Skip to content
27/07/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • रील, गाणे, रॅपमधून करा मालमत्ताकर भरण्याचे आवाहन!
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

रील, गाणे, रॅपमधून करा मालमत्ताकर भरण्याचे आवाहन!

suwarna gaware 28/01/2025
Official_Logo_of_PCMC
Spread the love

नागरिकांना कर भरण्याचे आवाहन करणारी करसंकलन विभागाची अभिनव स्पर्धा…

पिंपरी, ता. २८ : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागामार्फत सध्या मालमत्ताकर वसूल करण्यासाठी थकबाकीदारांच्या मालमत्तांवर जप्तीची कारवाई सुरू असून थकबाकीदारांच्या थकीत रकमेवर प्रतिमहिना २ टक्क्यांचा विलंब दंडही वाढत आहे. त्याबरोबरच ज्या मालमत्ताधारकांनी आपल्या पाणीपट्टीचा भरणा केलेला नाही, अशा मालमत्तांचे नळकनेक्शन खंडित करण्याची कारवाईही सुरू आहे. यामुळे करसंकलन विभागाकडून नागरिकांनी कर भरण्यासाठी रील, गाणे व रॅपच्या माध्यमातून आवाहन करावे.

यासाठी ‘मी जबाबदार करदाता’ रील-रॅप-गाणे बनवा, स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मालमत्ताकर भरण्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती होण्यासाठी करसंकलन विभागाने लाखोंचे बक्षीस जाहीर केले आहे. जे रीलस्टार, संगीतकार, रॅपर असतील, अशांनी स्पर्धेमध्ये सहभागी होऊन आपल्या कलेच्या माध्यमातून नागरिकांना मालमत्ताकर भरण्याचे आवाहन करावे, असे कर आकारणी व कर संकलन विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे.

अशा आहेत स्पर्धेच्या नियम व अटी…
1)    रील, गाणे, रॅप व्हिडीओ स्वनिर्मित असावा. इतरांच्या व्हिडीओमधील कोणताही भाग घेऊ नये, तसेच कॉपीराईट कायद्याचे पालन करावे
2)    रील व्हिडीओ ओरिएन्टेशन पोर्टेट असावे
3)    रील व्हिडीओ ६० ते ९० सेकंदांचा असावा
4)    फेसबुक व इन्स्टाग्राम अथवा एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तुमचे किमान दोन हजारांवर फॉलोअर्स असणे आवश्यक आहे
5)    रील्स स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी सर्वप्रथम नोंदणी करणे आवश्यक असून, नोंदणी फॉर्म मनपाच्या www.pcmcindia.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे
6)     सदर स्पर्धेचा कालावधी १ ते १५ फेब्रुवारी २०२५. स्पर्धकांनी १५ फेब्रुवारीपर्यंत आपले रील आपल्या आयडीवरून पोस्ट करून इन्स्टाग्रामवरील @pcmc_pimprichinchwad या अकाउंटला कोलॅब करा. याबरोबर, फेसबुक व एक्स या व्यासपीठावर पोस्ट केल्यास आमच्या फेसबुक @Pimpri Chinchwad Municipal Corporation व एक्सच्या @pcmcindiagovin या सोशल मीडिया हॅंडलला टॅग करा.
7)    आपल्या अंकाउंटवरून रील पोस्ट केल्यानंतर त्याची लिंक सदर ptax@pcmcindia.gov.in या ईमेलवर मेल करावी
8)    आपण अपलोड केलेली रील, गाणे व रॅप यांचे दृश्य, आवाज स्पष्ट ऐकू व दिसेल, असा त्याचा दर्जा उत्तम असावा
9)    रील्समधून धर्म, जात, पंथ यांच्या उल्लेखाने सामाजिक वातावरणास तेढ निर्माण होईल, असे व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होईल, असे चित्रण असलेले रील्स ग्राह्य धरले जाणार नाहीत. याबरोबरच कोणाच्याही भावना दुखावतील, असा आशय असलेले रीलही स्पर्धेतून बाहेर होतील
10)    रील्स स्पर्धेचा निकाल हा रील्सचे लाईक, दर्शकसंख्या (व्ह्यूव्ह्स), आशय, मांडणी, विषयाला दिलेला न्याय आदीवर ठरविला जाईल. स्पर्धेस निकालायोग्य प्रतिसाद आला नाही, तर स्पर्धा स्थगित करण्याचे स्वांतत्र्य आयोजकांकडे राहील
11)    रील्स स्पर्धेबाबत निर्णयप्रक्रिया, बदल, निवड आदीबाबतचे सर्व अधिकार पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाकडे राहतील
12)   आपण स्पर्धेसाठी केलेले रील हे मालमत्ताकराबाबत जनजागृतीसाठी असून त्याचा इतर कुठेही वापर करण्यात येणार नाही

चौकट – विजेत्यांना मिळणार लाखाचे बक्षीस…
१) प्रथम क्रमांक – ५०,००० रुपये व प्रशस्तिपत्र
२) द्वितीय क्रमांक – ३०,००० रुपये व प्रशस्तिपत्र
३) तृतीय क्रमांक – २०,००० रुपये व प्रशस्तिपत्र

