


भोसरी, ता. २४ : एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन व पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटना यांचे सयुंकत विद्यमाने पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे पदाधिकारी,संचालक,स्विकृत संचालक,सल्लागार व सर्व सभासद यांना भोसरी एम.आय.डी.सी. हद्दीत सीसीटीव्ही बसविण्याचे लघु उद्योजकांना आवाहन करण्यात येत आहे.

भोसरी एमआयडीसी मध्ये S, J, T, W, ब्लॉक पिंपरी F-II, H ब्लॉक, चिंचवड D- I, D-II, D-III हे सर्व ब्लॉक भोसरी औद्योगिक परिसरातील सेक्टर ७ आणि १०, शांतीनगर, चिखली, कुदळवाडी, तळवडे,ज्योतिबानगर, शेलारवस्ती चिखली, चोविसावाडी चऱ्होली, बारणेवस्ती मोशी या औद्योगिक परिसरामध्ये चोऱ्या, गुन्हे तसेच अतिरेकी /दहशतवादी कारवाया, समाज कंटकाकडून घातपाती कृत्ये घडत आहेत.
याकरिता सुरक्षिततेच्या व कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगाने आपले संघटनेचे सदस्य व इतर औद्योगिक आस्थापनेचे / कंपनीचे / शॉपचे समोरील परिसर व रस्ते कव्हर होतील अशाप्रकारे चांगल्या प्रतीचे सीसीटीव्ही कॅमेरे किमान ३० दिवसापर्यंत स्टोअरेज क्षमतेसह बसविण्यात यावे.
सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्या पूर्वीचे व बसविल्यानंतरचे फोटो काढून जुन्या व नवीन बसविण्यात आलेल्या कॅमेऱ्याची माहित भोसरी एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन संतोष फावडे मो.नं 9923124105 व पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटना औटी 9881450225 यांना देण्यात यावी.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️