


पिंपळे गुरव, ता. १६ :पिंपळे गुरव ,नवी सांगवी येथील होली मिशन स्कूल मधील उपक्रमशील आणि विद्यार्थी प्रिय शिक्षिका नीलम विनोद वैरागर यांचा चिंचवड येथील संस्कार प्रतिष्ठानच्या वतीने ‘स्वामी विवेकानंद संस्काररत्न आदर्श शिक्षिका पुरस्काराने गौरव करण्यात आला. स्वामी विवेकानंद जयंती निमित्ताने संस्कार प्रतिष्ठान च्या वतीने संपन्न झालेल्या या पुरस्कार वितरण प्रसंगीपिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे आयुक्त श्री.शेखर सिंह यांच्या शुभहस्ते सौ. नीलम वैरागर याना स्मृतिचिन्ह, आणि सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी सुप्रसिद्ध दाक्षिणात्य सुपरस्टार देव सिंह गिल ,बाणेर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.महेश बोळकोटगी ,जनसंपर्क अधिकारी बाळासाहेब मेमाने आणि संस्कार प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. मोहन गायकवाड आदि मान्यवर उपस्थित होते.
नीलम वैरागर या गेली 32 वर्षे शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असून त्या सांगवी येथील होली मिशन इंग्लिश स्कूल मध्ये मराठी विषयाचे अध्यापन करीत असून त्यांना आजपर्यंत त्यांनापंडिता रमाबाई पुरस्कार, गुणवंत शिक्षक पुरस्कार,,आदर्श माता पुरस्कार,विजेता आदर्श शिक्षक पुरस्कार आदि पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले आहे. या पुरस्काराच्या निमित्ताने नीलम वैरागर यांचे शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
