


अध्यक्षा, सौ. आरती राव , अरविंद एज्युकेशन सोसायटी, सांगवी

शाळा हे समाज परिवर्तनाचे साधन आहे .आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे आणि या स्पर्धेच्या युगात देखील आपले सामर्थ्य एकवटून गगनाला गवसणी घालणारी सांगवी परिसरात नावलौकिक असणारी संस्था म्हणजे *अरविंद एज्युकेशन संस्था* होय.
अरविंद एज्युकेशन संस्थेची स्थापना सन 1992 साली झाली. सांगवी परिसरातील शिक्षणाची निकड लक्षात घेऊन संस्थेचे संस्थापक स्व . माननीय महापौर नानासाहेब शितोळे व संस्थेच्या अध्यक्षा सौ. आरती राव मॅडम यांनी त्यांच्या स्व मेहनतीवर दर्जेदार शिक्षण देणारी सर्वांगीण विकासाचा पाया भक्कम करणारी अशी संस्था स्थापन केली.
सुरुवातीला संस्था अवघ्या वीस विद्यार्थ्यांनी सुरुवात झाली त्या छोट्या रोपट्याचं आज मोठ्या वटवृक्षांमध्ये रूपांतर झालेला आहे. या वटवृक्षाच्या *भारतीय विद्यानिकेतन विद्यालय*, *लिटिल फ्लावर इंग्लिश मीडियम स्कूल, लिटिल फ्लावर कनिष्ठ महाविद्यालय* या विस्तृत फांद्या आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था नेहमीच प्रयत्नशील असते. नवनवीन योजनांची अंमलबजावणी करत असते. पिंपरी चिंचवड शहरात संस्थेने आदर्श संस्था म्हणून नावलौकिक मिळवलेला आहे. संस्थेचे मुख्य विशेष म्हणजे संस्था ही भारतीय संस्कृतीचे नेहमीच जतन करत असते.
ही संस्कृती स्नेहसंमेलन, गणेशोत्सव धार्मिक सण या उपक्रमाच्या माध्यमातून सादर करीत असते. शासनाने ठरवलेला अभ्यासक्रम तसेच परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांचे मूल्यमापन केले जाते .विद्यार्थी शाळेच्या परीक्षेबरोबर बाह्य परीक्षांचा अभ्यास उत्तम रीतीने करून परीक्षेत भरघोस यश मिळवतात .
उदाहरणार्थ स्कॉलरशिप ,एमटीएस परीक्षा ,हिंदी राष्ट्रभाषा परीक्षा ,बाह्य चित्रकला स्पर्धा या परीक्षांचे निकाल १००% लागत असतात . इयत्ता दहावीचा शालांत परीक्षेचा निकाल १००% लागतो .विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी व शारीरिक ,मानसिक विकासासाठी क्रीडा स्पर्धा, चित्रकला, एकांकिका स्पर्धा ,सामान्य ज्ञान, प्रश्नमंजुषा, मेहंदी स्पर्धा, निबंध लेखन स्पर्धा, समूहगीत स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा अशा अनेक स्पर्धा घेतल्या जातात .लहान वयातच विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेमाची जागृत व्हावे म्हणून स्काऊट गाईड या विषयाचे देखील अध्यापन केले जाते.
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हा संस्थेचा ध्यास आहे विद्यार्थ्यांच्या या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक अशी आदर्श विज्ञान प्रयोगशाळा, डिजिटल शिक्षण प्रणालीसाठी सुसज्ज संगणक कक्ष ,विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी ग्रंथालय आहे. कोरोना महामारीच्या काळात देखील संस्थेने आपले शैक्षणिक धोरण डगमगू दिले नाही .विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाच्या माध्यमातून यशस्वी अध्यापन केले, परीक्षाही घेण्यात आल्या.
करोना काळानंतर विद्यार्थी पुन्हा शाळेत येऊ लागले तेव्हा संस्थेने विद्यार्थ्यांची खूप काळजी घेतली. सर्वप्रथम प्राथमिक तपासणी करूनच विद्यार्थ्यांना वर्गात पाठवले जाई. संस्थेने विद्यार्थ्यांना मास्क व शील्ड चे वाटप केले होते. देशाची प्रगती शिक्षणावर अवलंबून असते म्हणून त्या दर्जेदार शिक्षणासाठीच शैक्षणिक पात्रता असलेल्या शिक्षकांचीच शिक्षक म्हणून संस्थेत नेमणूक केली जाते.
सहकार्य ,नम्रता ,आत्मविश्वास, चिकाटी व क्षमता यावर भर दिलेला आहे. त्यामुळे विद्यार्थी आदर्श नागरिक घडण्यास मदत होत असते . तसेच प्रत्येक शनिवारी संस्थेमध्ये हॉबी क्लास आयोजित केलेले आहेत. यामध्ये नाट्यीकरण, संगीत, लाठीकाठी ,चेस व योगा यांचे प्रशिक्षण दिले जाते . विद्यार्थी आपल्या आवडीनुसार या क्लासमध्ये सहभागी होत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांचा विकास होण्यासाठी खूपच मदत झालेली आहे आणि विद्यार्थ्यांचा आनंद देखील द्विगणित झालेला आहे.
संस्थेच्या या सर्व प्रगतीमध्ये संस्थेच्या अध्यक्षा, मुख्याध्यापक ,शिक्षक व सुजाण पालक यांचा मोठा मोलाचा वाटा आहे.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️