा अनेक क्षेत्रातील महिलांचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम केले.
महिलांसाठी दरवर्षी ब्रेस्ट कॅन्सरची तपासणी ही पूर्णपणे मोफत करून देण्याचे काम अविरत चालू आहे.
वाल्हेकर वाडीच्या शाळेत ६ महीने शिक्षकांची कमतरता होती त्याचा पाठपुरावा करून शिक्षक मिळवून दिले.

महिलांवरील होणाऱ्या अत्याचारावर वेगवेगळ्या प्रकाराच्या आंदोलनांमध्ये नेहमी सहभाग घेणे. प्रभागातील पाणी प्रश्नावर नेहमीच वारंवार अधिकाऱ्यांना भेटून तो सोडवण्याचा सातत्याने प्रयत्न करते.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
