


पिंपरी, ता. दिनांक २३ डिसेंबर – पिंपरी येथील शगुन चौकात सकाळी अकरा वाजता सिंधी समाजातील सामाजिक कार्यकर्ते यांनी एकत्र येऊन संत श्री आसाराम बापू यांच्या प्रेरणेतून सर्व समाजातील बांधवांना तुलशी रोपांचे वाटप केले.

या मागील भावना अशी आहे दर वर्षी वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजेच २५ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत सर्व समाजातील समाज बांधव हे हा आठवडा मोठ्या उत्साहात साजरा करत असाताना अभक्ष भक्षण करतात,नशेचे पदार्थ सेवन करीत असतात. पण अशामुळे आपल्या हिंदू संस्कृतीवर टिका होत असते.
त्यामुळे हि होणारी टिका टाळण्यासाठी आज तुळशीच्या रोपांचे वाटप करीत असताना तुळशी चे महत्व सांगताना तुळस ही आरोग्यवर्धक, स्मरणशक्ती वर्धक,सुख शांतीप्रदायक,प्रदुषणनाशक सौंदर्यवर्धक, असून त्याचे अनेक फायदे समाजबांधवांना समजून सांगण्याचा प्रयत्न करीत होते.
त्या बरोबर गौ मातेचे रक्षण करा,गंगेचे म्हणजेच नदीचे संरक्षण करा असेही आवाहन करण्यात आले या वेळी सिंधी समाजातील प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्ते मनोहर जेठवानी, महेश मोटवानी, ज्योती मुलचंदानी, घनश्याम पोपटानी, हरेश छाबलानी, दिलीप ढोबलानी, राकेश शर्मा , योगेश भन्साली,शैलजा पेंडलवाल,आरती सिंग, लक्ष्मी भन्साली, पुजा भन्साली आदी मान्यवर उपस्थित होते.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️