


विभावरी विक्रम बोके ,

अध्यक्षा, एकेमी एज्युकेशन सोसायटी
महिलांच्या घरकामाची प्रशंसा व्हायला हवी
एकोणीसाव्या शतकात, जगभरातील स्त्री वादी चळवळीने जोर धरला होता, त्याचवेळी भारतातही अनेक समाजधुरिणांनी स्त्रीवर होणा-या अन्यायाला वाचा फोडली. त्यामध्ये राजा राम मोहन रॉय, महर्षी कर्वे, महात्मा ज्योतिबा व सावित्रीबाई फुले, ईश्वरचंद विद्यासागर, रमाबाई रानडे ही नावे विसरून चालणार नाही.
जागतिक महिला दिन हा महिलांच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय कामगिरीचा उत्सव साजरा करणारा जागतिक दिवस आहे. हा दिवस लैंगिक समानतेला गती देण्यासाठी कृती करण्याचे आवाहन देखील करतो. अशा परिस्थीत आजही आधुनिक युगात महिलांचा संघर्ष ना ना प्रकारे सुरू आहे. त्यांना व्यासपीठ मिळाले असून त्या झेप घेऊ पाहत आहेत. अशाच विभावरी बोके यांचा जीवन प्रवास एक एक टप्पा पार करीत पुढे मार्गक्रमण करीत आहे.
प्रत्येक क्षेत्रात महिलांची तारेवरची कसरत असते. अशीच कसरत विभावरी बोके यांनी देखील अनुभवली. विभावरी बोके यांचा जन्म 12 डिसेंबर 1962 साली झाला आहे. आयुष्यामधील ४० वर्षाहून अधिक काळ त्यांचा संघर्षमयी राहिला आहे. २०१० साली त्यांनी शिक्षण क्षेत्रात प्रवेश केला. त्यांचा मुलगा अभिषेक यांच्या सोबत त्या शिक्षण क्षेत्रात भरीव काम करीत आहेत. यापूर्वी त्यांना इंटीरियरची आवड असल्याने २५ वर्षे त्यांनी व्ही. बी असोसिएटस नावाची कंपनी मोठ्या हिमतीने चालवली. व त्यात त्यांनी मोठे यश मिळविले.
त्याना कलेची मोठी आवड असून त्या उत्तम असा पियानो वाजवतात. सुंदर कलाकृती त्या साकारतात. तसेच, विविध खाद्य पदार्थ बनविण्याची त्याना प्रचंड आवड आहे. ते पदार्थ बनवून इतराना खाऊ घालण्यात त्याना मोठा आनंद मिळतो.
भटकंतीची आवड
जपान, कंबोडिया, व्हिएतनाम, जपान अशा विविध देशात त्यांनी भ्रमंती केली. त्यातून त्याना बरच काही शिकायला मिळाले. भटकंतीची त्यांना प्रचंड आवड आहे. त्यामुळे यापुढे ही न थांबता त्यांना आणखी प्रवास करायचा आहे.
सामाजिक क्षेत्रात कामगिरी
अनाथ मुले व वंचित घटकातील महिलांसाठी त्या काम करीत आहेत. ‘तारा ‘ या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून त्या विशेष मुलांसाठी काम करतात. सुमारे २० वर्षांहून अधिक काळ त्यांचा समाज सेवेत गेला आहे.
कुटुंबाची साथ
या सर्व कामात पती विक्रम बोके, कन्या मेकअप आर्टिस्ट अमरिता बोके, सून अनुजा बोके, नातू अर्जुन बोके यांचा पाठिंबा असतो.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