चौकट – या विषयांबाबत करावे रील, गाणे, रॅपच्या माध्यमातून आवाहन…
१) मालमत्ताकर भरायची करा घाई, नाही तर होईल जप्तीची धडक कारवाई!
२) पाणीपट्टी आजच भरा, नळकनेक्शन होण्याची कारवाई टाळा!
३) तुमचा थकला आहे मालमत्ताकर? त्यावर वाढतोय विलंब दंड!
४) शहराच्या विकासात हातभार लावण्यासाठी मालमत्ताकराचा भरणा करा! – मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही सर्जनशील कलाकरांनी प्रतिसाद द्यावा!
करसंकलन विभागाने आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये करसंकलनामध्ये ऐतिहासिक कामगिरी केली. करसंकलन विभागामध्ये नागरिकांना कर भरण्यासाठी विविध माध्यमातून आवाहन करून जनजागृती करण्यात आली. कर भरण्याचे आवाहन करण्यासाठी सर्जनशील कलाकारांनी सहभाग नोंदवून विविध विषयांवर उत्तम आशयाची निर्मिती करून नागरिकांना ते प्रचंड भावले. त्याच धर्तीवर चालू वर्षीही करसंकलन विभागाने रील, गाणे व रॅपच्या माध्यमातून मालमत्ताकर भरण्याचे आवाहन करण्यासाठी स्पर्धेचे आयोजन केले आहे. सदर स्पर्धेस मागील वर्षीप्रमाणे प्रतिसाद देऊन सहभाग नोंदवावा.

  • प्रदीप जाभंळे-पाटील, अतिरिक्त आयुक्त (१), पिंपरी-चिंचवड महानगरपालिका……

– ‘मी जबाबदार करदाता’ स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त क्रिएटर्सनी सहभाग घ्यावा!
करसंकलन विभाग विविध माध्यमातून मालमत्ताधारकांना कर भरण्याचे आवाहन करण्यासाठी पुढाकार घेतो आहे. आम्ही नागरिकांना मालमत्ताकराबाबत माहिती मिळण्यासाठी व त्यांना आवाहन करण्यासाठी एसएमएस पाठवित असून सोशल मीडिया व आदी बाबींचीही मदत घेतो आहोत. करसंकलन विभागाच्या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील जागरूक मालमत्ताधारकांनी सदैव जागरूकपणे कराचा भरणा केला आहे. त्यामुळे चालू वर्षी सोशल मीडियाच्या माध्यमातून करसंकलन विभागाची सुरू असलेली मालमत्ताकराबाबत थकबाकी वसुली मोहीम व मालमत्ता जप्ती मोहिमेबाबत माहिती मिळावी व नागरिकांनी वेळेत कराचा भरणा करावा, यासाठी रील, गाणे व रॅप या अनोख्या स्पर्धेचे आयोजन केले आहे. तरी क्रिएटर्सनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे.

  • अविनाश शिंदे, सहाय्यक आयुक्त, कर आकारणी व कर संकलन विभाग, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका
suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 53
Tags: #reels #मालमत्ताकर Pcmc Pimpri and Chinchwad

Continue Reading

Previous: अखेर नागरिकांच्या एकजुटीला व उठावाला मोठं यश..!
Next: च-होली मधील विद्यार्थ्याना सुवर्ण, रौप्य, कांस्य पदक 

Related Stories

da6a6f1f-8535-42da-b15b-d3483e7b4ba6
  • Daily Breaking News
  • Maharashtra

आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते

suwarna gaware 15/07/2026
249b6d4f-90f1-4aeb-99b9-55d317b30700
  • Daily Breaking News
  • Cultural

पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

suwarna gaware 14/07/2026
02ba564a-b0df-4183-a16e-1c8761f3a901
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates
  • Education

स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश

suwarna gaware 06/07/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन a07d775e-b732-4531-9c37-2a08f0a4616f 1

दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन

22/07/2026
आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते da6a6f1f-8535-42da-b15b-d3483e7b4ba6 2

आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते

15/07/2026
पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा 249b6d4f-90f1-4aeb-99b9-55d317b30700 3

पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

14/07/2026
स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश 02ba564a-b0df-4183-a16e-1c8761f3a901 4

स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश

06/07/2026
पिंक ई-रिक्षा योजना सरकारचे नाटक होते का ? – काशिनाथ नखाते 41222d03-183d-4ce3-91a7-7a58c6a30370 5

पिंक ई-रिक्षा योजना सरकारचे नाटक होते का ? – काशिनाथ नखाते

04/07/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

a07d775e-b732-4531-9c37-2a08f0a4616f
  • Cultural

दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन

suwarna gaware 22/07/2026
da6a6f1f-8535-42da-b15b-d3483e7b4ba6
  • Daily Breaking News
  • Maharashtra

आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते

suwarna gaware 15/07/2026
249b6d4f-90f1-4aeb-99b9-55d317b30700
  • Daily Breaking News
  • Cultural

पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

suwarna gaware 14/07/2026
02ba564a-b0df-4183-a16e-1c8761f3a901
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates
  • Education

स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश

suwarna gaware 06/07/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन
  • आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते
  • पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
  • स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश
  • पिंक ई-रिक्षा योजना सरकारचे नाटक होते का ? – काशिनाथ नखाते

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • Dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.