


निगडी, ता. ६ : प्रोग्रेसिव्ह सोसायटीच्या मॉडर्न प्राथमिक विद्यामंदिर यमुनानगर निगडीचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ नुकताच प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह चिंचवड येथे संपन्न झाला.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त पोलिस महासंचालक,महाराष्ट्र राज्य मा.श्री.विजयसिंह जाधव उपस्थित होते तसेच विशेष उपस्थिती म्हणून सा रे ग म प लिटिल चॅम्प्स फेम कु.अनया देसाई हिने आपल्या गायनाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळा समिती चे अध्यक्ष मा.श्री मानसिंग साळुंके यांनी भुषविले.कार्यक्रमाची सुरूवात शाळेतील उपशिक्षिका श्रीमती माया सूर्यवंशी यांच्या मार्गर्शनाखाली इयत्ता 2 री च्या विद्यार्थ्यांनी सुमधुर आवाजात ईशस्तवन व स्वागतगीत सादर करुन झाली.
स्नेहसंमेलनाच्या प्रास्ताविकात शाळेचे मुख्याध्यापक .पांडुरंग मराडे यांनी शाळेत राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षिका .सुजाता कुलकर्णी यांनी केले.आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचा परिचय व सत्कार उपशिक्षक .किरण वारके यांनी केला.
यावेळी स्पर्धा परीक्षेत विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या तसेच शाळा अंतर्गत व आंतरशालेय विविध सांस्कृतीक व क्रीडा स्पर्धांमध्ये बक्षीसे मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.या बक्षिसपात्र विद्यार्थ्यांच्या यादीचे वाचन उपशिक्षिका सौ.जोगेश्वरी पैलवान यांनी केले.
स्नेहसंमेलनातील विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमात प्रशालेतील इयत्ता पहिली ते चौथी च्या एकूण 450 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.त्यामध्ये गणेश वंदना, देवीचा जागर,हिरवा निसर्ग, दक्षिण संस्कृतीवर आधारीत नृत्य,नारी सन्मान,कारगिल विजय दिवस रौप्य महोत्सवी वर्ष देशभक्तीवर आधारित नृत्य,शिवाजी महाराजांच्या जीवनावरील प्रसंग, नाट्यछटा,तबला वादन जुगलबंदी,भरतनाट्यम इत्यादी वैविध्यपूर्ण व दर्जेदार कार्यक्रमांचा सर्व पालकांनी व विद्यार्थ्यांनी मनमुराद आनंद लुटला.
यासर्व नृत्यांमधून कैलास माळी सरांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कारगिल विजय दिवस व सौ. वैशाली ढाकणे,किरण वारके,सौ.रेखा गोतारणे व सौ.योगिता कोठावळे या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या शिवाजी महाराजांच्या जीवनावरील नृत्य या दोन्हीही नृत्यांचा प्रथम क्रमांक आला.* सर्व गाण्यांचे निवेदन शाळेच्या शिक्षिका सौ.गीतांजली रायरीकर यांनी केले.उपस्थित सर्व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून शाळेमार्फत राबविण्यात येणाऱ्या क्रीडा,शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमाचे कौतुक केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमासाठी व्यासपीठावर शाळेचे व्हिजीटर मा.श्री.प्रमोद शिंदे,संस्थेचे आजीव सदस्य श्री.राजीव कुटे,मा.नगरसेविका सुलभाताई उबाळे,मुख्याध्यापिका सौ. ज्योत्स्ना महाजन,पालक संघाच्या उपाध्यक्षा सौ.शारदा हागे,शालेय व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा सौ. सुप्रिया पवार,माता पालक संघाच्या उपाध्यक्षा सौ.पूनम वाघ,ए.बी.पी.न्यूज चे नामदेव मेहेर,विद्यार्थी प्रतिनिधी चि.वेदांश राऊत इत्यादी मान्यवर उपस्थित होते.संस्थेचे कार्याध्यक्ष माननीय प्राध्यापक डॉक्टर गजानन एकबोटे व कार्यवाह मा.प्रा.शामकांत देशमुख यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या व सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.
सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ.वैशाली ढाकणे यांनी आलेल्या सर्व अतिथिंचे आभार मानले कार्यक्रमाचे आयोजन नरेश कांबळे,वैशाली आटोळे,अपर्णा घोलप, भारती साळुंखे,रोहिणी माने, शितल गव्हाणे,दत्ता मोरे, विद्या शिंदे यांनी केले व पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
