



पुणे,ता. २८: आयआयबी विद्याधाम पुणे कॅम्पसमध्ये ७६ वा प्रजासत्ताक दिनी 76 विद्यार्थ्यांचा तब्बल 15 तास अभ्यास करून नवीन रेकॉर्ड बनवून प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

“आयआयबी” इन्स्टिटयूट विद्याधाम पुणे येथील कॅम्पसमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वज वंदन करण्यात आले. यावेळी महापौर योगेशजी बेहल , आयआयबी पुणे विभागाचे संचालक ॲड.महेश लोहारे सर, दैवीक मंठाळे सर,ॲड. कल्पना लोहारे , जनरल मॅनेजर प्रवीण देसाई सर यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात मान्यवरांनी उपस्थित विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले.
76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त तब्बल 76 विद्यार्थ्यांनी सलग 15 तास अभ्यास करून नवीन रेकॉर्ड बनवून एक उत्कृष्ट डॉक्टर, इंजिनिअर बनून देशाच्या प्रगती मधे भविष्यातील दर्जेदार योगदानचा दृढ संकल्प केला. त्यातील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती आणि राष्ट्राभिमानाच्या भावना जागृत झाल्या.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️