


निगडी प्राधिकरण मधील एकेरी वाहतूक निर्णय रद्द…

निगडी, ता. २८ : प्राधिकरण येथे सेक्टर 25 ज्ञान प्रबोधिनी शाळेजवळ एकेरी वाहतुकी संदर्भात २७ जानेवारी रोजी ज्ञान प्रबोधिनी शाळा येथे मनोहर वाढोवकर सभागृहामध्ये निगडी प्राधिकरण मधील नागरिकांची व बीआरटी विभागाचे बापूसाहेब गायकवाड, उपअभियंता संजय पवार, गिरीश गुठे, वाहतूक पोलीस निगडी चे सिनिअर पीआय रूपाली बोबडे. आमदार उमाताई खापरे, माजी नगरसेवक शैलजाताई मोरे, राजू मिसाळ, अमित गावडे, मनसे उपाध्यक्ष बाळा दानवले, सामाजिक कार्यकर्ते निलेश शिंदे, बाळा शिंदे, भाजपा उपाध्यक्ष राजू बाबर, यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली.
या बैठकीमध्ये सर्व नागरिकांनी एक मुखाने एकेरी वाहतुकीला विरोध केला व या विरोधात आंदोलन करून रस्त्यावरती उतरण्याबाबत जाहीर केले नागरिकांनी घोषणा दिल्या.
नागरिकांना विश्वासात न घेता हा प्रोजेक्ट केल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त करून सर्व नागरिक उभे राहून मोठ्याने विरोध केला तसेच गोंधळ घालण्यास सुरुवात केली यावेळी सर्व नागरिकांचा विरोध लक्षात घेता महानगरपालिका अधिकारी बापूसाहेब गायकवाड यांना नागरिकांनी आपली भूमिका जाहीर करायला लावली.
सर्व नागरिकांनी एकमुखाने महापालिका अधिकाऱ्यांना एकेरी वाहतुकीचा निर्णय माघारी घेण्यास भाग पाडले आज बी आर टी विभागाचे अधिकारी बापूसाहेब गायकवाड व सीनियर पी आय वाहतूक रूपाली बोबडे यांनी हा एकेरी वाहतुकीचा प्रस्ताव मागे घेत आहे, असे सर्व नागरिकांन समोर जाहीर केले.
त्यामुळे सर्व नागरिकांनी मोठा जल्लोष करून एकामेकाचे अभिनंदन केले या सर्व प्रकरणांमध्ये मनसेचे उपाध्यक्ष बाळा दानवले यांनी एकेरी वाहतूक हा निर्णय जाहीर झाल्या.
पासून ते आज पर्यंत प्रयत्न केले सोमवार दिनांक 20/1/ 2025 ला सर्व नागरिकांची भेट घेऊन जागेवरती बी आर टी विभागाचे संजय पवार यांना बोलून नागरिकांशी संवाद साधला होता तसेच 23 जानेवारीला परिसरातील 250 नागरिकांच्या सहयाचे पत्र घेऊन वाहतूक पोलीस आयुक्त बापूसाहेब बांगर तसेच महापालिका आयुक्त यांना नागरिकांना बरोबर घेऊन समक्ष भेटून पत्र दिले होते व आंदोलनाचा इशारा दिला होता.
आजच्या बैठकीला जवळपास 400 लोकांच्या आसपास नागरिक उपस्थित होते. एकंदरीत आजच्या या निर्णयामुळे सर्व परिसरातील नागरिक व पालकांनी समाधान व्यक्त केले आहे. लगेच रात्री च एकेरी वाहतूक साठी लावण्यात आलेले ब्रॅकेट्स , पोस्टर्स व रस्त्या मधील डिव्हायडर पोल काढून घेण्यात आले.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️