


पिंपरी, ता.२३ : शिवाजीनगर बस स्थानकाच्या जागी मल्टीमोडल हब आणि एस.टी. स्टँण्ड उभारण्यासाठी अजित पवार, उप मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांनी सुचना केल्या. महामेट्रोचे शिवाजीनगर भूमिगत स्थानकाच्या बांधकामासाठी शिवाजीनगर एस.टी. बस स्थानक यांचे वाकडेवाडी येथे तात्पुरते स्थलांतर करण्यात आले होते.

महामेट्रो व एस.टी. महामंडळ यांनी करार केला होता. जेणेकरून त्या जागेवर मेट्रोचे स्थानक, एस.टी. बस स्थानक व प्रवाशांच्या सेवेसाठी लागणाऱ्या आवश्यक गोष्टींची (मल्टीमोडल हब) उभारणी केली जाणार होती. या सर्व सोयी सुविधांचा बृहत आराखडा बनवण्यासाठी एस.टी. महामंडळ व मेट्रो प्रशासक यांच्या तर्फे अनेक शक्यतांचा विचार करण्यात येत होता. या बृहत आराखड्यात एक वाक्यता नसल्यामुळे यात काही दिरंगाई झाली होती.
आज दि. २३/१२/२०२४ रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक बैठक घेऊन महामेट्रो व एस.टी. महामंडळ यांना त्या जागेवर बस स्थानक व मल्टी मोडल हब उभारण्याच्या सूचना दिल्या. या प्रसंगी स्थानिक आमदार सिध्दार्थ शिरोळे, एस.टी.महामंडळ व महामेट्रोचे अधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री यांनी दिलेल्या सुचनेनुसार शिवाजीनगर बस स्थानकाच्या जागेत बांधा वापरा हस्तांतर करा (Bot) यातत्त्वावर मल्टीमोडल हब प्रवासी सेवेसाठी असणाऱ्या सुविधांसाठी बांधकाम करण्यात येणार आहे. हे काम पुर्ण झाल्यानंतर वाकडेवाडी येथील एस.टी. बस स्थानकाचे स्थलांतर मुळ जागी करण्यात येणार आहे. असे मेट्रो प्रशासनाच्या वतीने सांगितले.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️