


सौ. ज्योतीताई सचिन निंबाळकर, महिला शहर अध्यक्षा, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, पिंपरी चिंचवड शहर

पिंपरी चिंचवड शहरात महिलांचे सक्षम नेतृत्व म्हणून ज्योतीताई सचिन निबाळकर यांचे नाव नावारुपास आले आहे. ज्योती सचिन निंबाळकर या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या पिंपरी चिंचवड शहराच्या महिला शहर अध्यक्षा आहेत.
त्यांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात २०१८ पासून सुरु केली. अवघ्या सहा ते सात वर्षातच त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने मोठा नावलौकिक मिळविला आहे. तुळजाई महिला बचत गटाच्या अध्यक्षा, प्रभाग अध्यक्ष ते आता शहराध्यक्षा अशा विविध पदावर कार्य करत या सामाजिक क्षेत्रात त्यांनी वेगळा ठसा उमटवला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबविले. यामध्ये महिला सक्षमीकरण सर्वात महत्वाचा टप्पा आहे. तसेच, त्यांच्या या राजकीय कार्यकाळात त्यांनी लहान मुलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले. यामध्ये चित्रकला स्पर्धा, जिल्हास्तरीय वायबॉक्सिंगच्या स्पर्धा, डान्सच्या स्पर्धा, बॉक्सिंगच्या स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन केले आहे.
*उल्लेखनीय कामगिरी*
कष्टकरी कामगार महिलांचा सन्मान, चिंचवड गावच्या स्मशानभूमीच्या कामाला गती मिळावी यासाठी केलेले प्रयत्न उल्लेखनीय आहेत. तसेच, वार्डामध्ये पेविंग ब्लॉक बसवून घेणे, भटक्या कुत्र्यांचा उपद्रव कमी होण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून केलेले प्रयत्न महत्वपूर्ण दिसून येतात.
*प्रशिक्षण व शिबिरांच्या माध्यमातून समाजसेवा*
सफाई कामगारांचा सन्मान, अनेक वेळा मोठमोठ्या आंदोलनांच्या माध्यमातून पुढाकार, तसेच महिलांसाठी कॅन्सरची शिबिर, मोफत नेत्र चिकित्सा शिबिर, मोतीबिंदूचे मोफत ऑपरेशन करून देत, रक्तदान शिबिरे, कंपोस्ट खत ट्रेनिंग कार्यशाळा, महिलांसाठी पेट्रोल पंप प्रशिक्षण कार्यशाळा, हलव्याचे दागिने, हेअर ब्राँच बनवणे, वेगवेगळ्या प्रकारचे केक फॅशन डिझाइनिंग याचे मोफत क्लासेस अशा वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून शिबिर महिलांसाठी व्यासपीठ उपलब्ध करुन दिलेत.
वाढदिवसानिमित्त मातृ सेवा अनाथ आश्रम असेल किंवा ममता बालाश्रम याना अत्रधान्याची मदत व कोकण पूरग्रस्तांना जागेवर जाऊन 500 ब्लँकेट्स वाटप करण्यात आले.
त्यांनी आपल्या प्रभागात अनेक उपक्रम राबवून प्रभागातील समस्यांचे निराकरण केले आहे. अनेक शहरातील प्रश्नांवर महानगरपालिकेच्या चुकीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आंदोलने केली. त्यांच्या अनेक आंदोलनांना यश प्राप्त झाले.
*समाजकारणाला अधिक म्हत्व*
राजकारण व समाजकारण करत असताना त्यांनी नेहमीच समाजकारणाला महत्त्व दिले. महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना सक्षमीकरण करण्याचे कार्य ज्योतीताई निंबाळकर यांनी हाती घेतले आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून अनेक महिलांची संघटन करुन महिला सक्षमीकरणाचे अभियान त्या राबवीत आहेत.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
