


सौ. कावेरी संजय जगताप

अध्यक्षा- मुक्तांगण गृहउद्योग महिला प्रतिष्ठान
पिंपळे गुरव
पिंपळे गुरव येथील मुक्तांगण गृहउद्योग महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा व श्रीगणेश सह. बँकेचे अध्यक्ष संजय गणपतराव जगताप यांच्या सुविद्य पत्नी सौ. कावेरी संजय जगताप यांना पुण्यातील राजेश्वरी एज्युकेशन संस्थेच्या वतीने त्यांच्या महिला सक्षमीकरण व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनिय कार्याबद्दल अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस, मा. आयुक्त पुणे ज्ञानेश्वर मोडक, दत्ता कोहिनकर व निवेदिता बडदे यांच्या हस्ते महाराष्ट्र समाज भूषण पुरस्कार २०२३ ने सावित्रीबाई फुले नाट्यगृह पुणे येथे १५ फेब्रुवारी रोजी झालेल्या कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले.
सौ. कावेरी संजय जगताप या पिंपळेगुरव येथील मुक्तांगण गृहउद्योग महिला प्रतिष्ठानच्या माध्यमातुन प्रतिभा महिला प्रतिष्ठानच्या अश्विनीताई जगताप व भाजपा चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख, मा. नगरसेवक शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली विविध समाजोपयोगी उपक्रम राबवित असतात.
आपल्या संस्थेच्या माध्यमातुन महिलांसाठी व्यवसाय मार्गदर्शन शिबिर, बचतगटांची स्थापना, बचतगटाच्या माध्यमातून दिवाळी फराळ बनवुन विक्री केंद्र सुरू करणे. दिवाळीत सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान, फराळ वाटप, लसीकरण केंद्र सुरू करून लसीकरणासाठी जनजागृती, महिलादिना निमित्त महिला मेळाव्याचे आयोजन, मतदार नावनोंदणी अभियान, होममिनिस्टर कार्यक्रमाच्या आयोजनात सहभाग, विविध शासकीय दाखले मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन केले.
सामाजिक उपक्रम
महिलांना एकवीरा देवी दर्शन घडविले, कोरोना काळात कोरोना प्रतिबंधक किटचे वाटप, मोफत मेकअप सेमिनार व सौंदर्य विषयी मार्गदर्शन शिबिर, गणेश जयंती निमित्त हळदी कुंक, कावेरीताई यांचे पती संजय गणपत जगताप यांनी भंडारा डोंगरा वरील नियोजित मंदिराच्या बांधकामासाठी एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांची देणगी दिली. पुरग्रस्तांसाठी भरीव मदत केली. इत्यादी सामाजिक उपक्रम त्यांनी आजपर्यंत राबविले आहेत.
आपल्या परिसरातील महिलांसाठी काही तरी केले पाहिजे या जाणिवेने आम्ही मुक्तांगण गृहउद्योग महिला प्रतिष्ठानची स्थापना केली. महिलांना स्वंयरोजगार मिळावा यासाठी व्यवसाय मार्गदर्शनपर मेळावे घेण्यात येतात. केवळ गृहिणी म्हणून एका साच्यात न राहता महिलांनी व्यवसायाच्या माध्यमातुन प्रगतीच्या दिशेने आपली यशस्वी वाटचाल करावी.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️